जीई ऐरास्पेसचा पुण्यातील प्लांट आपल्या कार्यसंचालनाचे दहावे वर्ष साजरे करत असताना ही घोषणा करण्यात आली आहे
पुणे, नोव्हेंबर २०, २०२५: जीई ऐरोस्पेसने कंपनीच्या पुणे येथील उत्पादन प्लांटची क्षमता वाढवण्यासाठी १४ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स गुंतवणूकीची घोषणा केली आहे, जेथे या प्लांटने यशस्वी कार्यसंचालनांची दहा वर्ष पूर्ण केली आहे. गेल्या वर्षी घोषणा करण्यात आलेल्या ३० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या आधारावर ही गुंतवणूक आहे. नवीन गुंतवणूक अद्ययावत उत्पादन प्रक्रिया व ऑटोमेशनच्या माध्यमातून, तसेच प्रगत इंजिन कम्पोनण्ट्सना साह्य करणाऱ्या सुधारणांच्या माध्यमातून प्लांटची क्षमता अधिक दृढ करेल.
”पुण्यातील आमच्या टीमने प्रबळ क्षमता निर्माण केल्या आहेत आणि देशभरातील पुरवठादारांच्या नेटवर्कच्या पाठिंब्यासह आमच्या काही प्रगत व्यावसायिक जेट इंजिनांसाठी कम्पोनण्ट्स वितरित केले आहेत, ज्यामध्ये सुरक्षितता व दर्जाला अधिक प्राधान्य देण्यात आले आहे,” असे जीई ऐरोस्पेसचे पुण्यातील प्लांटचे व्यवस्थापकीय संचालक विश्वजीत सिंग म्हणाले. ”या गुंतवणूकीमधून मेक इन इंडिया उपक्रमाप्रती आणि जागतिक ऐरोस्पेस उत्पादनामध्ये भारताची भूमिका प्रगत करण्याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते.”’
बहु-व्यवसाय उत्पादन केंद्र म्हणून सुरूवात केलेला पुण्यातील प्लांट स्थापनेपासून जीई ऐरोस्पेसच्या जागतिक व्यावसायिक इंजिन फॅक्टरींसाठी उच्च तंत्रज्ञानाच्या ऐरोस्पेस पार्ट्सचा पुरवठादार बनला आहे. आज, पुण्यातील या प्लांटला सेवा देणऱ्या ३०० हून अधिक पुरवठादारांच्या नेटवर्कचे पाठबळ आहे, जे संपूर्ण भारतातील २,२०० हून अधिक पुरवठादार जीई ऐरोस्पेस सहयोगींपैकी आहेत. गेल्या १० वर्षांमध्ये प्लांटने ५,००० हून अधिक उत्पादन सहयोगींना अचूक उत्पादन प्रक्रियेमध्ये प्रशिक्षण दिले आहे, तसेच स्थानिक टॅलेंट घडवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे. हा प्लांट ISO14001 व ISO45001 प्रमाणित आहे, ज्यामधून शाश्वतता व ऑपरेशनल उत्कृष्टतेप्रती जीई ऐरोस्पेसची कटिबद्धता दिसून येते.
या प्लांटच्या यशाचे श्रेय जीई ऐरोस्पेसचे मालकीहक्काचे लीन ऑपरेटिंग मॉडेल फ्लाइट डेकला जाते, जे सुरक्षितता, दर्जा व कार्यक्षमतेवर भर देते. फ्लाइट डेकसह प्लांटने अपव्यय कमी केला आहे, प्रक्रिया कार्यक्षमता सुधारली आहे आणि शॉप-फ्लोअर सुरक्षितता वाढवण्यासोबत आऊटपुट वाढवले आहे. महत्त्वपूर्ण कम्पोनण्टसाठी नवीन लाइनसंदर्भात या प्लांटने कमी वेळ, उच्च उत्पादकता आणि कमी डाऊनटाइम देखील संपादित केला आहे.


