Friday, August 28, 2026
Google search engine
HomeUncategorizedचंपाषष्ठी उत्सवानिमित्त कसब्यात भारूड कार्यक्रम शुक्रवारी (दि.२१) नवदिप तरुण मंडळ ट्रस्ट तर्फे...

चंपाषष्ठी उत्सवानिमित्त कसब्यात भारूड कार्यक्रम शुक्रवारी (दि.२१) नवदिप तरुण मंडळ ट्रस्ट तर्फे आयोजन ; विनोदातून समाज प्रबोधनाचा प्रयत्न

पुणे : विनोदातून समाज प्रबोधनाचा प्रयत्न करीत महाराष्ट्राची पारंपरिक कला आजच्या पिढीसमोर यावी, या उद्देशाने चंपाषष्ठी उत्सवानिमित्त कसबा पेठेत भारूड कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. फडके हौद चौकाजवळील नवदिप तरुण मंडळ ट्रस्ट तर्फे शुक्रवार, दि. २१ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती आयोजक व अध्यक्ष तुषार शिंदे यांनी दिली.

 

जनाजागृती भारूड मंडळ, आळंदी देवाची हे कार्यक्रम करणार असून गोविंद महाराज गायकवाड व सहकारी सादरीकरण करणार आहेत. भारूड हा एक मराठी काव्यप्रकार आहे, ज्यामध्ये संगीत, कविता आणि नाट्य यांचा संगम असतो आणि तो सामाजिक व धार्मिक संदेश देतो. संत एकनाथ यांनी या लोककलेला खूप लोकप्रिय केले, जरी संत नामदेव, ज्ञानेश्वर, तुकाराम आणि रामदास यांनीही भारुडे लिहिली. भारुडात वरवरच्या गोष्टींमागे खोल आध्यात्मिक अर्थ दडलेला असतो. त्यामुळे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही तुषार शिंदे यांनी केले आहे

.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments