Monday, August 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedभारतात झालेल्या सर्वेक्षणात सहभागी प्रौढांपैकी ८३.५ टक्के शिंगल्सचा धोका गांभीर्याने घेत नसल्याचा...

भारतात झालेल्या सर्वेक्षणात सहभागी प्रौढांपैकी ८३.५ टक्के शिंगल्सचा धोका गांभीर्याने घेत नसल्याचा ग्लोबल जीएसके सर्वेक्षणाचा निष्कर्ष

● जगभरातील 3 पैकी एका व्यक्तीला आयुष्यभरात कधी तरी शिंगल्सचा (नागिणीसारखा आजार) त्रास होतो5
● शिंगल्सच्या वेदना साधारणपणे दुखणे, जळजळ, टोचल्यासारखा आणि धक्का बसल्यासारख्या असतात असे वर्णन केले जाते1
● भारतातील निम्म्याहून अधिक इंग्रजी व हिंदी भाषक उत्तरदात्यांच्या मते (अनुक्रमे ५५ टक्के व ७६ टक्के) शिंगल्स हा आजार फारसा धोकादायक नाही5

राष्ट्रीय, २८ फेब्रुवारी २०२४: ग्लॅक्सोस्मिथक्लाइन फार्मास्युटिकल्स लिमिटेडने निधी पुरवून जगभरात करवून घेतलेल्या सर्वेक्षणातील ताजी आकडेवारी आज प्रसिद्ध केली. शिंगल्स (नागिणीसारखा आजार) होण्याचा सर्वाधिक धोका असलेल्या ५० वर्षांहून अधिक वयाच्या लोकांमध्ये याबद्दलच्या जागरूकतेचा दखल घेण्याजोगा अभाव असल्याचे सर्वेक्षणात आढळले आहे.5, 6 ह्या सर्वेक्षणात १२ देशांतील ३,५००हून अधिक ५० वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्तींचा समावेश होता. शिंगल्स हा आजार, तो कशामुळे होतो, त्याचा रुग्णाच्या आयुष्यावर काय परिणाम होतो ह्याबद्दल उत्तरदात्यांना किती माहिती आहे ह्याचे मूल्यांकन सर्वेक्षणाद्वारे करण्यात आले.5 भारतातील सर्वेक्षणात ५०० व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. त्यात २५० हिंदी भाषक होते, तर अन्य २५० इंग्रजी बोलणारे होते. शिंगल्स अवेअरनेस वीक २०२४ (२६ फेब्रुवारी २०२४ ते ३ मार्च २०२४) दरम्यान ही आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. शिंगल्स हा आजार आणि त्याचे प्राणघातक परिणाम ह्यांबद्दल विस्तृत स्तरावर अज्ञान असल्याचे सर्वेक्षणात आढळले.

सर्वेक्षणात सहभागी झालेल्यापैकी लक्षणीय प्रमाणातील व्यक्तींना शिंगल्स होण्याचा धोका समजत नसल्याचे सर्वेक्षणात नोंदवण्यात आले आहे, ८६ टक्के उत्तरदात्यांनी हा धोका फारसा गांभीर्याने घेतला नाही.5 भारतात इंग्रजी भाषक उत्तरदात्यांपैकी ८१ टक्क्यांनी तर हिंदी भाषक उत्तरदात्यांपैकी ८६ टक्क्यांनी शिंगल्सचा धोका फारसा वाटत नसल्याचे सांगितले5. १०० पैकी एका व्यक्तीला आयुष्यात कधीतरी शिंगल्स होण्याचा धोका आहे, असे जगभरात सुमारे एक चतुर्थांश व्यक्तींना (२६ टक्के) वाटते, एक पंचमांश लोकांना (१७ टक्के) हा धोका १०००मध्ये एकाला आहे असे वाटते, तर सुमारे निम्म्या जणांना (४९ टक्के) शिंगल्स होण्याची शक्यताच नाही, असे वाटते.5 भारतात, इंग्रजी भाषक उत्तरदात्यांपैकी २२ टक्क्यांच्या मते, १०००पैकी एका व्यक्तीला शिंगल्स होण्याचा धोका असतो.5 हिंदी भाषक उत्तरदात्यांपैकी १८ टक्क्यांच्या मते, १०००पैकी एका प्रौढाला शिंगल्स होण्याचा धोका असतो.5

प्रत्यक्षात बहुतेक प्रौढांच्या शरीरामध्ये वयाच्या ५०व्या वर्षापर्यंत शिंगल्सला कारणीभूत ठरणारा विषाणू शिरलेला असतोच आणि वय वाढल्यानंतर तो विषाणू सक्रिय होतो.6, 7 व्हेरिसेला-झोस्टर विषाणू (व्हीझेडव्ही) पुन्हा सक्रिय झाल्यामुळे शिंगल्स हा आजार होतो. ह्याच विषाणूमुळे कांजण्या होतात.1 वाढत्या वयासोबत व्यक्तीमधील प्रादुर्भावाला प्रतिकार करण्याची शक्ती कमी होत जाते आणि शिंगल्ससारखा आजार होण्याचा धोका वाढत जातो.1

शिंगल्समुळे होणाऱ्या वेदनांबाबतही जागरूकतेचा अभाव असल्याचे सर्वेक्षणात दिसून आले. ह्या आजाराचे लक्षण साधारणपणे पुरळ हे असते. त्यासोबत छाती, ओटीपोट किंवा चेहऱ्यावर वेदनादायक फोड येतात. ह्या वेदनेचे वर्णन बहुतेकदा दुखणे, जळजळणे, टोचणे किंवा धक्का बसल्याप्रमाणे असे केले जाते..1 तरीही जगभरातील सर्वेक्षणात सहभागी झालेल्या १० पैकी एकाही प्रौढाला शिंगल्सची सामान्य लक्षणे माहीत नाहीत. एक चतुर्थाशाहून अधिक (२८ टक्के) जणांना शिंगल्स हा आजार ‘अजिबातच प्राणघातक नाही’ असे वाटत आहे. भारतात, इंग्रजी भाषक उत्तरदात्यांपैकी ५५ टक्क्यांचे, तर हिंदी भाषक उत्तरदात्यांपैकी ७६ टक्के जणांचे हेच मत आहे.5

ग्लॅक्सोस्मिथक्लाइन फार्मास्युटिकल्स इंडियाच्या मेडिकल अफेअर्स विभागाच्या कार्यकारी उपाध्यक्ष डॉ. रश्मी हेगडे म्हणाल्या: “५० वर्षांवरील प्रौढांमध्ये शिंगल्सबाबत (नागिणीसारखा आजार) जागरूकता वाढवण्याची गरज ह्या सर्वेक्षणाच्या निष्कर्षांमधून अधोरेखित होते. शिंगल्समुळे वयस्कर प्रौढांचे दैनंदिन आयुष्य मोठ्या प्रमाणात विस्कळीत होऊ शकते आणि त्यांना हा आजार बराच त्रासदायक ठरू शकतो. शिंगल्स जागरूकता सप्ताहाच्या निमित्ताने, प्रत्येकाने ह्या वेदनादायक आजाराविषयी आणि त्याचा प्रतिबंध कसा करावा ह्याविषयी आपल्या डॉक्टरांशी बोलावे ह्यासाठी आम्ही प्रोत्साहन देतो.”
शिंगल्सचे लक्षण असलेले पुरळ आल्यानंतर व्यक्तीला पोस्ट-हर्पेटिक न्युराल्जियाची (पीएचएन) लक्षणे जाणवू शकतात. ह्या मज्जासंस्थेच्या दीर्घकाळ टिकणाऱ्या वेदना असतात. त्या काही आठवडे, महिने किंवा कधी काही वर्षेही सुरू राहतात.1 पीएचएन हा शिंगल्सनंतर सर्वाधिक प्रमाणात उद्भवणाऱ्या आजारांपैकी एक आहे. शिंगल्सच्या ५ ते ३० टक्के रुग्णांना पीएचएनचा त्रास होतो, असे विविध अभ्यासांमध्ये आढळले आहे.8 मात्र, सर्वेक्षणातील निष्कर्षानुसार, शिंगल्सची लक्षणे ६ आठवड्यांहून अधिक काळ टिकतात हे जगातील केवळ १४ टक्के व्यक्तींना माहीत आहे.5 भारतात इंग्रजी भाषक उत्तरदात्यांपैकी केवळ ८ टक्क्यांना, तर हिंदी भाषक उत्तरदात्यांपैकी ४ टक्क्यांना, शिंगल्सची लक्षणे ६ आठवड्यांहून अधिक टिकतात, असे वाटते.5
जीएसकेतर्फे शिंगल्स अवेअरनेस वीकच्या (२६ फेब्रुवारी २०२४ ते ३ मार्च २०२४) निमित्ताने सर्वेक्षणांतील ताजी आकडेवारी प्रसिद्ध केली जात आहे. जीएसके इंटरनॅशनल फेडरेशन ऑन एजिंगच्या (आयएफए) सहयोगाने ह्या अभियानाचे नेतृत्व करत आहे. शिंगल्सचे धोके व परिणामांबाबत जागरूकता वाढवणे आणि ज्ञानाचा अभाव दूर करणे हे ह्यामागील उद्दिष्ट आहे.

शिंगल्स जागरूकता सप्ताहाविषयी
शिंगल्स अवेअरनेस वीक अर्थात शिंगल्स जागरूकता सप्ताह (२६ फेब्रुवारी २०२४ ते ३ मार्च २०२४) हा, शिंगल्सच्या धोक्यांविषयी आणि तीव्रतेविषयी अज्ञान दूर करण्याच्या उद्देशाने आयोजित केला जाणारा वार्षिक जागरूकता सप्ताह आहे. इंटरनॅशनल फेडरेशन ऑन एजिंगच्या (आयएफए) सहयोगाने आयोजित केल्या जाणाऱ्या शिंगल्स अवेअरनेस वीकचे उद्दिष्ट प्रौढांमध्ये, विशेषत: ५० वर्षांवरील प्रौढांमध्ये आणि त्यांच्या डॉक्टर्समध्ये शिंगल्सविषयी माहितीपूर्ण संभाषणे सुरू करण्यास प्रोत्साहन देणे हे आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments