पुणे,15 डिसेंबर 2023 : भारत नवे तंत्रज्ञान व इंधनांकडे वाटचाल करत असताना पर्यायी वहन (ऑल्टरनेटिव्ह मोबिलिटी) हे भारतीय उद्योगासाठी सर्वात मोठी उत्पादन संधी आहे,असे मत विविध तज्ञांनी व्यक्त केले. द कॉन्फिडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) तर्फे सीआयआय नेक्सजेन मोेबिलिटी शो 2023 या दोन दिवसीय प्रदर्शन व परिषदेचे उद्घाटन डेक्कन कॉलेज ग्राऊंड येथे करण्यात आले.
या प्रदर्शनाच्या उदघाटनप्रसंगी पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते,आयएएस, सीआयआय डब्ल्यूआर टास्कफोर्स ऑन फ्युचर मोबिलिटीचे अध्यक्ष व टाटा ऑटोकॉम्प सिस्टिम्स लि.चे अध्यक्ष अरविंद गोयल, सीआयआय पश्चिम क्षेत्राचे माजी अध्यक्ष व पिनॅकल इंडस्ट्रीज लि.चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आणि एका मोबिलिटीचे संस्थापक आणि अध्यक्ष डॉ.सुधीर मेहता, सीआयआय पुणे झोनल कौन्सिलचे उपाध्यक्ष आणि सँडविक कोरोमॅन्ट इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य वित्तीय अधिकारी किरण आचार्य , ग्रीव्हज कॉटन लि.चे व्यवस्थापकीय संचालक डॉ.अरुप बसू, सीआयआय वेस्टर्न रिजनल हेडक्वार्टर्सचे वरिष्ठ संचालक राजेश कपूर आणि आरएसबी ट्रान्समिशन्स (आय) लि. चे कार्यकारी संचालक रजनीकांत बेहरा आणि कायनेटिक ग्रीन एनर्जी अँड पॉवर सोल्युशन्स लि च्या संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी सुलज्जा फिरोदिया मोटवानी आदी मान्यवर तसेच भारतीय उद्योगातील नेतृत्व,वरिष्ठ शासकीय अधिकारी आणि सीआयआयचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या उपक्रमात इलेक्ट्रिफाईंग मोबिलिटी, क्लीन टेक फॉर फ्युएल ऑफ फ्युचर,मोबिलिटी अॅन्ड व्हेईकल डिझाईन आणि अर्बन मोबिलिटी इत्यादी विषयांचा समावेश आहे. सीआयआय नेक्सजेन मोबिलिटी शो मध्ये प्रदर्शन व विविध विषयांवरील परिसंवांदांचा समावेश आहे. सीआयआय नेक्सजेन मोबिलिटी एक्स्पो 2023 मध्ये उद्योग क्षेत्रातील भागधारक, धोरणकर्ते, नवउद्योजक, संशोधक आणि या क्षेत्रातील कार्यरत व्यावसायिक पुण्यातील या परिवर्तनीय एक्स्पोमध्ये सहभागी झाले आहेत. या एक्स्पोमध्ये देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय ब्रँड्सचे प्रतिनिधित्व करणारे 100 हून अधिक प्रदर्शक सहभागी झाले आहेत .
याप्रसंगी बोलताना सीआयआय डब्ल्यूआर टास्कफोर्स ऑन फ्युचर मोबिलिटीचे अध्यक्ष व टाटा ऑटोकॉम्प सिस्टिम्स लि.चे अध्यक्ष अरविंद गोयल म्हणाले की,एकूण उत्पादन क्षेत्रामध्ये ऑटो क्षेत्राचा वाटा हा 40 टक्क्यांहून अधिक आहे.या क्षेत्रात होत असलेल्या मोठ्या परिवर्तनामुळे उद्योगाला मोठ्या प्रमाणावर संधी निर्माण होत आहेत.सुट्या भागांची स्थानिक पातळीवर निर्मिती आणि निर्यात याचे इलेक्ट्रिक व्हेईलकल्सच्या क्षेत्रात महत्त्व वाढेल.
सीआयआय पश्चिम क्षेत्राचे माजी अध्यक्ष व पिनॅकल इंडस्ट्रीज लि.चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आणि एका मोबिलिटीचे संस्थापक आणि अध्यक्ष डॉ.सुधीर मेहता म्हणाले की, पर्यायी वहन हे भारतीय उद्योग क्षेत्रासाठी सर्वांत मोठी उत्पादन संधी आहे.या क्षेत्रात आपल्याला जागतिक नेतृत्व करता येईल.पर्यायी इंधनाच्या दिशेने वाटचाल करत असताना पुढील दशकात भारत हे चीन व्यतिरिक्त सर्वांत मोठी ई-बाजारपेठ बनेल. या क्षेत्रात सर्व भागधारकांनी एकत्र आल्यास फक्त भारताकरिताच नाही तर जगाकरिता उत्पादन करण्याची संधी आपल्याला मिळेल.
ग्रीव्हज कॉटन लि.चे व्यवस्थापकीय संचालक डॉ.अरुप बसू म्हणाले की,वाढत्या शहरीकरणामुळे प्रशासनावर अनेक आव्हाने निर्माण होत आहेत आणि दळणवळणाच्या निगडित समस्यांमध्ये ही महत्त्वाची बाब आहे.
पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते म्हणाले की,भविष्यातील दळणवळणाच्या दिशेने आपण जात असताना विश्वासार्ह,सुरक्षित,स्मार्ट आणि परवडणारी वाहन व्यवस्था सेवा देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.पीएमपीएमएल बाबत बोलताना ते म्हणाले की,सध्या एकूण बसेस पैकी 67 टक्के बसेस सीएनजीवर असून 23 टक्के इलेक्ट्रिक वर आहेत. फक्त 10 टक्के डिझेलवर असून येत्या काही वर्षात त्याही ताफ्याबाहेर जातील.
सीआयआय पुणे झोनल कौन्सिलचे उपाध्यक्ष आणि सँडविक कोरोमॅन्ट इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य वित्तीय अधिकारी किरण आचार्य म्हणाले की,प्रत्येक तंत्रज्ञान उत्क्रांतीमुळे अनेक बदल घडत असतात,जे आपल्याला शाश्वततेवर विचार करायला भाग पाडते.