पुणे, नोव्हेंबर १९, २०२५: पुण्यातील लघु व मध्यम आकाराचे व्यवसाय (एसएमबी) त्यांच्या आतापर्यंतच्या सर्वात आत्मविश्वासपूर्ण दशकामध्ये प्रवेश करत आहेत. नवीन लिंक्डइन संशोधनामधून निदर्शनास येते की ९२ टक्के एसएमबी एआय अवलंबनामध्ये गुंतवणूक करत आहेत किंवा एआय अवलंबनाचे नियोजन करत आहेत. यामधून दिसून येते की तंत्रज्ञान प्रयोगावरून पायाभूत सुविधेपर्यंत पोहोचले आहे. यासोबत, जवळपास ९१ टक्के एसएमबी धोरणकर्त्यांना पुढील १२ महिन्यांमध्ये व्यवसाय वाढीची अपेक्षा आहे, ज्यामधून क्षेत्र स्मार्ट सिस्टम्स, कुशल टॅलेंट आणि मोठ्या प्रमाणात डिजिटल प्रभावासह पुन्हा विकसित होईल असे दिसून येते.
पुण्यातील एसएमबींसाठी उत्क्रांती पर्याय नसून अस्तित्व टिकवण्याचे साधन आहे
एसएमबींचा तत्परतेवर विश्वास असला तरी एआयबाबत आता फक्त चर्चा केली जात नसून ते विकासासाठी नवीन बेसलाइन बनले आहे. संशोधनामधून निदर्शनास येते की ६० टक्के एसएमबी कार्यक्षमता व ऑपरेशनल क्षमतेसाठी एआय व ऑटोमेशनचा अवलंब करण्याला प्राधान्य देतात, तर ४९ टक्के एसएमबींनी डिजिटल परिवर्तनावर लक्ष केंद्रित केले आहे.
लिंक्डइन इंडियाचे कंट्री मॅनेजर कुमारेश पट्टाबिरामण म्हणाले, ”पुणे शहर उद्योजकता प्रगतीसाठी अविरत पॉवरहाऊस राहिले आहे आणि येथील एसएमबी एआय व कुशल टॅलेंटमध्ये निर्णायक गुंतवणूकींसह त्या वारसाला पुढे घेऊन जात आहेत. हे शहर उद्देशासह प्रगती करते, विश्वास, माहिती व वास्तविक आरओआय देणाऱ्या प्लॅटफॉर्म्सची निवड करते. लिंक्डइनमध्ये आम्ही एकाच ठिकाणी योग्य नेटवर्क, योग्य ग्राहक व योग्य टॅलेंट देत या प्रवासाला गती मिळण्यास मदत करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे, ज्यामुळे प्रत्येक लघु व्यवसाय आत्मविश्वास आणि मोठ्या उद्योगाच्या क्षमतेसह काम करू शकतात.”
एआय विकासासाठी नवीन ऑपरेटिंग सिस्टम बनले आहे
एआय एसएमबीच्या हायर, विपणन व विकास करण्याच्या पद्धतींमागील प्रेरक स्रोत बनले आहे. जवळपास सर्वेक्षण करण्यात आलेले सर्व व्यवसाय म्हणतात की, ते कार्यप्रवाह स्वयंचलित करण्यासाठी (९४ टक्के), विश्लेषण व व्यवसाय उत्कृष्टता मजबूत करण्यासाठी (९६ टक्के) आणि हायरिंग, विपणन व विक्री सुव्यवस्थित करण्यासाठी (९० टक्क्यांहून अधिक) एआयचा वापर करतात किंवा एआयचा वापर करण्याचे नियोजन करत आहे.
हायरिंग मॉडेल्सना क्रेडेन्शियल्सवर नाही तर क्षमतांनुसार पुन्हा निर्माण करण्यात येत आहे. एसएमबी आता डिजिटल साक्षरता व एआय निपुणता (६७ टक्के), समस्या निवारण (६३ टक्के) आणि डिजिटल कम्युनिकेशन (५० टक्के) या गुणांना महत्त्व देतात. ही कौशल्ये असलेल्या टॅलेंटचा शोध घेण्यासाठी ६३३ टक्के एसएमबी आधीच एआय हायरिंग टूल्सचा वापर करत आहेत, ज्यामधून सर्वोत्तम मूल्यांकन आणि उच्च सहभाग दिसून येतो.
विपणन व विक्री देखील मोठ्या प्रमाणात उत्कृष्टता-संचालित बनत आहेत. जवळपास ७८ टक्के एसएमबी एआय मार्केटिंग टूल्सचा वापर करत आहेत, त्यांच्यापैकी ९६ टक्के एसएमबी याकरिता त्यांचा जवळपास अर्धा बजेट गुंतवत आहेत. ७८ टक्के एसएमबी आता स्पष्ट लक्ष्य आणि ऑटोमेटेड फॉलो-अप्ससाठी विक्रीमध्ये एआयवर अवलंबून आहेत, ज्यामुळे त्यांना मोठ्या अत्याधुनिक उद्योगांसह काम करता येते.
स्केलरचे चीफ मार्केटिंग ऑफिसर राहुल कार्तिकेयन म्हणाले, ”स्केलरच्या अलिकडील मोहिमांनी अचूक ग्राहक लक्ष्य आणि डेटा-संचालित ऑप्टिमायझेशनच्या माध्यमातून प्रबळ कामगिरी केली आहे. प्रायोजित कनेक्न्ट, विशेषत: व्हर्टिकल फॉर्मेट्सनी इतर चॅनेल्सवरील स्थिर फॉर्मेट्सच्या तुलनेत २० टक्के उच्च लीड-टू-पेमेंट रूपांतरण दिले. ऑगस्टमध्ये लिंक्डइनने जवळपास ७० ते ८० नवीन पेमेंट्स निर्माण केले, ज्यामध्ये रिटर्न ऑन स्पेण्ड (आरओएस) २.२ आहे. आमची या उच्च-प्रभावी चॅनेलला अधिक विकसित करण्याची, तसेच प्रतिविक्री खर्च कार्यक्षमता कायम ठेवण्याची योजना आहे.”
विश्वास नवीन स्पर्धात्मक फायदा आहे
पुण्यातील एसएमबी झपाट्याने एआयचा अवलंब करत असले तरी विश्वास कोणावर ठेवावा याबाबत सतर्कता राखत आहेत. ९५ टक्के एसएसमबी म्हणतात की त्यांच्या निर्णयांमंध्ये खर्चापेक्षा विश्वसनीयतेला अधिक प्राधान्य दिले जाते. ते सुरक्षा व डेटा गोपनीयता (७७ टक्के), विद्यमान यंत्रणंसोबत विनासायास एकीकरण (८४ टक्के) आणि व्याजदराबाबत (आरओआय) स्पष्टता (७८ टक्के) यांना अधिक प्राधान्य देत आहेत. एकत्रित, या बदलांमधून स्मार्ट, अधिक स्थिर एसएमबी परिसंस्थेचा उगम दिसून येतो, जी एआय युगाचा अवलंब करण्यासोबत सक्रियपणे या युगाला आका
र देखील देत आहे.


