Wednesday, August 26, 2026
Google search engine
HomeUncategorizedभक्तिमय वातावरणात भारती विद्यापीठात रंगली कीर्तन संध्या स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स...

भक्तिमय वातावरणात भारती विद्यापीठात रंगली कीर्तन संध्या स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स तर्फे आयोजन

पुणे : रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी, तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा, सर्व सुखाचे आगर बाप रखमाबाई… अशा एकाहून एक भावपूर्ण अभंगांनी, नादमय टाळ, सुरेल वीणा, हार्मोनियम, पखवाज व तबल्याच्या साथीने भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स तर्फे आयोजित कीर्तन सोहळा रंगला.

 

 

भारती विद्यापीठाचे संस्थापक कुलपती स्व. डॉ. पतंगराव कदम यांच्या जयंतीनिमित्त तसेच कार्यवाह डॉ. विश्वजीत कदम यांच्या वाढदिवसानिमित्त या कीर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सचे माजी विद्यार्थी ह.भ.प. गणेश महाराज भगत यांनी कीर्तन सादर केले.

 

महाराष्ट्राच्या वैभवशाली वारकरी संप्रदायाचे महत्त्व उलगडून सांगताना ह.भ.प. गणेश महाराज भगत यांनी संत तुकाराम महाराजांचा ‘काय सांगू आता संतांचे उपकार’ हा अभंग अर्थासहित सादर केला. त्यांच्या सुरेल आणि भावस्पर्शी कीर्तनाने उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले. रसिकांनी टाळ्यांच्या गजरात सहभागी होत कीर्तनाचा मनःपूर्वक आनंद लुटला.

 

या कार्यक्रमाला स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सचे संचालक डॉ. शारंगधर साठे, भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. आत्माराम पवार, संगीत विभागाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण कासलीकर उपस्थित होते.

 

कीर्तनाला श्रीहरी घनवट (पखवाज), आदिनाथ कुटे (तबला) आणि सुधीर टेकाळे (हार्मोनियम) यांनी साथसंगत केली.

 

डॉ. शारंगधर साठे म्हणाले, डॉ. पतंगराव कदम यांचे संपूर्ण कुटुंब वारकरी संप्रदायाशी निष्ठेने जोडलेले आहे. वारकरी विचार त्यांनी आयुष्यभर आपल्या कार्यातून समाजासमोर मांडले. त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या जयंतीदिनी हा वारकरी परंपरेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

 

ह.भ.प. गणेश महाराज भगत म्हणाले, आजच्या काळात वारकरी संप्रदायाचे वाढते महत्त्व लक्षात घेता, संपूर्ण जगात वारकरी शिक्षणाचा अभ्यासक्रम सुरू करणारे भारतीय विद्यापीठ हे पहिले विद्यापी

ठ ठरले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments