पुणे,12 जानेवारी 2026 : नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटर आणि एसएस इनोव्हेशन्स यांच्या सहकार्याने नुकतेच रोबोटिक सर्जरी : पॉवरिंग द फ्युचर या विषयावर सीएमई (कंटिन्युईंग मेडिकल एज्युकेशन) कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. हा सीएमई कार्यक्रम विशेषत: कर्करोग शल्यचिकित्सक,जनरल सर्जन्स,युरो-सर्जन्स आणि स्त्रीरोग तज्ञांसाठी आयोजित करण्यात आला होता. या सीएमई मध्ये तज्ञांची व्याख्याने,चर्चासत्रे तसेच संवादात्मक प्रश्नोत्तरे सत्रांचा समावेश होता.यामध्ये कोलोरेक्टल सर्जरी,जनरल सर्जरी,युरोलॉजी आणि स्त्रीरोग शल्यचिकित्सेत रोबोटिक्सची वाढती भूमिका यावर विशेष भर देण्यात आला.
या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटरचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.दिलीप माने, संचालक डॉ.दिविज माने, समुह कार्यकारी अधिकारी डॉ.संजय पठारे,संचालक डॉ.एच.के.साळे यांसह फोर्टिस हेल्थकेअरमधील सर्जिकल आँकोलॉजीचे संचालक डॉ.अविनाश सखलानी, मुत्ररोगतज्ञ व मुत्रपिंड प्रत्यारोपण तज्ञ डॉ.रितेश मोंघा,रोबोटिक स्त्रीरोग शस्त्रक्रिया तज्ञ व ॲपेक्स हॉस्पिटलच्या संचालिका डॉ.लीना मेहरोत्रा आणि नोबल हॉस्पिटलमधील रिप्रॉडक्टीव्ह मेडिसिन विभागातील मानद प्राध्यापिका डॉ.लिझेलॉट मेटलर आदी नामवंत तज्ञ उपस्थित होते.
उपस्थित तज्ञांनी रोबोटिक शस्त्रक्रियेमधील वैद्यकीय परिणाम,तांत्रिक प्रगती आणि भविष्यातील प्रवाहांवर सखोल चर्चा केली.रोबोटिक प्लॅटफॉर्ममुळे शस्त्रक्रियेतील अचूकता,सुरक्षितता आणि रूग्णांच्या उपचार परिणामांवर कसा प्रभाव पडत आहे,यावर त्यांनी प्रकाश टाकला.या सीएमई कार्यक्रमातून सहभागी डॉक्टरांना 2 एमएमसी गुण देण्यात आले.
नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटरचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.दिविज माने म्हणाले की,रोबोटिक शस्त्रक्रियेमुळे शस्त्रक्रियेनंतर होणाऱ्या वेदना व अस्वस्थता लक्षणीयरित्या कमी होते,तसेच रूग्णांचा बरे होण्याचा कालावधीही अधिक जलद असतो. हा उपक्रम वैद्यकीय शिक्षण, नवकल्पना आणि उच्च दर्जाची रूग्णसेवा वाढविण्याच्या आमच्या वचनबध्दतेचा एक भाग आहे. शल्यचिकित्सा क्षेत्रात अशा उत्कृष्ट तंत्रांचे मापदंड प्रस्थापित करून सर्वांसाठी अधिक दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे,हे आमचे ध्येय आहे.
नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटरमधील आँको सर्जन डॉ.आशिष पोखरकर म्हणाले की,एसएसआय मंत्रा 3 रोबोटिक सर्जरी प्लॅटफॉर्म्समुळे खुली शस्त्रक्रिया किंवा लॅप्रोस्कोपिक दृष्टीकोनाच्या तुलनेत अगदी गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांमध्ये देखील अचूकता ,कमी रक्तस्त्राव आणि जलद पुर्नप्राप्ती साध्य करता
येते.


