पुणे, जानेवारी २०२६: पुण्यातील मोबिलिटी स्टार्टअप स्पीडलूप ऑटो लास्ट-माइल लॉजिस्टिक्समध्ये परिवर्तन घडवून आणत आहे, जेथे भारतातील गतीशील वाहतूक परिसंस्थेच्या विशिष्ट गरजांची पूर्तता करण्यासाठी लहान व्यावसायिक वाहनांची नवीन पिढी डिझाइन करत आहे. गायत्री जाधव आणि आदित्य पुप्पाला यांनी स्थापना केलेले हे स्टार्टअप कार्यक्षमता, शाश्वत व किफायतशीर गतीशीलता सोल्यूशन्स वितरित करण्यावर लक्ष केंद्रित करते, जे व्यवसायांना अधिक जबाबदारीने व फायदेशीरपणे कार्यसंचालन करण्यास सक्षम करतात.
डिलिव्हरींदरम्यान होणाऱ्या कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी करण्यावर अधिक भर देत स्पीडलूप ऑटोच्या वेईकल्स कार्यक्षमता, टिकाऊपणा आणि पर्यावरणाप्रती जबाबदारीसह डिझाइन करण्यात आल्या आहेत. कंपनीचा उद्योगांसाठी शुद्ध गतीशीलतेला व्यावहारिक व किफायतशीर करण्याचा मनसुबा आहे, ज्यामुळे ते त्यांचा मालकीहक्काचा एकूण खर्च कमी करण्यास, तसेच हरित पुरवठा साखळीप्रती योगदान देण्यास सक्षम होतील.
कोटक महिंद्रा बँकेच्या कोटम बिझलॅब्स अॅक्सेलरेटर प्रोग्राममध्ये सहभाग, तसेच टी-हब फाऊंडेशनसोबत सहयोगाने स्पीडलूप ऑटोच्या विकासगाथेला आकार देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. बिझलॅब्सच्या माध्यमातून आदित्य पुप्पाला आणि त्यांच्या टीमला उद्योगामधील प्रमुखांकडून मार्गदर्शन मिळाले, संधी वाढवण्याचा धोरणात्मक अनुभव मिळाला, ज्यासह त्यांना भारतातील सर्वसमावेशक गतीशीलता क्षेत्राला अनुसरून त्यांचा उत्पादन रोडमॅप अधिक निपुण करता आला.
नाविन्यता आणि शाश्वततेला एकत्र आणत स्पीडलूप ऑटो लास्ट-माइल वाहतूकीच्या भविष्याला गती देत आहे, जो स्मार्ट, अधिक शुद्ध आणि सर्वसमावेशक
आहे.


