पुणे, २९ फेब्रुवारी २०२४ : आघाडीच्या फर्टिलिटी आणि आयव्हीएफ सेंटर झिव्हिया आयव्हीएफ ने सर्वोच्च नैतिक मानके राखून जागतिक दर्जाचे वंध्यत्व उपचार सुलभ बनविण्याचे आपले ध्येय पुढे सुरु ठेवले आहेत. आपला पहिला वर्धापन दिन आणि उल्लेखनीय कामगिरीचे वर्ष साजरे करण्याच्या निमित्ताने झिव्हिया आयव्हीएफ तर्फे रिप्रॉडक्टिव्ह हेल्थ केअर क्षेत्रात विस्तार आणि नाविन्यपूर्ण योजना जाहीर करण्यात आल्या आहेत.
प्रख्यात आयव्हीएफ तज्ज्ञ डॉ.नयना पटेल यांनी स्थापन केलेले आणि स्वेता मंगल यांनी सह-संस्थापित केलेले, झिव्हिया आयव्हीएफ हे वंध्यत्व उपचारामधील एक विश्वासार्ह नाव बनले आहे.
वंध्यत्व उपचार सेवेचा विस्तार करण्याच्या वचनबद्धतेसह, झिव्हिया आयव्हीएफ ने लखनऊ, मुंबई आणि जयपूरमधील मालविया नगर येथे नवीन क्लिनिक्स सुरु करण्याची योजना आखली आहे. या क्लिनिक्सच्या माध्यमातून रुग्णांना झिव्हिया आयव्हीएफ सारखेच जागतिक दर्जाचे उपचार आणि वैयक्तिक देखभाल प्रदान केली जाणार आहे.
याशिवाय छोट्या शहरांमधील व्यक्तींपर्यंत पोहोचण्याचे महत्त्व ओळखून, झिव्हिया आयव्हीएफ तर्फे प्रथमच फ्रँचायझी मॉडेल सादर करण्यात आले आहे. व्यापक लोकसंख्येला सर्वसमावेशक वंध्यत्व उपचार सेवा प्रदान करण्याच्या उद्देशाने या फ्रँचायझी मॉडेलची सुरुवात बेवारमधील क्लिनिकमध्ये करण्यात येईल. रुग्णांना इतर झिव्हिया आयव्हीएफ केंद्रांप्रमाणेच उपचार आणि सेवा प्राप्त व्हावी यासाठी वैद्यकीय टीम आणि क्लिनिक व्यवस्थापन कार्यरत राहील.
पालकत्वाचे स्वप्न साकार करण्यात मदत करण्याच्या आयव्हीएफ सेंटरच्या बांधिलकीवर भर देत झिव्हिया आयव्हीएफच्या संचालक स्वेता मंगल म्हणाल्या की, नवीन शहरांमध्ये आमचा विस्तार आणि फ्रँचायझी मॉडेलची सुरुवात उपचारांची गरज असलेल्या अधिक जोडप्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आमचे समर्पण अधोरेखित करते. मोठ्या शहरांच्या पलीकडे असलेल्या समुदायांना आमचे कुशल उपचार आणि सेवा देण्यासाठी आम्ही उत्साहित आहोत, जेणे करून प्रत्येकाला सर्वोत्कृष्ट वंध्यत्व उपचार उपलब्ध होतील.
झिव्हिया आयव्हीएफ हे उत्कृष्टता, नैतिकता आणि करुणा या संस्थापक तत्त्वांशी समर्पित वंध्यत्व आरोग्य सेवा प्रदान करते.


