Wednesday, August 26, 2026
Google search engine
HomeUncategorized14.86 लाख चिकन बिर्याणीपासून ते 3.8 लाख इडलीपर्यंत… 2025 मध्ये पुणेकरांनी स्विगी...

14.86 लाख चिकन बिर्याणीपासून ते 3.8 लाख इडलीपर्यंत… 2025 मध्ये पुणेकरांनी स्विगी वर कसं जेवण ऑर्डर केलं, ते पाहा

2025 मध्ये 12.10 लाख चिकन बर्गर विकले गेले. दररोज रात्री 12 ते 2 या वेळेत बोल्टवर सरासरी 62 हून अधिक चिकन बर्गरची ऑर्डर दिली गेली.

स्विगी डाइन आउट मुळे पुणेकरांनी एकूण 64.35 कोटी रुपये वाचवले. व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी स्विगी डाइन आउट द्वारे देशातील सर्वाधिक एकाच बिलाची नोंद पुण्यात झाली, ही रक्कम 1,19,257 रुपये इतकी होती.

डेस्कइट्स द्वारे एका ग्राहकाने 67 महाराजा बर्गर कॉम्बो, 67 पिझ्झा मॅकपफ आणि 1 फ्राइज अशी ऑर्डर दिली, ज्याची एकूण किंमत 31,957 रुपये होती.

शहरातील सर्वात मोठी बोल्ट ऑर्डर एका ग्राहकाने दिली होती. या ऑर्डरमध्ये तब्बल 175 गोल्डन कॉर्न पिझ्झा मागवण्यात आले होते.

पुणे, 7 जानेवारी, 2026 : 2025 मध्ये पुणेकरांच्या खाद्यपसंतीत शहराची समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि आधुनिक ऊर्जेचे सुंदर प्रतिबिंब दिसून आले. आरामदायी जेवणापासून ते खास चवीच्या आवडीपर्यंत, निवांत रात्रीच्या जेवणापासून उशिरा रात्री लागणाऱ्या बर्गरच्या क्रेविंग पर्यंत, पुणेकरांच्या खाद्यपसंती विविधतेने नटलेल्या होत्या.

‘हाऊ इंडिया स्वीग्गीड 2025’ च्या पुणे एडिशनमधून शहरातील बदलत्या खाद्यसंस्कृतीची झलक पाहा आणि गेलेल्या वर्षाचा स्वादिष्ट आढावा घ्या.

शहराच्या आवडीच्या चवी

14.86 लाख ऑर्डरसह चिकन बिर्याणीने पहिला क्रमांक पटकावला. त्यानंतर चिकन बर्गर (12.10 लाख) आणि चिकन फ्राय (10.5 लाख) यांना मोठी पसंती मिळाली. शहरातील टॉप फेव्हरिट्समध्ये वेज बर्गरही ठळकपणे दिसून आले.

डेझर्टच्या बाबतीत पुणेकरांची पसंती क्लासिकच राहिली. 1.48 लाख ऑर्डरसह चॉकलेट केक आघाडीवर राहिला. त्याच्या पाठोपाठ गुलाबजामुन (1.44 लाख) आणि बुंदी लाडू होते, ज्यातून पुणेकरांचे पारंपरिक गोड पदार्थांवरील प्रेम कायम असल्याचे दिसून आले.

पुण्यात नाश्ता हलका आणि आरामदायी असतो. 3.8 लाख ऑर्डरसह इडली हा सर्वाधिक लोकप्रिय पर्याय ठरला. त्यानंतर वेज डोसा (2.4 लाख) आणि स्थानिक आवडता वेज पोहे (1.79 लाख) यांना पसंती मिळाली.

सायंकाळच्या स्नॅकची भूक (दुपारी 3 ते संध्याकाळी 7) या वेळेत चिकन बर्गर (2.47 लाख ऑर्डर) आणि वेज बर्गर (1.86 लाख ऑर्डर) यांचे वर्चस्व होते. हलके, पोटभरीचे आणि पटकन खाता येणारे हे पर्याय सायंकाळच्या वेळेस पुणेकरांची पहिली पसंती ठरले.

उशिरा रात्रीच्या चवीसाठी (रात्री 12 ते पहाटे 2) ही मागणी जोरदार राहिली. 1 लाखांहून अधिक ऑर्डरसह चिकन बर्गरने आघाडी घेतली. त्यानंतर वेज बर्गर, तसेच चिकन बिर्याणी आणि वेज पिझ्झा हेही आवडीचे पर्याय ठरले.

पुणेकरांची बदलती खाद्यपसंती प्रादेशिक पदार्थांवरील वाढत्या उत्सुकतेतून दिसून आली. 27.6 टक्के वाढीसह गुजराती खाद्यपदार्थ सर्वात वेगाने लोकप्रिय ठरले, तर केरळ खाद्यपदार्थांमध्ये 23 टक्के वाढ नोंदवली गेली.

इन्कॉग्निटो आणि ग्रुप ऑर्डरिंग या फिचर्सचा वापर करणाऱ्या भारतातील टॉप 10 शहरांमध्ये पुण्याचा समावेश झाला. यावरून सोयीसाठी केलेल्या ऑर्डर्स आणि एकत्रित ऑर्डरिंगच्या संधी दोन्ही पुण्यात मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येते.

परवडणाऱ्या खाण्यालाही पुणेकरांनी चांगली पसंती दिली. 99 स्टोअर वर वेज बर्गर (1.28 लाख ऑर्डर) पहिल्या क्रमांकावर राहिले. त्यानंतर चिकन बर्गर आणि चिकन बिर्याणी यांचा क्रम लागतो.

डेस्क इट्स वर मॅकअलू टिक्की बर्गरने 2.54 लाख ऑर्डरसह आघाडी घेतली. चॉकलेट लावा केक आणि वेज पिझ्झा मॅकपफ यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला. डेस्क इट्स वर एका ग्राहकाने 67 महाराजा बर्गर कॉम्बो, 67 पिझ्झा मॅकपफ आणि 1 फ्राइज अशी 31,957 रुपयांची ऑर्डर दिली होती. खरंच भन्नाट ऑफिस पार्टी!

हाय प्रोटीन हे खरे एमव्हीपी ठरले. पुण्यातून 11.69 लाख हाय-प्रोटीन ऑर्डर्स देण्यात आल्या असून, या बाबतीत पुण्याचा देशातील टॉप 10 शहरांमध्ये समावेश झाला आहे.

 

बोल्ट मुळे शक्य झालेली झटपट फूड डिलिव्हरी

बोल्ट वर चिकन बिर्याणी (1.3 लाख ऑर्डर) आणि चिकन बर्गर (1.26 लाख ऑर्डर) हे दोन सर्वाधिक ऑर्डर केलेले पदार्थ ठरले. त्यानंतर वेज बर्गर, वेज इडली आणि आलू बर्गर यांचा क्रम लागतो.

बोल्ट वर डेझर्टमध्ये चोको लावा केक सर्वाधिक ऑर्डर करण्यात आला. जलेबी आणि रसमलाई यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला.

वीजेसारखी गती! चोकोहोलिक केक आणि स्ट्रॉबेरी कपकेक केवळ 3 मिनिटांत ग्राहकापर्यंत पोहोचवण्यात आले.

रात्री पुणेकरांना बर्गर खास आवडतात. दररोज रात्री 12 ते 2 या वेळेत 62 हून अधिक चिकन बर्गरची ऑर्डर दिली जात होती. वेज बर्गर आणि आलू बर्गर हेही टॉप 5 मध्ये होते.

अचानक पार्टीची तयारी? शहरातील सर्वात मोठी बोल्ट ऑर्डर एका ग्राहकाने दिली होती. या ऑर्डरमध्ये तब्बल 175 गोल्डन कॉर्न पिझ्झा मागवण्यात आले होते.

ट्रेंड्सबाबत सविस्तर माहिती देताना स्विगी चे फूड मार्केटप्लेसचे चीफ बिझनेस ऑफिसर सिद्धार्थ भाकू म्हणाले, “2025 मध्ये अन्न हे आपल्या दैनंदिन जीवनाचा आणि सण-उत्सवांचा अविभाज्य भाग राहिले. भारताने आपल्या आवडत्या पदार्थांचा मनसोक्त आनंद घेतला. पुणे शहरात आम्हाला पारंपरिक चवींवरील प्रेम आणि राष्ट्रीय स्तरावरील आवडत्या पदार्थांचा आराम यांचा सुंदर समतोल पाहायला मिळाला. उशिरा रात्रीच्या खाण्यापासून ते प्रीमियम डायनिंग आउटपर्यंत, पुणेकरांनी अन्नाच्या माध्यमातून शहराची समृद्ध सांस्कृतिक विविधता स्वीकारली. अन्न ही एक भावना आहे आणि शहराच्या प्रत्येक कोपऱ्यात, प्रत्येक जेवणातून, प्रत्येक साजऱ्या क्षणातून उत्कृष्ट फूड अनुभव देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

डायनिंग आउट

2025 मध्ये पुण्याच्या सामाजिक जीवनाचा डायनिंग आउट हा महत्त्वाचा भाग राहिला. स्विगी डाइन आउट मुळे पुणेकरांनी एकूण 64.35 कोटी रुपये वाचवले असून, यात वर्षागणिक 10.4 टक्के वाढ नोंदवली गेली.

बचत केवळ शहरभरच मर्यादित राहिली नाही. पुण्यातील एका ग्राहकाने एका बुकिंगमध्येच 93,588 रुपये वाचवले, जी देशातील पाचव्या क्रमांकाची सर्वाधिक बचत ठरली.

पुण्याचे नाईटलाइफ मध्यरात्रीनंतरही तितकेच सक्रिय राहिले. रात्री 12 ते पहाटे 3 या वेळेत भारतभरातील डायनिंग व्यवहारांमध्ये पुण्याने चौथा क्रमांक पटकावला.

मोठ्या गटातील सहली आणि सणासुदीच्या सेलिब्रेशनमुळे ग्रेट इंडियन रेस्टॉरंट फेस्टिव्हल (जीआयआरएफ 2025) दरम्यान मोठी बचत झाली. या काळात पुणेकरांनी तब्बल 26 कोटी रुपये वाचवले.

प्रीमियम डायनिंगला सातत्याने चांगला प्रतिसाद मिळत राहिला. 65,900 हून अधिक प्रीमियम डायनिंग बुकिंग्स नोंदवण्यात आल्या असून, यामध्ये वर्षागणिक 67 टक्के वाढ झाली आहे.

खास प्रसंगी पुणेकरांनी मनसोक्त खर्च केला. व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी स्विगी डाईन आउट द्वारे देशातील सर्वाधिक एकाच बिलाची नोंद पुण्यात झाली, ही रक्कम 1,19,257 रुपये इतकी होती. तसेच, व्हॅलेंटाइन डे बुकिंग्समध्ये पुण्याचा टॉप 5 शहरांमध्ये समावेश झाला.

वर्षभर सेलिब्रेशनचा उत्साह कायम राहिला. फादर्स डेच्या दिवशी देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक एकाच बिलाची नोंद झाली, ही रक्कम 58,764 रुपये इतकी होती. यावरून अनुभवाधारित डायनिंगकडे पुणेकरांचा वाढता ओढा स्पष्ट होतो.

 

 

आणखी मजा वाढवण्यासाठी, 2025 मधील भारतातील काही खास फूड ट्रेंड्स पाहा

तब्बल एका दशकापासून आवडता पदार्थ म्हणून ओळखली जाणारी बिर्याणी 2025 मध्येही निर्विवाद बादशहा ठरली. 2025 मध्ये एकूण 9.3 कोटी बिर्याणी ऑर्डर करण्यात आल्या (म्हणजे दर मिनिटाला 194 ऑर्डर किंवा दर सेकंदाला 3.25 बिर्याणी). ट्रेंड्स बदलत राहतात, पण या सुगंधी आणि लज्जतदार पदार्थावर भारताचं प्रेम कायम आहे, हे यातून पुन्हा एकदा सिद्ध झालं.

बिर्याणीच्या विश्वात चिकन बिर्याणी (5.77 कोटी ऑर्डर) सर्वाधिक लोकप्रिय ठरली असून, सर्वाधिक रिपीट ऑर्डर्सही याच प्रकारासाठी नोंदवण्यात आल्या.

बर्गर हे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक आवडते पदार्थ ठरले असून, 4.42 कोटी ऑर्डर्सची नोंद झाली. त्यानंतर पिझ्झा 4.01 कोटी ऑर्डर्ससह तिसऱ्या क्रमांकावर राहिले. याशिवाय वेज डोसा हा आणखी एक लोकप्रिय पदार्थ ठरला. 2.62 कोटी ऑर्डर्ससह या खुसखुशीत, सोनेरी क्लासिक पदार्थावर खाद्यप्रेमींचे प्रेम कायम असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

स्नॅक टाइम (दुपारी 3 ते संध्याकाळी 7) ही एक भावना आहे आणि आपण सगळेच त्यात रमतो. या वेळेत बर्गर सर्वाधिक ऑर्डर करण्यात आले. चिकन बर्गरने 63 लाख ऑर्डर्ससह आघाडी घेतली, तर वेज बर्गर 42 लाख ऑर्डर्ससह दुसऱ्या क्रमांकावर राहिले. याशिवाय चिकन रोल (41 लाख ऑर्डर्स), वेज पिझ्झा (36 लाख ऑर्डर्स) आणि चिकन नगेट्स (29 लाख ऑर्डर्स) हेही लोकप्रिय स्नॅक्स ठरले.

चहा-समोसा ही परंपरा 2025 मध्येही कायम राहिली. स्नॅक टाइममध्ये (दुपारी 3 ते संध्याकाळी 7) 34.2 लाख समोसे आणि 29 लाख आल्याची चहा ऑर्डर करण्यात आली.

डेझर्टचा आनंद आणि गोड लाड: 69 लाख ऑर्डर्ससह व्हाइट चॉकलेट केकने पहिला क्रमांक पटकावला. 2025 हे वर्ष देशी गोड पदार्थांवरील प्रेमाचंही ठरलं. चॉकलेट केक (54 लाख ऑर्डर्स) आणि गुलाबजाम (45 लाख ऑर्डर्स) हे टॉप 3 डेझर्ट्समध्ये होते. भारतीय मिठायांमध्ये काजू बर्फी (20 लाख ऑर्डर्स) आणि बेसन लाडू (19 लाख ऑर्डर्स) यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवला.

आईस्क्रीममध्ये 2025 हे वर्ष चॉकलेट फ्लेवरचं ठरलं. 33 लाख डार्क चॉकलेट आईस्क्रीम आणि 26 लाख चॉकलेट संडे ऑर्डर करण्यात आले.

जागतिक पदार्थांनीही ग्राहकांच्या कार्टमध्ये दमदार एन्ट्री केली. मेक्सिकन (1.6 कोटी ऑर्डर्स), तिबेटी (1.2 कोटीहून अधिक ऑर्डर्स) आणि कोरियन (47 लाख ऑर्डर्स) हे पदार्थ ग्राहकांचे फेव्हरिट ठरले. 2025 मध्ये ‘मॅचा’ हा सर्वाधिक सर्च करण्यात आलेला ग्लोबल फूड ट्रेंड ठरला.

हायपरलोकल म्हणजेच खरी अस्सल चव, असा ट्रेंड दिसून आला. स्थानिक पदार्थांवरील प्रेम वाढले. पहाडी खाद्यसंस्कृतीत तब्बल 9 पट वाढ नोंदवली गेली, तर मलाबारी, राजस्थानी, मालवणी आणि इतर प्रादेशिक पदार्थांच्या ऑर्डर्समध्ये गेल्या एका वर्षात जवळपास 2 पट वाढ झाली.

जेवणाच्या वेळांमध्ये डिनर हा निर्विवाद ‘बाहुबली’ ठरला. दुपारच्या जेवणाच्या तुलनेत रात्रीच्या जेवणाच्या ऑर्डर्स जवळपास 32 टक्क्यांनी अधिक होत्या.

मोठं मन, मोठी सेलिब्रेशन: सणासुदीची सुरुवात करण्यासाठी हैदराबादमधील एका ग्राहकाने ऑगस्ट महिन्यात 47,106 रुपये खर्च करून ड्राय फ्रूट कुकीज गिफ्ट पॅकचे तब्बल 65 बॉक्स ऑर्डर केले.

मुंबईतील एका फूडीने ‘दिवसभर डायनिंग’ या संकल्पनेला नवा अर्थ दिला. 2025 मध्ये त्याने स्विगी वर 3,196 फूड ऑर्डर्स दिल्या, म्हणजे जवळपास दररोज 9 ऑर्डर्स. देशातील ही सर्वाधिक संख्या ठरली.

भूक लागली किंवा अचानक क्रेव्हिंग्स झाल्या, तेव्हा बोल्ट ची झटपट फूड डिलिव्हरी उपयोगी ठरली. सर्वाधिक डिलिव्हरी बंगळुरूमध्ये झाल्या, त्यानंतर हैदराबाद आणि मुंबईचा क्रम लागतो. तसेच अहमदाबाद, जयपूर, विशाखापट्टणम (विझाग) आणि कोची हे बोल्ट साठी वेगाने पुढे येणारे महत्त्वाचे बाजार ठरले.

विशेष म्हणजे, मुंबईतील एका ग्राहकाने 99 स्टोअर वर तब्बल भव्य मेजवानीची ऑर्डर दिली. यामध्ये डम चिकन बिर्याणीचे 15 युनिट्स, चिकन मीटबॉल कबाबच्या 10 प्लेट्स, फलाफेल-ए-खास आणि पेपर पनीर बिर्याणीच्या प्रत्येकी 5 प्लेट्स, तसेच 100 गुलाबजाम यांचा समावेश होता. खरंच मोठी पार्टी असल्यासारखं दिसतं !

खरी ताकद ठरलेले आमचे डिलिव्हरी पार्टनर्स तुमच्या क्रेव्हिंग्स हसतमुखाने आणि गरम जेवणासह तुमच्यापर्यंत पोहोचवत राहिले. या वर्षी आमच्या डिलिव्हरी पार्टनर्सनी तब्बल 1.24 अब्ज किलोमीटरचा प्रवास केला. म्हणजेच काश्मीर ते कन्याकुमारी हे अंतर सुमारे 3,40,000 वेळा पार केल्यासारखं, आणि तरीही मध्ये चहासाठी थांबण्याइतकी ऊर्जा उरलेली !

बंगळुरूमधील आमचे डिलिव्हरी पार्टनर मोहम्मद रझीक यांनी यावर्षी तब्बल 11,718 ऑर्डर्स डिलिव्हर केल्या. तर चेन्नई येथील पार्टनर पूंगोडी यांनी 2025 मध्ये 8,169 ऑर्डर्स डिलिव्हर करत महिला डिलिव्हरी पार्टनर्समध्ये आघाडी घेतली.

 

आणखी स्वादिष्ट 2026 साठी शुभेच्छा !

टीप: येथे सादर केलेली सर्व आकडेवारी 1 जानेवारी ते 30 नोव्हें

बर 2025 या कालावधीत संकलित केलेल्या डेटावर आधारित आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments