Thursday, August 27, 2026
Google search engine
HomeUncategorizedपदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या प्रारुप व अंतिम मतदार याद्या तयार करण्यास...

पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या प्रारुप व अंतिम मतदार याद्या तयार करण्यास मुदतवाढ

 

 

पुणे, दि. १६: पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी १ नोव्हेंबर २०२५ या अर्हता दिनांकावर आधारित नव्याने मतदार याद्या तयार करण्याचा (De-Novo) कार्यक्रम सुरू असून प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यास भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ३ डिसेंबर व अंतिम मतदार याद्या तयार करण्यास १२ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती विभागीय आयुक्त तथा पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघाचे मतदान अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिली आहे.

 

 

 

सुधारित कार्यक्रमानुसार हस्तलिखिते तयार करणे व प्रारुप मतदार याद्यांची छपाई- शुक्रवार २८ नोव्हेंबर, प्रारुप मतदार याद्यांची प्रसिद्धी- बुधवार ३ डिसेंबर, दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी- ३ ते १८ डिसेंबर, दावे व हरकती निकाली काढणे, पुरवणी यादी तयार करणे व छपाई करणे- सोमवार ५ जानेवारी २०२६ व मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी- सोमवार १२ जानेवारी २०२६ रोजी करण्यात येईल.

 

 

 

 

 

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments