Wednesday, August 26, 2026
Google search engine
HomeUncategorizedपीएनजी ज्वेलर्स तर्फे २०२६ चे ‘चेन अँड बँगल्स महोत्सव’ने स्वागत ५...

पीएनजी ज्वेलर्स तर्फे २०२६ चे ‘चेन अँड बँगल्स महोत्सव’ने स्वागत ५ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या या महोत्सवात सोन्याची चेन तसेच सोने व हिऱ्यांच्या बांगड्यांची आकर्षक श्रेणी उपलब्ध

पुणे, ८ जानेवारी २०२६ : भारतातील सर्वाधिक विश्वासार्ह वारसाहक्क लाभलेला दागिन्यांचा ब्रँड पीएनजी ज्वेलर्स पुन्हा एकदा आपल्या बहुप्रतिक्षित चेन अँड बँगल्स महोत्सवासह सज्ज झाला आहे. ५ जानेवारी २०२६ पासून देशभरातील सर्व पीएनजी ज्वेलर्स शोरूम्समध्ये सुरू होणारा हा महिनाभराचा महोत्सव, दैनंदिन वापरासाठी तसेच सण-समारंभांसाठी उपयुक्त अशा दोन प्रकारचे दागिने ग्राहकांना उपलब्ध करून देतो.

 

या महोत्सवात दैनंदिन वापरासाठी लागणारे दागिने, भेटवस्तू किंवा खास प्रसंगांसाठी अनुरूप अशा उत्तम दर्जाच्या सोन्याच्या चेन, आकर्षक बांगड्या तसेच अतिशय सुंदर अशा हिऱ्यांच्या बांगड्यांचा समावेश आहे. उत्कृष्ट कारागिरी आणि दीर्घकाळ टिकणारी डिझाईन्स असलेले दागिने ग्राहकांना उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

 

महोत्सवाच्या अंतर्गत, ग्राहकांना सोन्याच्या चेन आणि बांगड्यांवर प्रति ग्रॅम रुपये ५१५ इतकी थेट मेकिंग चार्ज सवलत मिळणार आहे. यासोबतच, हिऱ्याच्या बांगड्यांच्या मेकिंग चार्जवर थेट ५० टक्के सूट देण्यात येत आहे. ही ऑफर ५ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत सर्व पीएनजी ज्वेलर्स शोरूम्समध्ये वैध असेल.

 

या उपक्रमाविषयी बोलताना, पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ म्हणाले,

 

“भारतीय विवाहसंस्कृतीत चेन आणि बांगड्यांना विशेष स्थान आहे. हे दागिने वारसा म्हणून पुढील पिढ्यांकडे सुपूर्द केले जातात आणि विश्वास व सातत्याचे प्रतीक देखील मानले जातात. पीएनजी ज्वेलर्समध्ये असलेले मूल्य, वैविध्य आणि उत्कृष्ट कारागिरी यांचा संगम साधण्याची आमची बांधिलकी या महोत्सवातून दिसून येते.”

 

चेन अँड बँगल्स महोत्सवच्या निमित्ताने, नवीन वर्षाची सुरुवात परंपरा, शैली आणि सुंदर दागिने खरेदीच्या आनंदात साजरी करण्यासाठी पीएनजी ज्वेलर्स आपल्या सर्व ग्राहकांना आमंत्रण

देत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments