Friday, August 28, 2026
Google search engine
HomeUncategorizedरुबी हॉल क्लिनिक चा इमोहा एल्डरकेअर सोबत करार पुण्यातील ज्येष्ठ नागरिकांची देखभाल...

रुबी हॉल क्लिनिक चा इमोहा एल्डरकेअर सोबत करार पुण्यातील ज्येष्ठ नागरिकांची देखभाल अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल

पुणे, १९ नोव्हेंबर २०२५: पुण्यातील सर्वात विश्वासार्ह आरोग्यसेवा संस्थांपैकी एक असलेल्या रुबी हॉल क्लिनिकने इमोहा एल्डरकेअर सोबत एका ऐतिहासिक सहयोगाची घोषणा केली. ही धोरणात्मक भागीदारी शहरासाठी एक संरचित, करुणामयी आणि वैद्यकीयदृष्ट्या देखरेखीखाली ज्येष्ठांसाठी देखभाल परिसंस्था तयार करण्याचे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या स्वास्थ्य पुनर्प्राप्तीच्या प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर पाठिंबा देण्यासाठी रचना केलेला हा उपक्रम रूग्णालयातून घराकडचा प्रवास अधिक सुलभ करत अखंड वैद्यकीय देखरेख, वैयक्तिक निगा आणि भावनिक संबंध प्रस्थापित करणारा ठरेल.

 

या कार्यक्रमाला डॉ. विराज राव कोरे आणि डॉ. प्राची साठे यांच्यासह प्रख्यात आरोग्य चिकित्सक उपस्थित होते, तसेच रुबी हॉल क्लिनिकचे फिजिशियन आणि विश्वस्त डॉ. सायमन ग्रँट, रुबी हॉल क्लिनिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी बेहराम खोदाईजी आदी मान्यवर उपास्थित होते. त्यांनी पुण्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी अशा उपक्रमांच्या महत्त्वावर भर दिला.

 

जागतिकीकरणाच्या काळात अधिकाधिक भारतीय कुटुंबे आंतरराष्ट्रीय संधींचा शोध घेत असताना, स्वतंत्रपणे घरी राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या लक्षणीय वाढली आहे. या बदलामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी वैद्यकीय कौशल्य आणि दैनंदिन मदत एकत्रित पुरवणाऱ्या विश्वसनीय सेवांची गरज वाढली आहे. विश्वासार्ह प्रणालींशिवाय, वृद्धांना अनेकदा वैद्यकीयदृष्ट्या तातडीच्या स्थितीत उशिरा प्रतिसाद, अनियंत्रित दीर्घकालीन आजार, पडझड, औषधांचे चुकीचे व्यवस्थापन, संज्ञानात्मक आव्हाने, एकाकीपणामुळे उद्भवणारे नैराश्य आणि नियमित देखरेखीचा अभाव यासारख्या आव्हानांना तोंड द्यावे लागते. ही गरज ओळखून, रुबी हॉल क्लिनिक आणि इमोहा या संस्था एक सुरक्षित, विश्वासार्ह आणि सर्वंकष सेवा देण्यासाठी एकत्र आल्या आहेत. या उपक्रमाद्वारे परदेशात राहणाऱ्या कुटुंबांच्या भारतात राहणाऱ्या पालकांची सखोल काळजी घेतली जाते. संरचित आरोग्यसेवा , प्रशिक्षित परिचारक, पुनर्वसनासाठी मदत, पाठपुरावा आणि भावनिक सहवासाद्वारे मनःशांती मिळेल या दृष्टीने ही भागीदारी परदेशात राहणाऱ्या मुलांना पुण्यातील त्यांच्या पालकांसाठी सेवा प्रदान करेल.

 

हा सहयोग म्हणजे ज्येष्ठांच्या सुरक्षेची फेरमांडणी करण्याच्या दृष्टीने एक प्रगतीशील पाऊल आहे. रुबी हॉल क्लिनिकची दशकांपासूनची वैद्यकीय उत्कृष्टता आणि ज्येष्ठांच्या देखभालीमध्ये कौशल्य असलेले इमोहा एकत्र आल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या आरोग्य आणि जीवनशैलीच्या विशिष्ट गरजांनुसार तयार केलेल्या मजबूत सेवा प्रणाली उपलब्ध होतील. हा उपक्रम ज्येष्ठांना निरोगी, सामाजिकदृष्ट्या जोडलेले आणि भावनिकदृष्ट्या समृद्ध ठेवण्याच्या दिशेने इमोह अ‍ॅपद्वारे अखंड वैद्यकीय देखरेख आणि सक्रिय आरोग्य मूल्यांकनांपासून पुनर्वसन, दैनंदिन मदत आणि समुदाय सहभागापर्यंत सेवा प्रदान करेल. हे हॉस्पिटल-टू-होम केअर मॉडेल केवळ पुन्हा आजारी पडण्याचा आणि पुन्हा रुग्णालयात दाखल होण्याचा धोका कमी करत नाही तर स्वास्थ्य पुनर्प्राप्ती परिणाम, आत्मविश्वास आणि एकूणच जीवनाची गुणवत्ता देखील वाढवते. पुण्यातील ज्येष्ठांची संख्या वाढत असताना हा उपक्रम करुणामयी व भविष्यसज्ज आरोग्यसेवेसाठी एक नवीन मापदंड स्थापित करतो.

 

रुबी हॉल क्लिनिकचे फिजिशियन आणि विश्वस्त डॉ. सायमन ग्रँट म्हणाले की,“माझ्या वैद्यकीय चिकित्सेदरम्यान, मी अनेकदा पाहतो की ज्येष्ठ नागरिकांपुढे केवळ आजारांचेच नव्हे तर घरी रचनात्मक आधाराच्या अभावाचे आव्हान असते. ही भागीदारी करुणामयी आणि विश्वासार्ह असा वैद्यकीय पाया रचून ही कमतरता भरून काढेल. वैद्यकीय सातत्य, भावनिक कल्याण आणि सामाजिक सहभागातून ज्येष्ठांची काळजी अधिक मजबूत करण्याच्या दिशेने हा सहयोग कार्य करेल.

 

“इमोहा एल्डरकेअर”चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सहसंस्थापक श्री. सौम्यजित रॉय म्हणाले,“ज्येष्ठांच्या देखभालीमध्ये त्यांना केवळ शुश्रूषाच नव्हे, तर संवाद , आदर आणि जिव्हाळ्याची नातीही मिळायला हवीत. रुबी हॉल क्लिनिकसोबत सहयोग करून शारीरिक आरोग्य, भावनिक कल्याण आणि दैनंदिन सुरक्षितता हे सर्व एकत्र जोडले जातील अशी प्रणाली आम्ही विकसित करीत आहोत. आमचे उद्दिष्ट सोपे आहे. ते म्हणजे ज्येष्ठांनी त्यांची मुले कुठेही राहत असली तरी अधिक समृद्ध, आनंदी जीवन जगावे.”

 

या दूरदृष्टीपूर्ण सहकार्यामुळे रुबी हॉल क्लिनिक आणि इमोहा एल्डरकेअर ज्येष्ठांच्या आरोग्यसेवेकडे नव्या दृष्टीने पाहण्याचा मजबूत पाया रचत आहेत—एक असा दृष्टिकोन जो सुरक्षितता, संवाद आणि सातत्यपूर्ण वैद्यकीय सेवा यांना प्राधान्य देतो. कुटुंबे वाढत्या प्रमाणात जागतिक जीवनशैली स्वीकारत असताना, असे सहयोग अत्यंत महत्त्वाचे ठरतात, कारण ते ज्येष्ठांच्या आधार, आदर आणि संरक्षणाची खात्री देतात. ज्येष्ठांच्या सेवेत केवळ उपचार पुरेसे नाहीत—तर सन्मान, सहवास आणि सर्वांगीण कल्याणाचा सामावेश अत्यावश्यक आहे हे या सहकार्यामुळे अधोरेखित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments