Wednesday, August 26, 2026
Google search engine
HomeUncategorizedभारत इलेक्ट्रिसिटी समिट २०२६*

भारत इलेक्ट्रिसिटी समिट २०२६*

 

 

*पुणे;* नवी दिल्‍लीमधील द्वारका येथील यशोभूमी येथे १९ मार्च ते २२ मार्चपर्यंत थीम ‘इलेक्ट्रिफाइंग ग्रोथ. एम्‍पॉवरिंग सस्‍टेनेबिलिटी. कनेक्टिंग ग्‍लोबली’ अंतर्गत भारत इलेक्ट्रिसिटी समिट २०२६ चे आयोजन करण्‍यात आले आहे. या समिटमध्‍ये जगभरातील धोरणकर्ते, उद्योग प्रमुख, तंत्रज्ञान प्रदाते, गुंतवणूकदार आणि तज्ञ एकत्र येतील, जे विद्युत यंत्रणांच्‍या भविष्‍याला आकार देण्‍याबाबत, तसेच वीज निर्मिती, पारेषण, वितरण, साठा व स्‍मार्ट वापर यांबाबत चर्चा करतील.

 

*या समिटमध्‍ये ५० हून अधिक उच्‍च-स्‍तरीय चर्चासत्रे, ३०० हून अधिक प्रवक्‍ते,* १,००० प्रतिनिधी, ५०० हून अधिक प्रदर्शक आणि २५,००० हून अधिक अभ्‍यागत असण्‍याची अपेक्षा आहे, ज्‍यामुळे हा जागतिक स्‍तरावरील सर्वात मोठा वीज-केंद्रित प्‍लॅटफॉर्म ठरेल. भारत इलेक्ट्रिसिटी समिट २०२६ हा ऊर्जा मंत्रालय व उद्योग नेतृत्वित उपक्रम आहे आणि इंजीनिअरिंग एक्‍स्‍पोर्ट प्रमोशन कौन्सिल (ईईपीसी इंडिया) द्वारे समन्वियत असून पॉवरग्रिड (नोडल), एनटीपीसी, पीएफसी, आरईसी, एनएचपीसी यांचे संयुक्‍त पाठबळ आहे.

 

*भारत इलेक्ट्रिसिटी समिट २०२६ बाबत अधिक माहितीसाठी कृपया भेट द्या:*

 

www.bharatelectricitysummit.com

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments