Saturday, September 5, 2026
Google search engine
HomeUncategorizedसाऊथ आफ्रिकाचे पुणेकरांना जागतिक दर्जाच्‍या माइस व लेजर ऑफरिंग्‍जचा आनंद घेण्‍याचे आमंत्रण

साऊथ आफ्रिकाचे पुणेकरांना जागतिक दर्जाच्‍या माइस व लेजर ऑफरिंग्‍जचा आनंद घेण्‍याचे आमंत्रण

पुणे, १५ डिसेंबर २०२५: साऊथ आफ्रिकन टूरिझमने त्‍यांचा प्रमुख कॉर्पोरेट सहभाग उपक्रम ‘कॉर्पोरेट थिंक टँक’चे पाचवे एडिशन सुरू ठेवले आहे, जेथे या टप्‍प्‍यामधील तिसरे गंतव्‍य पुणे आहे. या इव्‍हेण्‍टमध्‍ये २५ हून अधिक कॉर्पोरेट प्रमुखांनी सहभाग घेतला, जेथे त्‍यांना संकल्‍पनांची देवाणघेवाण करण्‍यासाठी आणि सहयोगाकरिता नवीन मार्गांचा शोध घेण्‍यासाठी अद्वितीय संधी मिळाली.

 

चार शहरांमधील सिरीजचा भाग म्‍हणून हा उपक्रम साऊथ आफ्रिकन टूरिझम आणि भारतातील कॉर्पोरेट क्षेत्रादरम्‍यान दृढ संबंध निर्माण करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे. विचारशील चर्चासत्रे, सर्वोत्तम पर्यटन स्‍थळांचे प्रदर्शन आणि परस्‍परसंवादात्‍मक नेटवर्किंग सत्रांच्‍या माध्‍यमातून ‘कॉर्पोरेट थिंक टँक’ व्‍यवसाय इव्‍हेण्‍ट्स, माइस (MICE) आणि विश्रांतीसाठी केल्‍या जाणाऱ्या प्रवासासाठी प्रमुख गंतव्‍य म्‍हणून दक्षिण आफ्रिकेच्‍या वाढत्‍या लोकप्रियतेला प्रकाशझोतात आणण्‍यासाठी धोरणात्‍मक प्‍लॅटफॉर्म आहे.

 

पुणे साऊथ आफ्रिकन टूरिझमसाठी धोरणात्‍मक केंद्रित बाजारपेठ म्‍हणून उदयास आली आहे, ज्‍याला पुण्‍यातील आयटी, ऑटोमोटिव्‍ह, उत्‍पादन व शैक्षणिक क्षेत्रांमधील प्रबळ उपस्थितीचे, तसेच वाढत्‍या कॉर्पोरेट व तरूण व्‍यावसायिक पर्यटकवर्गाचे पाठबळ आहे. देशाबाहेर प्रवासासाठी वाढती मागणी आणि सवलतीच्‍या दरात प्रवास, कॉन्‍फरन्‍सेस आणि विश्रांतीकरिता उत्‍साहवर्धक हॉलिडेप्रती वाढत्‍या रूचीसह साऊथ आफ्रिकन टूरिझमने पुणे शहराला दक्षिण आफ्रिकेमधील माइस व लेजर प्रवासासाठी उच्‍च क्षमता असलेली स्रोत बाजारपेठ म्‍हणून धोरणात्‍मकरित्‍या स्थित केले आहे.

 

”कॉर्पोरेट थिंक टँक आमच्‍याकरिता प्रत्‍यक्ष भारतातील कॉर्पोरेट प्रमुखांशी संलग्‍न होण्‍यासाठी आणि त्‍यांच्‍या सर्वसमावेशक प्रवास प्राधान्‍यक्रमांबाबत सखोल माहिती जाणून घेण्‍यासाठी धोरणात्‍मक प्‍लॅटफॉर्म आहे,” असे साऊथ आफ्रिकन टूरिझमचे आशिया, ऑस्‍ट्रेलिया व मध्‍य पूर्वमधील प्रादेशिक महाव्‍यवस्‍थापक श्री. गकोबनी मॅनकोटीवा म्‍हणाले. ”आम्‍हाला पुण्‍यामध्‍ये हा उपक्रम राबवण्‍याचा आनंद होत आहे. पुणे शहर आयटी, उत्‍पादन, ऑटोमोटिव्‍ह आणि उदयोन्‍मुख नाविन्‍यता-केंद्रित उद्योगांमधील प्रबळ उपस्थितीसाठी ओळखले जाते. येथे करण्‍यात आलेल्‍या चर्चा माहितीपूर्ण व दूरगामी आहेत, ज्‍यामधून दक्षिण आफ्रिकेमधील माइस विभागासाठी स्रोत बाजारपेठ म्‍हणून पुण्‍याचे वाढते महत्त्व अधिक दृढ होत आहे. भारत आमच्‍या झपाट्याने विकसित होत असलेल्‍या बाजारपेठांपैकी एक असण्‍यासह आम्‍ही अर्थपूर्ण कॉर्पोरेट सहयोग निर्माण करण्‍याप्रती, तसेच पुण्‍यापासून दक्षिण आफ्रिकेपर्यात अनेक व्‍यवसाय इव्‍हेण्‍ट्स व इन्‍सेंटिव्‍ह ग्रुप्‍सचे स्‍वागत करण्‍याप्रती कटिबद्ध आहोत.”

 

सध्‍या भारतातील ४७ टक्‍के लोकसंख्‍येचे वय १५ ते ५४ वर्षांदरम्‍यान आहे, ज्‍यामुळे माइस २०२५ पर्यंत ६० टक्‍क्‍यांनी आणि २०५० पर्यात ५६ टक्‍क्‍यांनी वाढ करण्‍याची अपेक्षा आहे. परदेशातील इव्‍हेण्‍ट्सवर कॉर्पोरेट खर्च, पायाभूत सुविधांचा विस्‍तार आणि सुधारित जागतिक कनेक्‍टीव्‍हीटी भारताला जागतिक माइस पॉवरहाऊस बनवण्‍यास, या विकासात्‍मक प्रवासामध्‍ये दक्षिण आफ्रिकेला स्‍वाभाविक व महत्त्वपूर्ण सहयोगी बनवण्‍यास सज्‍ज आहे. या विकासाला भारतातील वाढत्‍या आऊटबाऊंड ट्रॅव्‍हल बाजारपेठेने गती दिली आहे, जी चीननंतर जगातील दुसरी झपाट्याने विकसित होत असलेली बाजारपेठ आहे, जिला तरूण व सुशिक्षित व्‍यक्‍ती, वाढता मध्‍यम वर्ग आणि वाढते क्रय उत्‍पन्‍न यांचे पाठबळ आहे.

 

दक्षिण आफ्रिका भारतातून माइस प्रवासासाठी आघाडीचे गंतव्‍य म्‍हणून उदयास आले, जेथे त्‍यांच्‍या विविध ऑफरिंग्‍जमध्‍ये ३,००० हून अधिक साहसी क्रियाकलाप व प्रतिष्ठित वाइल्‍डलाइफ सफारी, नयनरम्‍य रोड ट्रिप्‍स आणि लक्ष वेधून घेणाऱ्या निसर्ग सौंदर्याचा समावेश आहे, ज्‍यांचा एका आठवड्यामध्‍ये अनुभव घेता येऊ शकतो. रेनबो नेशनच्‍या लाभदायी, किफायतशीर व मूल्‍य-केंद्रित अनुभव देण्‍याच्‍या क्षमतेने या देशाला संस्‍मरणीय सवलतीच्‍या दरामध्‍ये ट्रिप्‍सचा शोध घेत असलेल्‍या भारतातील कॉर्पोरेट्ससाठी अव्‍वल निवड बनवले आहे, जेथे साऊथ आफ्रिकन टूरिझम या क्षेत्रात विश्वसनीय सहयोगी म्‍हणून सतत प्रबळ प्रतिष्ठा निर्माण करत आहे.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments