पुणे, (14 नोव्हेंबर 2025) – ब्रिजस्टोन इंडियातर्फे आज श्री. राजर्षी मोइत्रा यांची ब्रिजस्टोन इंडिया प्रायव्हेट लि.चे (ब्रिजस्टोन इंडिया) व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून ही नियुक्ती 1 जानेवारी 2026 पासून लागू होईल.
सध्या व्यवस्थापकीय उपसंचालक म्हणून कार्यरत असलेले श्री. मोइत्रा हे श्री. हिरोधी योशिझाने यांच्या जागी कार्यभार सांभाळतील. श्री. योशिझाने यांनी जानेवारी 2024 पासून ब्रिजस्टोन इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहिले आहे आणि मे 2025 पासून ते ब्रिजस्टोन आशिया पॅसिफिक, इंडिया, चीन (BSAPIC) समूहाध्यक्ष पदाची जबाबदारीही सांभाळत आहेत.
श्री. योशिझाने यांची 1 जानेवारी 2026 पासून ब्रिजस्टोन कॉर्पोरेशनचे उपाध्यक्ष आणि वरिष्ठ अधिकारी म्हणून पदोन्नती करण्यात येणार आहे. ते पुढेही BSAPIC समूहाध्यक्ष, ब्रिजस्टोन इंडियाच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष आणि भारतातील ऑटोमोटिव्ह टायर निर्मिती क्षेत्राची राष्ट्रीय पातळीवरील औद्योगिक संघटना असलेल्या ऑटोमोटिव्ह टायर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष या पदांवर कार्यरत राहतील. या सर्व जबाबदाऱ्यांद्वारे श्री. योशिझाने ब्रिजस्टोन इंडियाला धोरणात्मक दिशा देत राहतील आणि उद्योगाच्या शाश्वत वृद्धीत आपले मोलाचे योगदान देतील.
“ब्रिजस्टोन इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालकाची भूमिका स्वीकारणे, ही माझ्यासाठी अत्यंत बहुमानाची बाब आहे. गेल्या काही वर्षांत मी ज्या टीमसोबत जवळून काम केले, त्या सर्व टीम्सना पुढेही माझे पूर्ण सहाय्य देत राहणार आहे. ‘उत्कृष्ट दर्जासह समाजाची सेवा’ या ब्रिजस्टोनच्या मूलतत्त्वाशी आणि अचल ध्येयाशी सुसंगत राहून काम करण्यास मी उत्सुक आहे, कारण आम्ही आमच्या ग्राहकांना, ओईएम भागीदारांना आणि व्यापक समुदायाला सेवा देत राहणार आहोत,” असे श्री. मोइत्रा म्हणाले.
“ब्रिजस्टोन इंडिया हा ब्रिजस्टोनच्या जागतिक वाढीच्या प्रवासाचा एक महत्त्वाचा घटक राहिला आहे आणि या प्रगतीसाठी झटणाऱ्या उत्साही आणि कुशल टीमसोबत काम करण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी एक सन्मानाची बाब आहे. आपण सर्वांनी मिळून आपल्या व्यवसाय प्रक्रिया अधिक सक्षम केल्या, बाजारातील अस्तित्व वाढवली, सुरक्षा व दर्जा अधिक बळकट केले आणि संशोधन व विकास, सामाजिक योगदान आणि शाश्वतता या उपक्रमांद्वारे भविष्यासाठी महत्त्वाची पायाभरणी केली आहे. ग्राहक आणि समुदायांची सेवा करण्याबाबत टीमने दाखवलेली निष्ठा आणि बांधिलकी यामुळे भविष्यातील यशासाठी मजबूत पाया घातला गेला आहे. BSAPIC समूहाध्यक्ष आणि ब्रिजस्टोन इंडिया संचालक मंडळाचा अध्यक्ष म्हणून मी यापुढेही काम करणार असून, राजर्शी यांच्या कुशल नेतृत्वाखाली कंपनीच्या सातत्यपूर्ण वृद्धीसाठी मी सहाय्य देण्यास उत्सुक आहे,” असे श्री. योशिझाने म्हणाले.
श्री. मोइत्रा यांना बिझनेस स्ट्रॅटजी, प्रॉफिट सेंटर मॅनेजमेंट, सेल्स व मार्केटिंग आणि मोठ्या परिवर्तनाचे नेतृत्व करण्याचा 20 वर्षांहून अधिक अनुभव आहे. ब्रिजस्टोन इंडियाचा कन्झ्युमर बिझनेस विभागाचे नेतृत्व करण्यासाठी ते 2019 मध्ये ब्रिजस्टोन इंडियामध्ये रुजू झाले. तेव्हापासून त्यांनी आपली भूमिका व जबाबदारीची व्याप्ती वाढवतच नेली. यात कन्झ्युमर अँड कमर्शिअल बिझनेस, सोल्यूशन बिझनेस, लॉजिस्टिक्स व सप्लाय चेन मॅनेजमेंट या विभागांचा समावेश आहे. जून 2024मध्ये ते कार्यकारी संचालक – सेल्स व मार्केटिंग या पदावर रुजू झाले आणि मे 2025 मध्ये ब्रिजस्टोन इंडियाचे व्यवस्थापकीय उपसंचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. या भूमिकेत त्यांनी ब्रिजस्टोन इंडिया कॉर्पोरेशनला भक्कम सहाय्य प्रदान केले.
नव्या नेतृत्व रचनेसह शाश्वत उपाययोजना पुरवणारी कंपनी होण्याच्या परिवर्तनकारी प्रवासात ब्रिजस्टोन इंडिया पुढील वाटचाल करत राहणार आहे. शाश्वत समाजनिर्मितीमध्ये योगदान देण्याच्या आपल्या दृष्टीकोनाने प्रेरित होऊन कंपनी “ब्रिजस्टोन E8 कमिटमेंट*1” मध्ये मांडलेल्या मूल्यनिर्मितीच्या वचनबद्धतेनुसार कार्य करत आहे. शाश्वत मूल्यनिर्मिती शक्य होईल अशा पद्धतीने व्यवस्थापन संरचनेचा विकास करून कंपनी शाश्वत समाजाची उभारणी साध्य करण्यासाठी आणि आपल्या वाढीचा वेग अधिक वाढवण्यासाठी कटिबद्ध आहे.
*1 ब्रिजस्टोन समूहाने आपले पुढील व्हिजन प्रत्यक्षात आणण्यास मदत व्हावी यासाठी ब्रिजस्टोन E8 कमिटमेंट ही कॉर्पोरेट बांधिलकी निश्चित केली: “2050 पर्यंत ब्रिजस्टोनतर्फे शाश्वत उपाययोजना कंपनी म्हणून सामाजिक मूल्य व ग्राहक मूल्य प्रदान करण्यात येईल. ही बांधिलकी म्हणजे समूहाचा अक्ष असेल आणि भविष्यातील पिढ्यांचा विश्वास संपादन करतानाच व्यवस्थापनालाही चालना देईल. ब्रिजस्टोन E8 कमिटमेंटमध्ये E या अक्षराने सुरू होणाऱ्या ब्रिजस्टोनच्या मूल्यांचा (एनर्जी, इकोलॉजी, एफिशिअन्सी, एक्स्टेन्शन, इकोनॉमी, इमोशन, ईझ आणि एम्पॉवरमेंट) समावेश आहे. ब्रिजस्टोन समूह आपल्या विशिष्ट ब्रिजस्टोन कमिटमेंट आणि प्रक्रियांद्वारे तसेच कर्मचारी, समाज, भागीदार आणि ग्राहक यांच्या सहकार्याने ही मूल्ये निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहे, ज्यायोगे शाश्वत समाजाची निर्मि
ती साध्य होऊ शकेल.


