Monday, August 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedएमआयएफ चे प्लास्टिक वेस्ट इनोव्हेटर्सच्या समूहाने हवामानासाठी केली प्रभावी कामगिरी

एमआयएफ चे प्लास्टिक वेस्ट इनोव्हेटर्सच्या समूहाने हवामानासाठी केली प्रभावी कामगिरी

मुंबई, २९ फेब्रुवारी २०२४: १२ स्टार्ट-अप्सनी प्लास्टिक कचरा व्यवस्थापनासाठीच्या नाविन्यपूर्ण उपाययोजनांना बिझनेस मॉडेलच्या रूपात विकसित केले आहे व या प्रयोगांतून गेल्या १२ महिन्यांमध्ये एकत्रितपणे तब्बल १२४,३६० टन कार्बन डायऑक्साइड उत्सर्ग वाचविला आहे. ही स्टार्टअप्स मॅरिको इनोव्हेशन फाउंडेशन (एमआयएफ) च्या प्लास्टिक पोर्टफोलिओचा भाग आहेत, ज्यांची नावे जानेवारी २०२३च्या ‘इनोव्हेशन इन प्लास्टिक्स: द पोटेन्शियल अँड पॉसिबिलिटीज’ प्लेबुक मध्ये झळकली होती. एमआयएफ ने प्लास्टिक्स प्रोग्राम राउंडअप २०२३-२४ या दिवसभर चाललेल्या उपक्रमामध्ये आज हे प्लेबुक आणि इतर ठळक आकडेवारी प्रकाशित केली. या पुनरावलोकनामध्ये नवसंकल्पनाकारांना प्लास्टिकच्या समस्येला हाताळण्याच्या संधी पुरविणाऱ्या एमआयएफ च्या प्लास्टिक कचरा व्यवस्थापन मूल्य साखळीतील केंद्रित हस्तक्षेपाचा आढावा घेण्यात आला.

एमआयएफच्या प्लेबुकनुसार भारताच्या प्लास्टिक वापरामध्ये होत असलेली वाढ धोक्याची सूचना देणारी आहे, जी २०१६-१७ मधील १.४ कोटी टनांवरून २०१९-२० मध्ये ती २ कोटी टनांवर पोहोचली आहे. याच कालावधीमध्ये प्लास्टिक कचरा निर्मितीचे प्रमाणही दुपटीने वाढले आहे. याहून अधिक विचलित करणारी बाब म्हणजे वर्षाकाठी ३४ लाख टन प्लास्टिक कचरा निर्माण होत असूनही भारत त्यापैकी केवळ ३० टक्‍के कचऱ्याचे रिसायकलिंग करत आहे.

यासंदर्भात, एमआयएफ चे पाठबळ लाभलेल्या स्टार्टअप्सनी प्लास्टिक कचऱ्याचे आव्हान पेलण्यासाठी नाविन्यपूर्ण उपाययोजना विकसित करण्यामध्ये साधलेली लक्षणीय प्रगती उल्लेखनीय आहे. उदाहरणार्थ,आयबीएएनएसएस आणि धराक्षा यांनी अनुक्रमे बायोक्राफ्ट इनोव्हेशन तंत्रज्ञान व मायसेलियमचा वापर करून ६० टन कृषीजन्य कच-याचे व्यवस्थापन प्रभावीपणे केले आहे. इश्विता, आयबीएएनएसएस , रिक्रॉन, पॅडकेअर, बिनटिक्स, धराक्षा आणि अंगिरस यांच्यासह इतर स्टार्टअप्सनी एकत्रितपणे १२४,३६० टन सीओ२ वायू उत्सर्गाची बचत केली आहे. सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय परिणाम घडवून आणतील अशा नवसंकल्पनांवर एमआयएफ कडून लक्ष केंद्रित केले जात असल्याचे यातून नव्याने अधोरेखित झाले आहे.

यात पॅडकेअरसारख्या इतर स्टार्टअप्सचाही समावेश आहे, ज्या कंपनीने ३७ टन सॅनिटरी पॅड्स रिसायकल केले आहेत व ७४,००० किमीच्या लँडफिल क्षेत्राचे संवर्धन केले आहे. इश्विता रोबोटिक्सच्या एआय तंत्रज्ञानाने चालणाऱ्या सॉर्टिंग मशीनने एकूण २६५,००० टन्सच्या तेलाच्या बॅरल्सचे वर्गीकरण केले आहे. रिक्रॉन पॅनेल्स आणि अंगिरस यांसारख्या इनोव्हेटर्सनी नाविन्यपूर्ण कन्स्ट्रक्शन उत्पादनांच्या माध्यमातून १,३३८ टन प्लास्टिक कचरा रिसायकल केला आहे. घरगुती कचरा व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करणाऱ्या बिनटिक्स ने ३६० टन प्लास्टिक कचरा गोळा करत जैवविविधता संवर्धन आणि कचऱ्याचे प्रमाण कमी होण्यामध्ये योगदान दिले आहे व हे करताना ८,३०० झाडे वाचवली आहेत.

मॅरिको इनोव्हेशन फाउंडेशनचे संस्थापक हर्ष मारिवाला म्हणाले, “एमआयएफ प्लास्टिक कचरा व्यवस्थापनातील नवसंकल्पनांच्या वाटचालीच्या अग्रस्थानी आहे. नवसंकल्पनांप्रती आमच्या बांधिलकीमुळे आम्हाला नजिकची, मध्यम आणि दीर्घकालीन आव्हाने ओळखून त्यांचा सामना करण्याची प्रेरणा मिळते. प्लास्टिकच्या समस्यांना हाताळण्याच्या मार्गाने पुढे जात असताना हा उपक्रम भारतासाठी एक नवी दिशा देणारा ठरू शकतो. खरेतर, केवळ भांडवल पुरवठ्यापलिकडे जात एक पोषक वातावरण पुरविल्याने आम्ही प्लास्टिक कचरा व्यवस्थापनामध्ये जगभर अनुसरता येईल असा एक आदर्श नमुना तयार करू शकतो, असा मला विश्वास वाटतो.”

हा मुद्दा पुढे नेताना मॅरिको इनोव्हेशन फाउंडेशनच्या गव्हर्निंग काउन्सिलचे मानद अध्यक्ष अमित चंद्रा म्हणाले, “आमच्या प्लास्टिक्स प्रोग्रामने कचरा व्यवस्थापन क्षेत्रामध्ये क्रांती घडवून आणण्यास सज्ज असलेल्या अभिनव संकल्पनांना पाठबळ दिले आहे. ग्राहकवाद सातत्याने वाढत असताना संपूर्ण मूल्यसाखळीतील आव्हानांना सामोऱ्या जाणाऱ्या नवसंकल्पनांना प्रचंड वाव आहे.” ते म्हणाले, “बदल घडवून आणणाऱ्या नवसंकल्पनाकारांच्या वाटचालीला आधार देत असल्याचा आणि नव्या शाश्वत संकल्पनांसाठी परिसंस्था उभी करण्यामध्ये आपले योगदान देत असल्याचा एमआयएफला अभिमान आहे.”

मॅरिको इनोव्हेशन फाउंडेशनच्या प्रमुख सुरंजना घोष यांनी प्लास्टिक कचरा व्यवस्थापन क्षेत्रामध्ये अभिनव संकल्पना राबविणाऱ्यांच्या प्रयत्नांना खतपाणी देण्यामध्ये एमआयएफच्या सक्रिय भूमिकेला अधोरेखित केले. “प्लेबुकच्या प्रकाशनापासून एमआयएफ ने त्यातील शिफारशीचा पाठपुरावा करणे, पाठबळ पुरविण्यास प्राधान्य देणे आणि स्टार्टअप्सना खतपाणी पुरविणे या गोष्टींमध्ये आघाडी मिळवली आहे. या बांधिलकीतून आम्ही केलेल्या अशा हस्तक्षेपांमुळे मोठी पाऊले उचलली गेली आहे, ज्याची परिणती उद्योजकांना करोडोंच्या डील ऑर्डर्स व इतर मूल्य-संचालित उपक्रम मिळण्यामध्ये झाली आहे. आमचे हे प्रयत्न टिकाऊ परिणामांना चालना देण्याप्रती व शाश्वत नवसंकल्पनांसाठी एका जोमाने वाढणाऱ्या परिसंस्थेची जोपासना करण्याप्रती आमच्या बांधिलकीला अधोरेखित करतात.” त्या म्हणाल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments