कॉक्लिआ पुणे हिअरिंग अॅण्ड स्पीच संचलित स्वरनाद कर्णबधिर बालकांचे पुनर्वसन केंद्र तर्फे ० ते ६ वर्षे वयोगटातील मुलांसाठी मोफत श्रवणदोष तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर रविवार दिनांक ३ / ३ / २०२४ रोजी स्वरनाद कर्णबधिर बालकांचे पुनर्वसन केंद्र, कोथरूड, पुणे येथे सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत सुरू राहणार आहे. या शिबिराचा गरजू व्यक्तींनी लाभ घेण्यासाठी 9890738817 / 8483945521 / 9689836062 या क्रमांकावर संपर्क करा.
बालकाच्या वाचा आणि भाषा विकासासाठी 6 वर्षापर्यंतचा काळ हा अतिशय महत्वाचा मानला जातो. या शिबिरात कानाची योग्य तपासणी, समुपदेशन, कर्णबधिर बालकाचे शिक्षण व कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रियेबद्दल मार्गदर्शन दिले जाईल. कर्णबधिरत्वाचे लवकर व योग्य निदान न झाल्यास ऐकण्याच्या क्षमतेचा विकास होणे कठिण असू शकते. तसेच बालकाचा वाचा भाषा विकास आणि संवादकौशल्य पुरेसे विकसित होणार नाही,परिणामी शिक्षणात अडथळे निर्माण होऊ शकतात.
शिबिरातील मार्गदर्शनामुळे कर्णबधिर बालकाला बोलण्याची व सर्व साधारण मुलांच्या शाळेत जाण्याची संधी मिळू शकणार आहे


