Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedबहुश्रुत व्याख्यानमालेत प्र. के. घाणेकर यांनी विद्यार्थ्यांसमोर उलगडली कात्रण कला सुलभ...

बहुश्रुत व्याख्यानमालेत प्र. के. घाणेकर यांनी विद्यार्थ्यांसमोर उलगडली कात्रण कला सुलभ शिक्षण मंडळ पुणे आणि श्री गोपाळ हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या वतीने बहुश्रुत व्याख्यानमालेचे आयोजन

पुणे : आकडेवारी, प्रवासवर्णन किंवा कोणत्याही घटनेविषयी तत्कालीन काळात येणारी विस्तृत माहिती पुढील काळात कळण्यासाठी वृत्तपत्रांची कात्रणे उपयुक्त ठरतात. हे सर्व माहिती तितक्याच बारकाईने गुगलवर उपलब्ध असेलच असे नाही. त्यामुळे कात्रणकला ही उपयुक्त आणि आनंद देणारी कला आहे. ज्या काळात गुगल नव्हते तेव्हापासून माझ्याकडे कात्रणांचा संग्रह आहे. विविध वृत्तपत्रातील विविध विषयातील ३५ हजार कात्रणांचा संग्रह माझ्याकडे आहे, असे सांगत लेखक आणि इतिहास अभ्यासक प्र. के. घाणेकर यांनी कात्रण कला विद्यार्थ्यांसमोर उलगडली.

 

सुलभ शिक्षण मंडळ पुणे आणि श्री गोपाळ हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या वतीने बहुश्रुत व्याख्यानमालेचे आयोजन सदाशिव पेठेतील श्री गोपाळ हायस्कूल येथे करण्यात आले होते. यावेळी प्र. के. घाणेकर यांचे कात्रण कला या विषयावर व्याख्यान झाले. संस्थेच्या कार्याध्यक्षा डॉ. उमा बोडस यावेळी उपस्थित होत्या.

 

प्र. के. घाणेकर म्हणाले, गुगलवर सगळी माहिती उपलब्ध असते, परंतु आपल्याकडे आपण केलेला माहितीचा संग्रह असल्यास त्याचा उपयोग अधिक चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. त्यामुळे कात्रण कला विद्यार्थ्यांनी जोपासल्यास त्याचा उपयोगच होईल. यावेळी ही कात्रण कला कशी जोपासावी याबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

 

डॉ. उमा बोडस म्हणाल्या, विद्यार्थ्यांना विविध विषयांबद्दल माहिती मिळावी, विविध विषयांवरील चांगले त्यांच्या कानावर पडावे यासाठी बहुश्रुत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून आयुष्यात चांगले काहीतरी करण्याची प्रेरणा विद्यार्थ्यांना मिळे

ल.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments