Monday, October 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedआर्किटेक्ट अभय पुरोहित यांच्या हस्ते बीएनसीए महोत्सवातील प्रदर्शनाचे उद्घाटन

आर्किटेक्ट अभय पुरोहित यांच्या हस्ते बीएनसीए महोत्सवातील प्रदर्शनाचे उद्घाटन

पुणे, दि. ६ जानेवारी २०२६ : महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेनमध्ये (बीएनसीए) ‌‘नेक्सस 2026‌’ या वार्षिक सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा वार्षिक महोत्सवाचे उद्घाटन वास्तूरचनाशास्त्र परिषदेचे (सीओए) अध्यक्ष आर्किटेक्ट अभय पुरोहित यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले. त्यावेळी बीएनसीएचे प्राचार्य डॉ. अनुराग कश्यप, उपप्राचार्य डॉ. शार्वेय धोंगडे, महोत्सवाचे आयोजक प्रा. महेश बांगड, प्रदर्शनाच्या आयोजक प्रा. सिद्धी जोशी, प्रा. पूजा घोरपडे, तसेच क्रीडा उपक्रम प्रमूख प्रा. उमेश चव्हाण, ग्रंथालय प्रमूख डॉ.अमिता प्रधान आणि अन्य प्राध्यापक आणि विद्याथीं वर्ग उपस्थित होता.

 

तीन ते नऊ जानेवारी 2026 दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या महोत्सवात बीएनसीएमधील पदवीपूर्व आणि पदव्यूत्तर तसेच पदवीपूर्व डिझाईन अभ्यासक्रमातील (बी डीइएस) या विद्यार्थिनींनी साकारलेली असंख्य शैक्षणिक कामेंही प्रदर्शित करण्यात आली. तसेच माजी विद्यार्थीनींनी साकार केलेले अकादमिक चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन पुरोहित यांच्या हस्ते झाले. त्यापूर्वी बीएनसीएतील राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागातर्फे त्यांनी महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेच्या आवारात वृक्षारोपणही केले. तसेच महोत्सवातील आंतरमहाविद्यालयीन टॉर्क-व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेतील विजयी खेळाडूंना पुरेिहित यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले.

 

यावेळी बोलताना पुरोहित म्हणाले की, वास्तूरचनाशास्त्रातील कारकीर्दीमध्ये मुली व महिलांचे प्रमाण वाढत आहे. हे लक्षात घेता त्यांच्या सक्षमीकरणासाठी विशेष धोरणात्मक दस्तावेज तयार करण्याचे काम चालू आहे. त्याची अंमलबजावणीही लवकरच होईल. तसेच वास्तूरचनाशास्त्रातील नवनवे अभ्यासक्रम आणि कृत्रीम बुद्धीमत्तेचा या क्षेत्रातील अभ्यासक्रम व व्यावहारीक वापर याबद्दलही त्यांनी विस्तृत चर्चा केली.

 

या वार्षिक महोत्सवात फ्ली मार्केट उर्फ सिनेबाजार आयोजित केले असून त्यामध्ये 40 स्टॉल्स उभारण्यात आले असून असून ते फक्त 7 जानेवारी रोजी सर्वांसाठी सशुल्क खुले करण्यात आले आहेत. त्यामध्ये विविध कलात्मक वस्तू, हस्तकला, जीवनोपयोगी वस्तू, तांत्रिक उपकरणे, खाद्यपदार्थ आणि विद्यार्थिनींमधील उद्योजगतेच्या कौशल्यातून निर्माण झालेली उत्पादने ठेवण्यात आली आहेत.

 

छायाचित्राच्या ओळी :

1. बीएनसीएतील चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन आर्किटेक्ट अभय पुरोहित यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी प्राचार्य डॉ. अनुराग कश्यप आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

 

2. बीएनसीएतील राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या वृक्षारोपण समारंभात (डावीकडून) प्राचार्य डॉ. अनुराग कश्यप, आर्किटेक्ट पुरोहित आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या प्रमूख डॉ. अमिता प्रधान उपस्थि

त होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments