*
पुणे दि. २८ : पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून मार्च महिन्यात पक्क्या अनुज्ञप्तीसाठी शिबीर दौऱ्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.
पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत खेड येथे ४ व ५ मार्च, मंचर येथे ११ व १२ मार्च, जुन्नर येथे १८ व १९ मार्च, वडगाव मावळ येथे २१ व २२ मार्च तर लोणावळा येथे २६ व २७ मार्च या दिवशी पक्की अनुज्ञप्ती शिबीर दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
पक्क्या अनुज्ञप्तीचा कोटा २९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता उपलब्ध होणार असल्याचेही प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.
0000


