Monday, October 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedलोकली युअर्स’ उपक्रमाद्वारे ‘कोका-कोला इंडिया आणि हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेस कडून महाराष्ट्रातील किराणा...

लोकली युअर्स’ उपक्रमाद्वारे ‘कोका-कोला इंडिया आणि हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेस कडून महाराष्ट्रातील किराणा दुकाने आणि प्रसिद्ध भोजनालयांचा सन्मान

महाराष्ट्र, 6 जानेवारी 2026: कोका-कोला इंडिया आपल्या बॉटलिंग पार्टनर हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेस प्रायव्हेट लिमिटेड (एचसीसीबी) यांच्या सहकार्याने ‘लोकली युअर्स’ मोहिमेद्वारे महाराष्ट्रातील किराणा दुकाने आणि प्रसिद्ध भोजनालयांना प्रोत्साहन देत आहे. हा उपक्रम स्थानिक दुकानदार आणि प्रसिद्ध भोजनालयांच्या दैनंदिन योगदानावर प्रकाश टाकतो जे अनेक वर्षांपासून कुटुंबे आणि प्रवाशांना सेवा देत आहेत. हे व्यवसाय स्थानिक क्षेत्रांचा भाग आहेत. कोका-कोला इंडिया त्यांना सुधारित पायाभूत सुविधा, आधुनिक किरकोळ उपकरणे आणि विश्वासार्ह प्रत्यक्ष मदत देऊन पाठिंबा देत आहे.

 

संपूर्ण महाराष्ट्रात किराणा दुकाने आणि अनेक वर्षांपासून चालत असलेली प्रसिद्ध भोजनालये स्थानिक व्यापाराचा मजबूत आधार आहेत. ही दुकाने लोकांना रोजच्या आवश्यक वस्तू आणि परिचित चवीचे पदार्थ उपलब्ध करून देतात. एचसीसीबीच्या सहकार्याने कोका-कोला इंडिया या दुकानदारांना कूलिंग उपकरणे, उत्पादनांचा नियमित पुरवठा आणि ‘कोक बडी’ नावाच्या एआय-सक्षम प्लॅटफॉर्मद्वारे ऑर्डर आणि साठा व्यवस्थापन सोपे करण्याची सुविधा पुरवत आहे. या प्रयत्नांमुळे दुकानदारांना ग्राहकांच्या बदलत्या अपेक्षा पूर्ण करता येतात तसेच सातत्यपूर्ण आणि दर्जेदार सेवा देणे शक्य होते.

 

मुंबईतील प्रसिद्ध भोजनालय ‘बडेमिया’चे मालक झहीर शेख म्हणाले, “कोका-कोलाच्या पाठिंब्यामुळे आमचा व्यवसाय मजबूत झाला आहे. आमचे भोजनालय एका छोट्या स्टॉलपासून सुरू झाले आणि अनेक वर्षांच्या मेहनतीमुळे व निष्ठावंत ग्राहकांमुळे ते मोठे झाले. कोका-कोला गेल्या दोन दशकांहून अधिक काळ आमच्यासोबत आहे आणि त्यांच्या नियमित पुरवठ्यामुळे वाढत्या ग्राहकांना अधिक चांगल्या प्रकारे सेवा देणे शक्य झाले आहे. आमच्या सारख्या दीर्घकालीन ब्रँडसाठी ही एक विश्वासार्ह भागीदारी ठरली आहे.”

 

किर्ती पटेल, लेजेंड सुपर बाजारच्या ओनर म्हणाल्या, “पंचावन्न चौरस फूट आकाराच्या एका लहान दुकानापासून मोठ्या स्टोअरपर्यंतचा आमचा प्रवास सातत्य आणि ग्राहकांच्या विश्वासावर उभा राहिला आहे. कोका-कोला यांनी गेली तीस वर्षे विश्वासार्ह सेवा दिली आणि प्रभावी प्रेझेंटेशनद्वारे आमच्या ग्राहकांना अधिक चांगली सेवा देण्यास मदत केली. त्यांची भागीदारी आमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी महत्त्वाची ठरली आहे.”

 

करण अचपाल, व्हाइस प्रेसिडेंट – फ्रँचायझी ऑपरेशन्स, डेव्हलपिंग मार्केट्स, कोका-कोला इंडिया आणि साउथवेस्ट आशिया, म्हणाले, “आमचा उद्देश म्हणजे प्रत्येक ठिकाणी पेये सहज मिळावीत, थंड असावीत आणि सर्व्ह करण्यासाठी तयार असावीत, तसेच हजारो किराणा दुकानदार आणि वितरकांसाठी आर्थिक संधी निर्माण व्हावी, जे या संपूर्ण व्यवसायासाठी महत्त्वाचे आहेत. मजबूत पुरवठा साखळी तयार करून आणि भागीदारांना प्रत्यक्ष मदत देऊन, आम्ही ग्राहकांना आनंदित करण्याचा आणि समुदाय वाढवण्याचा प्रयत्न करतो.”

 

विनय नायर, चीफ कमर्शियल ऑफिसर, हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेस प्रायव्हेट लिमिटेड म्हणाले, “आमच्या ग्राहकांना कोका-कोला पेये सहज उपलब्ध व्हावीत यासाठी आम्ही किराणा भागीदार आणि वितरण चॅनेलशी संपर्क साधण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत. यामुळे ग्राहकांना केवळ सुविधा मिळत नाही तर किरकोळ विक्रेत्यांना अधिकाधिक लोकांना चांगल्या प्रकारे सेवा देण्यासाठी आवश्यक असलेली साधने आणि पायाभूत सुविधा देखील मिळतात.”

 

कोका-कोला इंडिया लघु व्यवसायांना पाठिंबा देऊन, सेवा पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करून आणि दीर्घकालीन वाढीला चालना देऊन महाराष्ट्राच्या किरकोळ आणि खाद्यसेवा क्षेत्राशी आपले नाते अधिक मजबूत करत आहे. एचसीसीबी आणि त्यांच्या वितरण भागीदारांच्या सहकार्याने, कंपनी राज्यभर मजबूत आणि अधिक सक्षम किराणा समुदाय निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित

करत आहे.

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments