भारत, फेब्रुवारी २७, २०२४: लिंक्डइन या जगातील सर्वात मोठ्या व्यावसायिक नेटवर्कने त्यांचा नवीन वर्कप्लेस लर्निंग रिपोर्ट रीलीज केला आहे, ज्यामधून निदर्शनास येते की एआय कामाच्या पद्धतीला नवीन आकार देत असल्यामुळे भारतातील ९४ टक्के कंपन्यांची या वर्षात त्यांच्या कर्मचाऱ्यांची कौशल्ये व क्षमतांमध्ये वाढ करण्याची योजना आहे. या अहवालाच्या मते, कर्मचाऱ्यांचे अपस्किल, व्यवसाय ध्येयांप्रती संलग्न लर्निंग प्रोग्राम्स आणि लर्निंग संस्कृती निर्माण करणे हे २०२४ मध्ये भारतातील लर्निंग अॅण्ड डेव्हलपमेंट (एलअॅण्डडी) व्यावसायिकांसाठी टॉप ३ फोकस क्षेत्रे आहेत.
सॉफ्ट स्किल्स महत्त्वपूर्ण, जेथे १० पैकी ९ एलअॅण्डडी व्यावसायिक मानवी कौशल्यांना प्राधान्य देतात
एआय आणि ऑटोमेशनमुळे झपाट्याने बदलत असलेल्या कौशल्य गरजांसंदर्भात भारतातील ९८ टक्के नियोक्त्यांनी रोजगारासाठी उमेदवारांमध्ये प्राधान्य देणाऱ्या कौशल्यांमध्ये परिवर्तनाचा उल्लेख केला आहे. कंपन्या आता एआय कौशल्यासह सॉफ्ट स्किल्स आणि लर्निंगची क्षमता असलेल्या उमेदवारांना महत्त्व देतात.
या अहवालामधून निदर्शनास येते की, भारतातील ९१ टक्के एलअॅण्डडी व्यावसायिक अर्थव्यवस्थेमधील वाढत्या स्पर्धेमुळे मानवी कौशल्यांना महत्त्व देतात. भारतासह एपीएसीमधील सर्व देशांमध्ये ‘कम्युनिकेशन’ २०२४ मधील लिंक्डइनच्या सर्वात मागणीदायी स्किल्स यादीमध्ये अव्वलस्थानी आहे. आमच्या संशोधनामधून निदर्शनास येते की, महत्त्वपूर्ण विचारसरणी आणि समस्या-निवारण यासारखी सॉफ्ट स्किल्स एआयच्या युगामध्ये भारतातील हायरिंग व्यवस्थापक महत्त्व देणाऱ्या टॉप पाच स्किल्समध्ये आहेत.
लिंक्डइन इंडियाच्या टॅलेंट, लर्निंग अॅण्ड एंगेजमेंट सोल्यूशन्सच्या वरिष्ठ संचालक रूची आनंद म्हणाल्या, ”गेल्या वर्षी लिंक्डइनवर चॅटजीपीटी किंवा जीपीटीचा उल्लेख करणाऱ्या जॉब पोस्टिंग्जमध्ये २१ पट वाढ दिसण्यात आली, ज्यामधून व्यवसाय एआयला प्राधान्य देत असताना टेक स्किल्ससाठी वाढती मागणी दिसून येते. यंदा, एआय युगामध्ये टिकून राहण्यासाठी टेक्निकल व सॉफ्ट स्किल्समध्ये मोठे परिवर्तन दिसून आले आहे. जागतिक स्तरावर रोजगारांसाठी कौशल्यांमध्ये २०३० पर्यंत बदल होण्याची अपेक्षा असल्यामुळे टेक्निकल व सॉफ्ट स्किल्स शिकण्याला अधिक प्राधान्य दिले जात आहे. सर्वेक्षण करण्यात आलेल्या बहुतांश नियोक्त्यांनी मान्य केले की, हे संतुलन कंपन्यांसाठी एआय युगामध्ये यशस्वी होण्याकरिता महत्त्वाचे ठरेल.”
एलअॅण्डडी व्यावसायिक सातत्यपूर्ण लर्निंग संस्कृतीमध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत
भारतातील कंपन्या अधिक आत्मविश्वास व रोजगार सुरक्षिततेसाठी कर्मचाऱ्यांची कौशल्ये वाढवण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत, ज्यासाठी ऑनलाइन प्रशिक्षण व विकास उपक्रम (५३ टक्के) प्रदान करण्यास जेन एआय टूल्ससह प्रत्यक्ष प्रात्याक्षिकासाठी संधी (५४ टक्के) प्रदान करत आहे.
लर्निंग संस्कृती निर्माण करण्यावरील हा वाढता फोकस लर्निंग संधींमध्ये गुंतवणूकांमध्ये वाढ करेल. खरेतर, भारतातील ९६ टक्के एलअॅण्डडी व्यावसायिक म्हणतात की ते कर्मचाऱ्यांना विविध अंतर्गत भूमिकांमध्ये सामावून जाण्यासाठी कौशल्ये संपादित करण्यास मदत करत व्यवसाय मूल्य दाखवू शकतात.
अंतर्गत गतीशीलतेच्या माध्यमातून टॉप टॅलेंटचे लक्ष वेधून घेणे आणि कायम ठेवणे
लिंक्डइनच्या अहवालामधून निदर्शनास येते की, भारतातील ४८ टक्के हायरिंग व्यवस्थापक त्यांच्या विद्यमान कर्मचाऱ्यांना करिअरमध्ये प्रगती करण्याच्या संधी देत आहेत. त्यांचा विश्वास आहे की ‘कर्मचाऱ्यांना भावी कामासाठी आवश्यक कौशल्ये संपादित करण्यामध्ये मदत करणे’ (३८ टक्के) आणि ‘स्पर्धात्मक वेतन व फायदे प्रदान करणे’ (३१ टक्के) हे टॉप टॅलेंटना कायम ठेवण्यासाठी महत्त्वाचे आहेत.
तसेच, भारतातील हायरिंग व्यवस्थापकांचा विश्वास आहे की, ‘करिअरमध्ये प्रगती करण्याच्या संधी दाखवणे’ (५९ टक्के) आणि ‘अंतर्गत गतीशीलता वाढवणे’ (५१ टक्के) हे टॉप टॅलेंटचे लक्ष वेधून घेण्यासाठी महत्त्वाचे आहेत.
लिंक्डइनकडून कंपन्यांना टॅलेंटची नियुक्ती, अपस्किल व विकसित करण्यास मदत करण्यासाठी एआय-समर्थित वैशिष्ट्ये सादर
कंपन्यांना त्यांची एलअॅण्डडी आणि टॅलेंट ध्येये संपादित करण्यासाठी कौशल्य-केंद्रित दृष्टिकोनामध्ये साह्य करण्यासाठी लिंक्डइनने नाविन्यपूर्ण एआय-समर्थित अनुभव सादर केले आहेत, जसे:
टूल्स जसे लिंक्डइनचे एआय-असिस्टेड रिक्रूटिंग अनुभव रिक्रूटर २०२४ हायरर्सना नैसर्गिक लँग्वेज सर्च प्रॉम्प्ट्स आणि लाखो व्यावसायिक व कंपन्यांकडून संपन्न डेटाचा उपयोग करत उच्च दर्जाच्या उमेदवार शिफारशी जलदपणे उपलब्ध करून देते, ज्यामुळे ते आवश्यक असलेल्या कौशल्यांनुसार टॅलेंटना शॉर्टलिस्ट करण्याची खात्री मिळते. ही वैशिष्ट्ये फेब्रुवारी अखेरपर्यंत इंग्रजी-भाषिक बाजारपेठांमधील लिंक्डइनच्या एपीएसी ग्राहकांना उपलब्ध होतील.
कंपन्यांना पुढील दशकातील कामासाठी आवश्यक असलेली कौशल्ये निर्माण करण्यास सक्षम करण्याकरिता लिंक्डइनने लिंक्डइन लर्निंगमध्ये एआय-समर्थित कोचिंग लाँच केले आहे. हा चॅटबोट अनुभव लर्नर्स त्यांचे रोजगार, करिअर ध्येय व त्यांच्यामध्ये असलेल्या कौशल्यांवर आधारित रिअल-टाइम सल्ला आणि सर्वोत्तम वैयक्तिक कन्टेन्ट शिफारशी देतो. हे सध्या इंग्रजी-भाषिक बाजारेपठांमधील एपीएसी ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. लिंक्डइनने त्यांच्या इन-डिमांड स्किल्स लायब्ररीसह एआय कोर्सेस वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले आहे, जेथे एआय कोर्सेसच्या लर्नर्समध्ये ५ पट वाढ दिसण्यात आली आहे.
मार्च महिन्याच्या सुरूवातीला लिंक्डइन कर्मचाऱ्यांना महत्त्वपूर्ण कौशल्यांसंदर्भात मार्गदर्शन करण्यास, विकासाकरिता महत्त्वाची असलेली कौशल्ये विकसित करण्यास आणि त्यांच्या कंपन्यांमधील सर्वोत्तम संधींशी कनेक्ट करण्यास मदत करण्यासाठी नवीन करिअर विकास व अंतर्गत गतीशीलता वैशिष्ट्ये लाँच करणार आहे. ही वैशिष्ट्ये इंग्रजी, हिंदी, जॅपनीज, इंडोनेशियन आणि मलाय या भाषांमध्ये उपलब्ध असतील.


