Monday, August 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedदिव्यांग मतदार जनजागृती शिबिराचे आयोजन*

दिव्यांग मतदार जनजागृती शिबिराचे आयोजन*

*
पुणे दि.२८: पताशीबाई रतनचंद मानव कल्याण ट्रस्ट अंध शाळा भोसरी येथे दिव्यांग मतदारांसाठी मतदान जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी निवडणूक नायब तहसीलदार अपर्णा देशपांडे यांनी ईव्हीएम यंत्राविषयी माहिती दिली.

या प्रसंगी ३५ अंध बांधवाना ईव्हीएम प्रशिक्षण देण्यात आले. दिव्यांग बांधवांनी ईव्हीएम यंत्र हाताळून त्याविषयी माहिती घेतली. यावेळी मतदानाचे प्रात्यक्षिकही घेण्यात आले. कार्यक्रमाला विष्णू साबळे, सचिन लोणे, पोलीस निरीक्षक संदीप कवडे, पर्यवेक्षिका मंगल जाधव, मुख्याध्यापिका राजश्री चौधरी, सामाजिक कार्यकर्ते संभाजी भांगरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन पुणे महानगरपालिकेच्या दिव्यांग कक्ष अधिकारी मनिमेखला नायर यांनी केले.
***

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments