Wednesday, August 26, 2026
Google search engine
HomeUncategorizedमतदान जनजागृतीसाठी रविवारी ‘विंटेज कार रॅली’ पिंपरी चिंचवड महापालिकेकडून आयोजन, ...

मतदान जनजागृतीसाठी रविवारी ‘विंटेज कार रॅली’ पिंपरी चिंचवड महापालिकेकडून आयोजन, ऐतिहासिक व दुर्मिळ कार आणि बाईक प्रत्यक्ष पाहण्याची अनोखी संधी

पिंपरी, दि. ०९ जानेवारी २०२६ : पिंपरी चिंचवड सार्वत्रिक निवडणुकीसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीत मतदानाचे प्रमाण वाढावे, याबाबत जनजागृती करण्यासाठी महापालिकेच्या वतीने शहरात येत्या रविवारी, ११ जानेवारी रोजी “भव्य विंटेज कार रॅली व प्रदर्शनाचे” आयोजन करण्यात आले आहे.

 

या रॅलीला पिंपळे सौदागर येथील लिनिअर गार्डन येथून सकाळी ९ वाजता सुरुवात होणार असून रॅलीचा समारोप निगडी येथील नियोजित महापौर निवास मैदान येथे होणार आहे. या रॅलीच्या निमित्ताने नागरिकांना ऐतिहासिक व दुर्मिळ कार आणि बाईक प्रत्यक्ष पाहण्याची अनोखी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

 

महापालिका निवडणुकीत मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त अण्णा बोदडे यांच्या अधिपत्याखाली स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदान जनजागृतीसाठी विविध उपक्रमांचे आयोजन शहरामध्ये करण्यात येत आहे. या अनुषंगाने ११ जानेवारी रोजी “भव्य विंटेज कार रॅली व प्रदर्शनाचे” आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीची सुरुवात सकाळी ९ वाजता लिनिअर गार्डन, पिंपळे सौदागर येथून होणार आहे. त्यानंतर लांडेवाडी चौक मार्गे संत तुकाराम नगर, पिंपरी चौक, भाटनगर मार्गे चिंचवड, प्रेमलोक पार्क, आकुर्डी चौक, म्हाळसाकांत चौक मार्गे निगडी येथील नियोजित महापौर निवास मैदान येथे रॅली विसर्जित होऊन प्रदर्शनाला सुरुवात होणार आहे. या प्रदर्शनात विविध कंपन्यांच्या दुर्मिळ कार पाहण्याची संधी नागरिकांना मिळणार असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

…..

कोट

 

लोकशाही बळकट करण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत असून, विंटेज कार रॅलीच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत मतदानाचा संदेश आकर्षक पद्धतीने पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. या उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा.

– तृप्ती सांडभोर, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

…..

 

कोट

 

मतदानाची टक्केवारी वाढविणे हा स्वीप कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा यासाठी शहरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. विंटेज कार रॅली व प्रदर्शनाच्या माध्यमातून मतदानाचे महत्त्व अधोरेखित करण्यात येणार असून, या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. यानिमित्ताने नागरिकांना ऐतिहासिक व दुर्मिळ कार आणि बाईक प्रत्यक्ष पाहण्याची अनोखी संधी मिळेल.

– अण्णा बोदडे, उपायुक्त, पिंपरी चिं

चवड महापालिका

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments