Wednesday, August 26, 2026
Google search engine
HomeUncategorizedसिंघल ट्रेडिंग कॉर्पोरेशनचा सन्मान

सिंघल ट्रेडिंग कॉर्पोरेशनचा सन्मान

पुणे, 9 जानेवारी 2026 :

बाटा इंडिया लिमिटेडचे अधिकृत वितरक असलेल्या सिंघल ट्रेडिंग कॉर्पोरेशन यांना वर्ष 2025 साठी पश्चिम विभागातील सर्वश्रेष्ठ विक्री वितरक म्हणून सन्मानित करण्यात आले.

 

बाटा इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गुंजन शाह, उपाध्यक्ष श्री. आशिष अरोरा तसेच क्षेत्रीय प्रमुख श्री. प्रियतम सिन्हा यांनी नुकतीच पिंपरी-चिंचवड येथील सिंघल ट्रेडिंग कॉर्पोरेशनला सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान बाटा कंपनीच्या पुढील कार्ययोजना, नवीन उत्पादन श्रेणी तसेच ग्राहकसेवेसंबंधी विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

 

याच दौऱ्याच्या निमित्ताने मुंबई, गुजरात, गोवा, मध्यप्रदेश व छत्तीसगड या राज्यांचा समावेश असलेल्या पश्चिम विभागातील सर्वोत्कृष्ट विक्री वितरक पुरस्कार सिंघल ट्रेडिंग कॉर्पोरेशनला प्रदान करण्यात आला.

 

या प्रसंगी बाटा कंपनीचे सहाय्यक विक्री व्यवस्थापक श्री. निर्मल तिवारी यांच्यासह सिंघल ट्रेडिंग कॉर्पोरेशनचे पवनकुमार अगरवाल, कपिल अगरवाल, पुनित अगरवाल व भाग्यवंती अगरवाल आदी मान्यवर उपस्थित होते.

 

बाटा कंपनीची उत्पादने गेल्या अनेक दशकांपासून ग्राहकांमध्ये लोकप्रिय असून कंपनीवर ग्राहकांचा दृढ विश्वास आहे. उत्कृष्ट विक्री व विक्रीपश्चात सेवेद्वारे सिंघल ट्रेडिंग कॉर्पोरेशनने हा विश्वास सातत्याने जपला आहे. त्यामुळे मिळालेला हा सन्मान म्हणजे त्यांच्या ग्राहकसेवेप्रती असलेल्या कटिबद्धतेची स्पष्ट पावती असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments