Friday, August 28, 2026
Google search engine
HomeUncategorizedजागतिक मुदतपूर्व प्रसूती (प्रिमॅच्युअर) दिनानिमित्त पुण्यात प्रीमेथॉन २०२५ चे आयोजन

जागतिक मुदतपूर्व प्रसूती (प्रिमॅच्युअर) दिनानिमित्त पुण्यात प्रीमेथॉन २०२५ चे आयोजन

अंकुरा हॉस्पिटल, AAYU फाउंडेशनचा अनोखा उपक्रम – मुदतपूर्व प्रसूती (प्रिमॅच्युअर) करिता जनजागृतीपर दौड

 

 

 

पुणे: अंकुरा हॉस्पिटल ही एक आघाडीची माता आणि बाल आरोग्य सेवा संस्था असून या संस्थेच्या पुढाकाराने तसेच AAYU फाउंडेशनच्या सहकार्याने, जागतिक मुदतपूर्व प्रसूती (प्रिमॅच्युअर) दिनानिमित्त पालकांमध्ये याविषयी जागरूकता पसरवण्यात आली. अकाली जन्मलेल्या बाळाची काळजी कशी घ्यावी, काय खबरदारी घ्याल त्याचबरोबर प्रगत वैद्यकीय मदतीचे यावेळी पटवून देण्यात आले. दरवर्षी अनेक बाळांची मुदतपूर्व प्रसूती (प्रिमॅच्युअर) होते आणि त्यांना नवजात शिशुंच्या अतिदक्षता विभागांमध्ये (NICUs) विशेष काळजीची आवश्यकता भासते. ‘खूप लवकर जन्माला झाला पण सुरक्षित हातात’ (Born too soon but in safest hands) या संकल्पनेतंर्गत या राष्ट्रीय मोहिमेचे आयोजन करण्यात आले.

 

पुण्यातील पीडब्ल्यूडी ग्राउंड येथे आयोजित करण्यात आली आलेल्या प्रीमेथॉनला माजी नगरसेवक (पीसीएमसी) श्री. अतुल शितोळे यांची प्रमुख उपस्थित होती. त्यांनी या उपक्रमाला पाठिंबा देत अंकुरा हॉस्पिटलचे कौतुक केले.

 

या प्रीमेथॉनमध्ये डॉक्टर, पालक, वैद्यकीय कर्मचारी आणि स्वयंसेवक सहभागी झाले होते. या ठिकाणी मुदतपूर्व प्रसूती झालेल्या चिमुकल्या योद्ध्यांचे कौतुक करण्यात आले. जनजागृती फलक, घोषवाक्य आणि संदेशांच्या माध्यमातून सहभागींनी मुदतपूर्व जन्म, वेळीच निदान आणि नवजात बाळाचा जीव वाचवण्यात एनआयसीयू विभागाची महत्त्वाची भूमिका याबद्दल जागरूकता निर्माण केली.

 

गर्भधारणेचे ३७ आठवडे पूर्ण होण्यापूर्वी बाळ जिवंतपणे जन्माला आल्यास त्याची व्याख्या मुदतपूर्व (प्रीमॅच्युअर) बाळ अशी केली जाते. अशा बाळांना जन्मानंतर सुरुवातीच्या दिवसांत श्वास घेण्यास त्रास होणे, संसर्ग होणे, आहारासंबंधी समस्या आणि तापमानातील अस्थिरता यासारख्या अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते. या साऱ्या आव्हानांवर मात करत ही बाळं जगण्याची लढाई यशस्वीपणे पार पाडतात. जागतिक मुदतपूर्व प्रसूती (प्रिमॅच्युअर) दिनानिमित्त प्रीमेथॉन सारख्या उपक्रमातून प्रेम, जागरूकता आणि आशेचा किरण निर्माण करत मुदतपूर्व प्रसूती (प्रिमॅच्युअर) झालेले कुटुंबियांना भावनिकदृष्ट्या आधार देतात.

 

मुदतपूर्व प्रसूती (प्रिमॅच्युअर) झालेल्या पालकांच्या धाडसाचे कौतुक करत त्यांना हा प्रवास आणखी सुखकर करा करता येईल याविषयी जागरुक करते. व्हेंटिलेटर सपोर्ट आणि थर्मल रेग्युलेशनपासून ते संसर्ग नियंत्रण आणि बाळाचे योग्य पोषण, उपचार तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे जगण्याचा दर सुधारला आहे अशी प्रतिक्रिया अंकुरा हॉस्पिटल फॉर वुमन अँड चिल्ड्रनचे वैद्यकिय संचालक डॉ. सिद्धार्थ मदभूशी यांनी व्यक्त केली.

 

अंकुरा हॉस्पिटलमध्ये बाळाच्या हृदयाचा प्रत्येक ठोका महत्त्वाचा असतो. अकाली जनामलेल्या बाळाला सर्वोत्तम काळजी मिळावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, कारण जन्माला आलेल्या बाळाला जगण्याची उत्तम संधी मिळायला हवी. अकाली जन्मलेल्या बाळांना निरोगी भविष्य उपलब्ध करुन देण्यासाठी अंकुरा हॉस्पिटल सदैव प्रयत्नशील आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments