Friday, August 28, 2026
Google search engine
HomeUncategorizedदेवदासी व पारलिंगी माता-भगिनींसाठी दीपावली स्नेह मेळावा संपन्न

देवदासी व पारलिंगी माता-भगिनींसाठी दीपावली स्नेह मेळावा संपन्न

पुणे, दि. 19: ( जिमाका, वृत्तसेवा) : सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण आणि चंदादेवी चारिटेबल ट्रस्ट, पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने देवदासी व पारलिंगी माता-भगिनींसाठी दीपावली स्नेह मेळाव्याचे मांगल्य कार्यालय, बुधवार पेठ, पुणे येथे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विशाल लोंढे अध्यक्षतेखाली संपन्न झाले.

 

 

 

अध्यक्षीय भाषणात विशाल लोंढे यांनी तृतीयपंथी नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन व समाज कल्याण विभाग कटिबद्ध असल्याचे सांगितले. तृतीयपंथी नागरिकांनी शिक्षण घेऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. तसेच नशामुक्त भारत अभियानानिमित्त उपस्थितांना नशामुक्तीची शपथ देण्यात आली.

 

 

 

अभिनय कुंभार (IRS) यांनी तृतीयपंथी नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ घेऊन आपले जीवनमान उंचावावे, याबाबत मार्गदर्शन केले.

 

 

 

यावेळी अभिनय कुंभार , प्रधान आयुक्त, आयकर विभाग, पुणे व हृषीकेश रावले प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

 

 

 

कार्यक्रमास चंदादेवी चारिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी, तृतीयपंथी नागरिकांसाठी कार्य करणाऱ्या संस्थांचे प्रमुख तसेच सुमारे २०० तृतीयपंथी नागरिक उपस्थित होते. ट्रस्टचे संजीव अग्रवाल यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली.

 

 

 

यावेळी कार्यक्रमाच्या औचित्याने विविध शासकीय विभागांमार्फत सेवा-सुविधांचे स्टॉल उभारण्यात आले होते. यामध्ये जिल्हा पुरवठा अधिकारी, परिमंडल-ई रेशनिंग कार्यालय मार्फत शिधापत्रिका सेवा, उपजिल्हाधिकारी (महसूल) कार्यालयाकडून संजय गांधी निराधार योजनेची माहिती, आरोग्य विभागामार्फत आयुष्मान भारत कार्ड, ई-श्रम नोंदणी तसेच भूसंपादन अधिकारी, नोडल ऑफिसर-४ मार्फत आधार अद्ययावत करण्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.

 

 

 

सुमारे २०० पारलिंगी माता-भगिनींनी विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी नोंदणी केली.

 

000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments