Monday, August 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedइको फॅक्टरी फाउंडेशनच्या शाश्वत भारत सेतूचे श्री. नितीन गडकरीजींच्या हस्ते उद्घाटन

इको फॅक्टरी फाउंडेशनच्या शाश्वत भारत सेतूचे श्री. नितीन गडकरीजींच्या हस्ते उद्घाटन

द इको फॅक्टरी फाउंडेशनने (टीईएफएफ) पुणे, भारतातील अनन्यसाधारण व चाकोरीबाह्य शाश्वत भारत सेतू- विनिंग नेट झिरो विकसित केले आहे; शून्य कार्बन उत्सर्जन व शाश्वत भारताचे ध्येय साध्य करण्यात मदत करणारे हे एक फिरते अध्ययन व जागरूकता केंद्र आहे.
नागपूर, महाराष्ट्र, फेब्रुवारी २५, २०२४: भारत सरकारमधील रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयांचे माननीय व आदरणीय मंत्री श्री. नितीन गडकरीजी यांनी शाश्वत भारत सेतू- विनिंग नेट झिरो या केंद्राचे उद्घाटन रविवारी नागपूरमध्ये केले. हे केंद्र द इको फॅक्टरी फाउंडेशनने विकसित केले आहे. लोकांपासून पृथ्वीपर्यंत सर्वांसाठी उपयुक्त अशा शाश्वत जीवनशैली, उपाय आणि पद्धतींना समर्पित असे अतिप्रगत अनुभव हे केंद्र देते. यातून नेट झिरो इंडिया अर्थात शून्य कार्बन उत्सर्जनाच्या दिशेने जाण्यात मदत होऊ शकते.
द इको फॅक्टरी फाउंडेशनचे संस्थापक आनंद चोरडिया यांनी वेस्ट टू वेल्थ, जल व्यवस्थापन, ऊर्जा बचत यांसारख्या अनेक संकल्पना स्पष्ट केल्या आहेत. त्याचबरोबर आपल्याद्वारे होणारे कार्बन उत्सर्जन कसे कमी करावे, चक्राकार अर्थव्यवस्थेचे महत्त्व तसेच ग्रामीण, शहरी, औद्योगिक व व्यक्तिगत विभागांत शाश्वतता कशी साध्य करावी हेही स्पष्ट केले आहे. व्यापक स्तरावर शून्य उत्सर्जन कसे साध्य करावे यावर त्यांनी भर दिला.
गडकरीजींनी सर्वांना उद्देशून भाषण करताना या अनन्यसाधारण उपक्रमाची प्रशंसा केली आणि तो विकसित करणाऱ्यांचे अभिनंदन केले, ते म्हणाले, “अशा प्रकारचे अपवादात्मक दर्जाचे केंद्र सुरू केल्याबद्दल द इको फॅक्टरी फाउंडेशनचे खूप अभिनंदन. शाश्वत भारत सेतूने अगदी महत्त्‍वाच्या मुद्दयाला स्पर्श केला आहे. त्यामुळे आपल्या पर्यावरणाचे आणि पर्यायाने वसुंधरेचे संवर्धन होणार आहे. शाश्वत भारत सेतूने ‘वेस्ट टू वेल्थ’ या संकल्पनेने उदाहरण घालून दिले आहे. केवळ पर्यावरणाला लाभदायक ठरणारे नाहीत, तर समुदायांसाठी उपजीविकेच्या संधीही निर्माण करणारे शाश्वत उपाय हे केंद्र पुरवणार आहे.” नेट झिरो उद्दिष्ट साध्य करण्यासाठी योगदान देण्याच्या दृष्टीने हे केंद्र संपूर्ण राष्ट्राला प्रेरित करेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
टीईएफएफचे संस्थापक आनंद चोरडिया या ऐतिहासिक क्षणाविषयी म्हणाले, “प्रत्येकाला शून्य कार्बन उत्सर्जन करणारी तसेच शाश्वत जीवनशैली सहजतेने स्वीकारण्याची प्रेरणा देण्याच्या तसेच त्याबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या आमच्या ध्यासाची चालना शाश्वत भारत सेतू-विनिंग नेट झिरो हे केंद्र विकसित करण्यामागे होती. शाश्वत भारत सेतू हा खऱ्या अर्थाने भारताला शून्य कार्बन उत्सर्जनाकडे घेऊन जाणारा पूल आहे असे मला ठामपणे वाटते. हे केंद्र खूप जणांपर्यंत पोहोचेल आणि त्यांना प्रेरित करेल अशी आशाही आम्हाला वाटते, जेणेकरून हे सर्व जण शाश्वत भविष्यकाळाकडे जाणाऱ्या प्रवासात सहभागी होऊ शकतील.”

द इको फॅक्टरी फाउंडेशन (टीईएफएफ):
द इको फॅक्टरी फाउंडेशन (टीईएफएफ) पुणे, ही आनंद चोरडिया यांनी २०१६ मध्ये स्थापन केलेली सेक्शन एट ना-नफा तत्त्वावरील संस्था आहे. शाश्वत जीवनशैली आणि उत्पादनांच्या तत्त्वाचा प्रसार करण्याचे ध्येय आमच्यापुढे आहे. ग्रामीण, शहरी, औद्योगिक आणि व्यक्तिगत अशा चार प्रमुख विभागांमध्ये शाश्वतता साध्य करण्यावर आम्ही काम करतो.
शाश्वत भारत सेतू विषयी:
आपल्या वसुंधरेच्या पुनरुज्जीवनासाठी खूपच साधे आणि सहज अनुकरण करण्याजोगे उपाय आहेत हे अनेकांना माहीत नाही किंवा ते त्याबद्दल अनभिज्ञ आहेत. शाश्वत भारत सेतू विविध माहितीपूर्ण सादरीकरणांनी आणि आकर्षक साहित्यातून तयार करण्यात आला आहे. लोक ते पृथ्वी अशा विविध स्तरांवर शून्य कार्बन उत्सर्जन साध्य करण्याच्या दिशेने जाण्यात उपयुक्त ठरतील अशा शाश्वत जीवनशैली आणि पद्धती दाखवण्यासाठी शाश्वत भारत सेतू समर्पित आहे. तुम्ही हे माहितीपूर्ण सादरीकरण आणि प्रदर्शन बघाल, तेव्हा अधिक शाश्वत व पर्यावरणपूरक अशा जबाबदार भविष्यकाळाच्या दिशेने व्यक्ती, संस्था आणि समुदाय कशा प्रकारे ठोस पावले उचलू शकतात हे तुम्हाला कळेल. मिशन लाइफ- लाइफस्टाइल फॉर इन्व्हॉर्न्मेंट आणि स्वच्छ भारत अभियान यांसारख्या राष्ट्रीय उद्दिष्टांशी तसेच संयुक्त राष्ट्र शाश्वत विकास उद्दिष्टांशी हे केंद्र उत्तमरित्या जोडलेले आहे. जैवविघटनशील कचऱ्याचा वापर कसा करायचा, प्लास्टिक कसे रिसायकल करायचे याची माहिती हे केंद्र देते. त्याचप्रमाणे आपण पर्यावरणपूरक निवडी कशा करू शकतो, कार्बन उत्सर्जनातील आपला वाटा कसा कमी करू शकतो हेही सांगते. हे फिरते केंद्र भारतभरात प्रवास करणार आहे. ज्या लोकांना आपल्या परिसरात त्याचे प्रदर्शन ठेवायचे आहे ते आम्हाला पुढील क्रमांकावर/ईमेलवर संपर्क करू शकतात- 7447442191

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments