प्रस्तावाचे ठळक मुद्दे :
– प्रक्रिया शुल्कात सवलत
– फ्लोटिंग व्याज दरासाठी शून्य प्रीपेमेंट शुल्क
– डेली रीडयूसिंग बॅलन्स पद्धतीवर व्याज मोजले जाते
– दीर्घ परतफेडीचा कालावधी 84 महिन्यांपर्यंत
मुंबई, 28 फेब्रुवारी 2024: भारतातील आघाडीच्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक असलेल्या बँक ऑफ बडोदा’ने (Bank of Baroda) आज वार्षिक 8.75%* पासून सुरू होणाऱ्या कार कर्जाच्या व्याजदरात (पूर्वीचा व्याज दर 9.40%* वार्षिक) कपात करण्याची घोषणा केली. दिनांक 26 फेब्रुवारी 2024 पासून 31 मार्च 2024 पर्यंतच्या बडोदा कार लोन फ्लोटिंग रेट ऑफ इंटरेस्टवर ही विशेष मर्यादित कालावधीची ऑफर आहे. बँकेच्या वतीने वार्षिक 8.85%* पासून सुरू होणाऱ्या बडोदा कार लोनवर आकर्षक स्थिर (फिक्स्ड) व्याज दर देखील देण्यात येतात.
नवीन दर वार्षिक 8.75% पासून सुरू होत असून ते नवीन गाडीच्या खरेदीवर लागू होतात आणि कर्जदाराच्या क्रेडिट प्रोफाइलशी जोडलेले असतात. याव्यतिरिक्त, बँक कर्जदारांना फ्लोटिंग रेट ऑफ इंटरेस्ट पर्यायावर शून्य प्रीपेमेंट शुल्क आणि फिक्स्ड व फ्लोटिंग पद्धतीच्या व्याज दर पर्यायांवर प्रक्रिया शुल्कात सवलत देण्यात येत आहे.
पुढे, बँक ऑफ बडोदा कार लोनवरील व्याज (फिक्स्ड आणि फ्लोटींग, दोन्ही) डेली रीडयूसिंग बॅलन्स पद्धतीवर मोजले जाते, ज्यामुळे कर्जदारांच्या दृष्टीने ते अधिक परवडणारे ठरते. बँकेतर्फे जवळपास 84 महिन्यांपर्यंतचा वाढीव परतफेडीचा कालावधी देखील देण्यात येतो. परिणामी कर्जदारांना कमी समतुल्य मासिक हप्त्यांची लवचिकता (सुलभ मासिक हफ्ते) मिळते.
बँक ऑफ बडोदा’चे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर श्री संजय मुदलीयार म्हणाले, “भारतीय अर्थव्यवस्थेतील सातत्यपूर्ण सुधारणा, वाढत्या आकांक्षा आणि ग्राहकांचा आत्मविश्वास यामुळे जानेवारी 2024 मध्ये प्रवासी वाहनांच्या विक्रीने शिखर गाठल्याने कार मालकीची मजबूत मागणी आम्हाला सातत्याने दिसून येत आहे. बँक ऑफ बडोदा ही देशातील आघाडीच्या कार वित्तपुरवठादारांपैकी एक असून ग्राहक बडोदा कार लोनवर आमच्या विशेष वर्षाच्या अखेरच्या ऑफरचा जास्तीत जास्त फायदा घेऊ शकतात आणि त्यांच्या स्वप्नातील कार चे मालक होऊ शकतात.”
अर्जदार बँकेच्या वेबसाइटवर किंवा जवळच्या बँक शाखेला भेट देऊन बँकेचा डिजीटल लेंडिंग प्लॅटफॉर्म- Baroda Digital Car Loan द्वारे बँक ऑफ बडोदा कार लोनसाठी अर्ज करू शकतात आणि त्याचा लाभ घेऊ शकतात.
बँक ऑफ बडोदा कार लोन’ची प्रमुख वैशिष्ट्ये
बडोदा कार लोन फ्लोटिंग पद्धतीचे व्याज दर वार्षिक 8.75% मर्यादित कालावधीसाठी
बडोदा कार लोनवरील फिक्स्ड पद्धतीचे व्याज दर वार्षिक 8.85% पासून सुरू होतात
फिक्स्ड आणि फ्लोटिंग अशा दोन्ही पद्धतींच्या व्याजदर पर्यायांवर सवलतीच्या दरात प्रक्रिया शुल्क
फ्लोटिंग आरओआयवर कोणतेही प्री-पेमेंट/पार्ट-पेमेंट शुल्क नाही
डेली रिड्युसिंग बॅलन्स पद्धतीवर व्याज मोजले जाते- कर्जदारांसाठी सर्वात किफायतशीर
84 महिन्यांपर्यंत लवचिक मुदत
फक्त काही चरणांमध्ये त्वरित मंजुरीसह डिजीटल कार लोन
कार लोनसाठी ग्रुप क्रेडिट लाइफ इन्शुरन्स प्लानची निवड न करणाऱ्या वैयक्तिक ग्राहकांसाठी 0.05% अतिरिक्त आरओआय लागू
बँक ऑफ बडोदा कार लोन दरांच्या सविस्तर माहितीसाठी, click here.
*अटी आणि नियम लागू


