Wednesday, August 26, 2026
Google search engine
HomeUncategorizedभव्य कलशयात्रेने गो-कथा सप्ताहाचा शुभारंभ श्री देशमुख महाराज फाऊंडेशनच्यावतीने प.पू. श्री गंगाधर...

भव्य कलशयात्रेने गो-कथा सप्ताहाचा शुभारंभ श्री देशमुख महाराज फाऊंडेशनच्यावतीने प.पू. श्री गंगाधर स्वामी यांच्या १९ व्या समाधी सोहळ्यानिमित्त सप्ताहाचे आयोजन

पुणे : टाळ-मृदंगाच्या गजरात, गो-मातेच्या जयघोषात आणि पारंपारिक वेशात डोक्यावर कलश घेतलेल्या महिला व पुरुष मोठ्या संख्येने कलश यात्रेत सहभागी झाले. भव्य कलश यात्रेने गो-कथा सप्ताहाचा उत्साहपूर्ण शुभारंभ झाला. पारंपारिक पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या या कलश यात्रेमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारून गेला होता.

 

श्री देशमुख महाराज फाऊंडेशनच्या वतीने प.पू. श्री गंगाधर स्वामी यांच्या १९ व्या समाधी सोहळ्यानिमित्त देशी गायींच्या प्रजातींबाबत जनजागृती करण्यासाठी पुण्यात प्रथमच गौ-कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. या सप्ताहाचे उद्घाटन पू. साध्वी कपिला दिदी गोपाल सरस्वती यांच्या हस्ते वर्धमान सभागृह, गंगाधाम चौक येथे संपन्न झाले. याप्रसंगी कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले. यावेळी कात्रज येथील इस्कॉन मंदिराचे उपाध्यक्ष संजय भोसले, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरुदास देशमुख महाराज, संस्थेच्या अध्यक्षा सुवर्णा बालेघाटे, विश्वस्त नरहर शिदोरे, वेदमुर्ती मंदार खळदकर, भोला वांजळे, प्रसाद खंडागळे, निरंजन गोळे, विरेंद्र कुंटे, अमित भुतडा आदी उपस्थित होते.

 

गुरुदास देशमुख महाराज म्हणाले, गाय ही हिंदू धर्मात पवित्र मानली जाते. अनेक वेद, पुराणे आणि धर्मग्रंथ गायीचे महत्व सांगितले आहे. देशी गायींच्या प्रजातींबाबत जनजागृती करण्यासाठी पुण्यात प्रथमच मोठया प्रमाणात गौ-कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. या सप्ताहाअंतर्गत सारसबाग येथील गणपती मंदिरात संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गो संवर्धन शपथविधी सोहळा पार पडला.

 

सोमवार, दिनांक १२ जानेवारी पर्यंत दररोज दुपारी ३ वाजता पू. साध्वी कपिला दिदी गोपाल सरस्वती यांचे प्रवचन होणार आहे. सप्ताहात गौसेवा करणा-या संस्था व गोरक्षकांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच देशी गायींच्या विविध प्रजातींचे प्रदर्शन भरविण्यात आले असून भाविकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे त्यांनी सां

गितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments