पुणे, दि. 2 : सैनिक कल्याण विभागातील लिपिक-टंकलेखक (गट-क) सरळसेवा पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 9 जानेवारी 2026 रोजी रात्री 11:59 वाजेपर्यंत वाढविण्यात आली असल्याचे लेफ्टनंट कर्नल हंगे स.दै. (नि.), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे यांनी कळविले आहे.
या भरतीसंदर्भातील जाहिरात 12 ऑक्टोबर व शुद्धीपत्रक 7 डिसेंबर 2025 नुसार अर्ज प्रक्रिया सुरू असून, तांत्रिक कारणांमुळे विभागाचे संकेतस्थळ 26 डिसेंबर 2025 पासून निष्क्रिय झाल्याने ईच्छुक उमेदवारांनी अर्ज भरण्याकरिता http://cdn3.digalm.com/EForms/configuredHtml/32786/96173/Index.html या वेब लिंक व QR Code/Application Code चा वापर करून थेट ऑनलाईन अर्ज भरावा.
वेब लिंक व QR Code संदर्भात तांत्रिक अडचण आल्यास deswpune@gmail.com या ई-मेल आयडीवर तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन लेफ्टनंट कर्नल हंगे स. दै. (नि.), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे यांनी केले आहे.
०००००


