श्री संगमेश्वर विद्यालय संगोबा तालुका करमाळा जिल्हा सोलापूर या प्रशालेमध्ये सेवा भारती पश्चिम महाराष्ट्र या संघटनेच्या मार्फत आज दि 8/1/2026 रोजी प्रशालेस पूर्ण साऊड सिस्टीम संच प्रदान करण्यात आला या वस्तू वितरण करण्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने करमाळा तहसीलचे कर्तव्यदक्ष तहसीलदार आदरणीय शिल्पाताई ठोकडे मॅडम त्याचबरोबर जिल्हा संघचालक डॉ रमेशजी सिद्ध साहेब तसेच राजेंद्रजी तथा माऊली लाड साहेब जिल्हा उपाध्यक्ष पंढरपूर सेवा भारती तसेच सदानंदजी कुलकर्णी (प्रांताचे सामाजिक आयाम व आपत्ती व्यवस्थापन प्रमुख )श्रीकृष्ण पाटील प्रतीक गोरे पुणे प्रसन्न कुलकर्णी अकलूप्रवीण गायकवाड करमाळा अर्जुन शेळके सावडी प्रसन्नता कुलकर्णी करमाळा संग्राम परदेशी मनोज कुलकर्णी त्याचबरोबर पोथरे ग्रामपंचायतीचे सरपंच आदरणीय अंकुश शिंदे देवस्थानचे पुजारी गहिनाथ बप्पा गायकवाड तसेच बहुसंख्य पालक वर्ग सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू प्रशालेचे मुख्याध्यापक सुनील शिंदे सर विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी प्रशालेस ग्लास बोर्ड खेळाचे मैदान व स्वच्छतागृहाचे काम करून देण्याचे आश्वासन या सेवाभारतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रशालेस दिले सेवा भारती संघटना पश्चिम महाराष्ट्र प्रांत वतीने565 प्रकल्प प्रकल्प सेवा चालू आहे त सेवा भारती चार आयामांमध्ये 1 स्वावलंबन 2 शिक्षण 3 आरोग्य आणि 4 सामाजिक या क्षेत्रामध्ये सामाजिक सेवा करत आहेत सोलापूर जिल्हा मधये १९ ठिकाणी फिरती विज्ञान प्रयोग शाळा ,१५ किशोरी विकास प्रकल्प, असे उपक्रम चालवले जातात .यावेळी करमाळा तहसीलचे तहसीलदार आदरणीय शिल्पाताई ठोकळे मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्याचबरोबर आदरणीय सिद्ध साहेब व सदानंद कुलकर्णी यांनी सेवा भारती ची माहिती उपस्थितांना दिली प्रशालेचे मुख्याध्यापक सुनील शिंदे सर यांनी प्रास्ताविक करून सेवा भारतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण भागडे सर यांनी मानले व आभार हनुमंत चांदणे यांनी मानले
सदर कार्यक्रमात स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते


