Friday, August 28, 2026
Google search engine
HomeUncategorizedव्‍हॅल्‍यू ३६० कम्‍युनिकेशन्‍सला प्रस्‍तावित एसएमई आयपीओसाठी एनएसईकडून तत्वत: मंजूरी मिळाली

व्‍हॅल्‍यू ३६० कम्‍युनिकेशन्‍सला प्रस्‍तावित एसएमई आयपीओसाठी एनएसईकडून तत्वत: मंजूरी मिळाली

व्‍हॅल्‍यू ३६० कम्‍युनिकेशन्‍स लिमिटेडने आज घोषणा केली की, कंपनीला एनएसईच्‍या इमर्ज प्‍लॅटफॉर्मवर (एनएसई इमर्ज) त्‍यांचे इक्विटी शेअर्स सूचीबद्ध करण्‍यासाठी नॅशनल स्‍टॉल एक्‍स्‍चेंज ऑफ इंडिया (एनएसई)कडून तत्‍वत: मंजूरी मिळाली आहे, ज्‍यासाठी कंपनीने सर्व नियामक आवश्‍यकतांची, तसेच आवश्‍यक औपचारिकतांची पूर्तता करणे आवश्‍यक आहे.

कंपनीचे ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (डीआरएचपी) दाखल केल्यानंतर मिळालेली ही तत्वतः मंजूरी महत्त्वपूर्ण नियामक टप्पा आहे. ही मंजूरी म्‍हणजे इश्‍यूला पुष्‍टी मिळाल्‍याचा किंवा सादर करण्‍यात आलेल्‍या सिक्‍युरिटीजना मान्‍यता मिळाल्‍याचा अर्थ होत नाही. कंपनीने रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (आरएचपी), प्रॉस्पेक्टस दाखल करणे, तसेच एनएसई व सेबीने (SEBI) निर्धारित केलेल्या सर्व अटी पूर्ण करणे यावर अंतिम मंजूरी अवलंबून असेल.

व्‍हॅल्‍यू ३६० कम्‍युनिकेशन्‍स एकीकृत कम्‍युनिकेशन्‍स कंपनी आहे, जी जनसंपर्क, डिजिटल कम्‍युनिकेशन्‍स, सर्जनशील धोरण आणि प्रतिष्‍ठेचे व्‍यवस्‍थापन यांमधील ब्रँड्ससोबत सहयोगाने काम करते. कंपनीच्‍या प्रस्‍तावित लिस्टिंगचा त्‍यांच्‍या समूह कंपन्‍यांमधील क्षमता प्रबळ करण्‍याच्‍या आणि त्‍यांची सेवा परिसंस्‍था विस्‍तारित करण्‍याच्‍या त्‍यांच्‍या दीर्घकालीन दृष्टिकोनाला पाठिंबा देण्‍याचा मनसुबा आहे.

व्‍हॅल्‍यू ३६० कम्‍युनिकेशन्‍स लिमिटेडचे अध्‍यक्ष व व्‍यवस्‍थापकीय संचालक कुणाल किशोर म्‍हणाले, ”आम्‍ही एनएसईकडून मिळालेल्‍या तत्‍वत: मंजूरीचे स्‍वागत करतो. हे एकूण नियामक प्रक्रियेमधील प्रक्रियात्‍मक पाऊल आहे आणि आम्‍ही लागू असलेल्‍या मार्गदर्शकतत्त्वांशी बांधील राहत सर्व अनुपालन आवश्‍यकतांची पूर्तता करण्‍यावर लक्ष केंद्रित केले आहे.”

कंपनी सेबी व एक्‍स्‍चेंज नियमन अंतर्गत आवश्‍यक असल्‍यानुसार सर्व प्रकटीकरण नियमांचे पालन करेल. पुढील कोणतेही अपडेट योग्‍य वैधानिक माध्‍यमांद्वारे कळवण्‍यात येतील.

 

अनिवार्य अस्वीकृती

लागू असलेल्या नियामक मार्गदर्शकतत्त्वांना अनुसरून ही घोषणा केली जात आहे. एनएसईने दिलेली तत्वतः मंजूरी म्‍हणजे सिक्युरिटीजसाठी मान्यता मिळाल्‍याचा अर्थ होत नाही किंवा कंपनी, कंपनीच्‍या प्रवर्तकांच्या किंवा इश्यूच्या उत्तम दर्जाचे संकेत म्हणून मानली जाऊ नये. कंपनीने सर्व नियामक आवश्यकता पूर्ण केल्या आणि अंतिम मंजूरी मिळाल्यानंतरच लिस्टिंग करण्‍यात

येईल.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments