Monday, August 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedचेंबरलेन ग्रुप तर्फे पुण्यात आघाडीची स्मार्ट ऍक्सेस सोल्युशन्ससाठी इनोव्हेशन सेंटर चे अनावरण

चेंबरलेन ग्रुप तर्फे पुण्यात आघाडीची स्मार्ट ऍक्सेस सोल्युशन्ससाठी इनोव्हेशन सेंटर चे अनावरण

पुणे, २७ फेब्रुवारी, २०२४: चेंबरलेन ग्रुप (सीजी) आघाडीची स्मार्ट ऍक्सेस सोल्यूशन्स आणि ब्लॅकस्टोन पोर्टफोलिओ कंपनीने चेंबरलेन ग्रुप पुणे इनोव्हेशन सेंटर (सीपीआयसी) हे आपल्या समूहाचे नवीन अभियांत्रिकी केंद्र सुरू करण्याची घोषणा केली आहे. चेंबरलेन ग्रुपच्या नाविन्यपूर्ण आयओटी उत्पादनांमध्ये मायक्यू तंत्रज्ञानाद्वारे संचलित गॅरेज डोअर ओपनर्स, गेट ऑपरेटर, कमर्शियल डोअर ओपनर्स आणि डॉक-लेव्हल ओपनर्स यांचा समावेश आहे .

सीपीआयसी हे कंपनीचे दुसरे सर्वांत मोठे अभियांत्रिकी विकास केंद्र असेल जे 10,000 चौरस फूट अशा भव्य जागेत विस्तारलेली अत्याधुनिक सुविधा असून पुण्यात विमाननगर आयटी हब मधील अमर टेक सेंटर येथे स्थित आहे. येथे जावा,मिडलवेअर,एम्बेडेड फर्मवेअर आणि हार्डवेअर,वेब व मोबाईल डेव्हलपमेंट,डाटा इंजिनिअरींग, क्लाऊड आणि डेव्हलपमेंट ऑपरेशन्स, जनरेटिव्ह एआय आणि क्यूई मध्ये प्राविण्य असलेले 50 अभियंते सध्या कार्यरत असून पुढील दोन वर्षात ही संख्या 150 पर्यंत पोहचेल. चेंबरलेन ग्रुपचा पुण्यात सीपीआय स्थापना करण्याचा निर्णय हा कंपनीच्या हार्डवेअर कंपनीपासून सॉफ्टवेअर केंद्रित आयओटी नेतृत्व करणारी कंपनी या परिवर्तनात कार्य संघाच्या डिजिटल अभियांत्रिकी कौशल्यांमध्ये वाढ करण्याच्या व्यापक दृष्टीकोनाशी सुसंगत आहे.

चेंबरलेन ग्रुप चे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी डॅन फिलिप्स म्हणाले की,”गेली 50 वर्षांहून अधिक काळ आम्ही नाविन्यपूर्ण हार्डवेअर उत्पादने विकसित करत होतो आणि आता मायक्यू इको सिस्टिम केंद्रस्थानी ठेवत एसएएएस मध्ये आघाडीवर जाण्याच्या परिवर्तनात आहोत. हे नवीन इनोव्हेशन सेंटर आमच्या परिवर्तनात आणि अभियांत्रिकी उत्कृष्टता मिळविण्याच्या आमच्या ध्येयामध्ये प्रमुख भूमिका बजावेल.”

चेंबरलेन ग्रुप ने ब्लॅकस्टोनचा भाग असलेला व डिजिटल प्रॉडक्ट इंजिनिअरींगमध्ये जागतिक पातळीवर आघाडीवर असलेल्या आर सिस्टिम्सशी या प्रवासात भागीदारी केली आहे.

आर सिस्टिम्स इंटरनॅशनल लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक नितेश बन्सल म्हणाले की,”चेंबरलेनचे पसंतीचे भागीदार म्हणून या धोरणात्मक सहकार्यामध्ये कौशल्य आणि सांस्कृतिक संरेखन याचा योग्य मिलाफ आणण्यासाठी आम्ही वचनबध्द आहोत.स्मार्ट अ‍ॅक्सेस सोल्युशन्सच्या भविष्याला आकार देण्याच्या चेंबरलेन ग्रुपच्या ध्येयपूर्तीसाठी डिजिटल इंजिनिअरींगमधील आमचे प्राविण्य आणि प्रतिभेला प्रोत्साहन देत योगदान देण्यास आम्ही उत्सुक आहोत.”

आर सिस्टिम्स ने सीपीआयसी साठी नवीन प्रतिभेची नियुक्ती,प्रशिक्षण,कामकाजामध्ये कार्यान्वयन आणि सीपीआयसीसाठी लोकांना सज्ज करणे याची जबाबदारी घेतली आहे.आर सिस्टिम्सचे डीप इंजिनिअरींग आणि डोमेन कौशल्य,नेतृत्व बांधिलकी आणि संरेखित संघ तयार करण्याची क्षमता या अद्वितीय बाबींमुळे चेंबरलेन ग्रुप ने आर सिस्टिम्सला पसंतीचे भागीदार म्हणून निवडण्याचा निर्णय घेतला.

चेंबरलेन ग्रुपच्या भारतातील कामकाजाचे प्रमुख जिग्नेश शहा म्हणाले की,”सीपीआयसी चे उद्घाटन म्हणजे स्मार्ट अ‍ॅक्सेस सोल्युशन्समध्ये अभिनवता आणि जागतिक उत्कृष्टततेच्या आमच्या प्रवासामध्ये एक महत्त्वाचा क्षण आहे.भारत हा चेंबरलेन ग्रुपसाठी वैविध्यपूर्ण आणि कुशल अभियंत्यांचा सर्वांत मोठा स्त्रोत असून एकत्रितपणे उद्योग मानके पुन्हा परिभाषित करणे आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान पुढे आणण्याचे आमचे ध्येय आहे.”

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments