पुणे, दि. 26 – भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था आणि हेरिटेज इंडिया कम्युनिकेशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक आणि वैचारिक विषयांवरील “मंथन” व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष भूपाल पटवर्धन आणि हेरिटेज इंडियाच्या प्रमुख मंजिरी खांडेकर यांनी आज येथे दिली.
मार्च 2024 ते फेब्रुवारी 2025 या एक वर्षाच्या कालावधीत दर महिन्याच्या दुसर्या शनिवारी सायं. 5.30 ते 6.30 भांडारकर संस्थेच्या ॲम्फी थिएटरमध्ये ही व्याख्यानमाला होणार आहे. सर्व वयोगटासाठी खुल्या असलेल्या या व्याख्यानमालेसाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे. वार्षिक सभासद योजनेअंतर्गत ही व्याख्यानमाला सशुल्क आहे. (नोंदणीकरिता संपर्क मोबा. 9922442238 किंवा 9766375436)
————————————-
*भांडारकर संस्थेत दरमहिन्याला “मंथन” व्याख्यानमाला*
RELATED ARTICLES


