Tuesday, August 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedॲमवे इंडियाने त्वचा, केस आणि नखांच्या आरोग्यासाठी 'न्युट्रीलाईट बायोटिन सी प्लस' (झिंक...

ॲमवे इंडियाने त्वचा, केस आणि नखांच्या आरोग्यासाठी ‘न्युट्रीलाईट बायोटिन सी प्लस’ (झिंक आणि बीटा कॅरोटीन) लाँच केले.

शास्त्रीयदृष्ट्या तयार केलेले हे असे ‘न्यूट्रास्युटिकल’ आहे, ज्यामध्ये निरोगी केस, त्वचा आणि नखांना पोषक घटक आहेत

 

 

 

नवी दिल्ली, 21st January 2026: आजच्या धावपळीच्या युगात, रात्री उशिरापर्यंत जागणे, अति ताणतणाव आणि पोषक तत्वांची कमतरता असलेल्या आहारामुळे संपूर्ण निरोगी केस राहत नाहीत, त्वचा आणि नखांचेही नैसर्गिक सौंदर्य आणि टवटवीतपणा कमी होऊ शकतो. सध्या ग्राहक ‘अंतर्गत सौंदर्या’ला अधिक महत्त्व देत आहेत. हे लक्षात घेऊन, आरोग्य आणि काळजीसाठी कार्यरत असणारी आघाडीची कंपनी ‘ॲमवे इंडिया’ने न्युट्रीलाईट™ बायोटिन सी प्लस (झिंक आणि बीटा कॅरोटीनसह) लाँच केले आहे. हे एक शास्त्रीयदृष्ट्या विकसित केलेले ‘न्यूट्रास्युटिकल’ असून यामध्ये केस, त्वचा आणि नखांना आतून निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक घटकांचा समावेश आहे. ‘बियॉन्ड बायोटिन’ अशी ओळख असलेले हे उत्पादन केवळ एका घटकापुरते मर्यादित न राहता बायोटिन, व्हिटॅमिन सी आणि झिंक या तीन आवश्यक पोषक तत्वांचे 100% शिफारस केलेले दैनंदिन प्रमाण (RDA) मिळवून देते. तसेच यात बीटा कॅरोटीनचाही समावेश आहे, जे विज्ञानाधारित पोषण आणि वनस्पती-आधारित आरोग्यावर ॲमवेचा असलेला विश्वास अधिक दृढ करते. न्युट्रीलाईटच्या 90 वर्षांहून अधिक काळातील पोषण क्षेत्रातील अनुभवातून विकसित केलेले हे उत्पादन दैनंदिन पोषणावर लक्ष केंद्रित करते.

 

 

 

या लाँचप्रसंगी बोलताना ॲमवे इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक, रजनीश चोप्रा म्हणाले: “आजचे ग्राहक हे वाढत्या प्रमाणात ओळखू लागले आहेत की आपले सर्वांगीण आरोग्य आणि बाह्य सौंदर्य यांचा एकमेकांशी खोलवर संबंध आहे. ॲमवेमध्ये आमचा नेहमीच असा प्रयत्न राहिला आहे की, विज्ञानावर आधारित आणि निसर्गापासून प्रेरित पोषणाद्वारे लोकांना अधिक समृद्ध जीवन जगण्यास सक्षम करावे. न्युट्रीलाईट™ बायोटिन सी प्लस (झिंक आणि बीटा कॅरोटीनसह) चे लाँच आमच्या ‘ब्युटी फ्रॉम विदिन’ पोषण पोर्टफोलिओला अधिक बळकट करते. हे उत्पादन केवळ बायोटिनपुरते मर्यादित नसून, दैनंदिन आरोग्याच्या गरजा पूर्ण करणारे एक सर्वसमावेशक पोषक सूत्र प्रदान करते. हे आमच्या त्या वचनबद्धतेचेही प्रतीक आहे, ज्याद्वारे आम्ही नाविन्यपूर्ण उत्पादने आणून लोकांना त्यांच्या आरोग्याची स्वतःहून काळजी घेण्यास आणि ते सुधारण्यास प्रोत्साहित करतो.”

 

 

 

न्युट्रीलाईट बायोटिन सी प्लस (झिंक आणि बीटा कॅरोटीनसह) च्या फक्त १ टॅब्लेटमध्ये आहे:

ü 40 mcg बायोटिन = 19 मध्यम आकाराच्या केळ्यांमधील बायोटिन

ü 65 mg व्हिटॅमिन सी = 8 कप कच्च्या चिरलेल्या भोपळ्यामधील व्हिटॅमिन सी

ü 13.2 mg झिंक = 5.2 कप नाचणीमधील (रागी) झिंक

ü 25 mg बीटा कॅरोटीन = 12 लाल गाजरांमधील बीटा कॅरोटीन

न्युट्रीलाईट™ बायोटिन सी प्लस (झिंक आणि बीटा कॅरोटीनसह) मध्ये काळजीपूर्वक निवडलेल्या अत्यावश्यक पोषक तत्वांचे मिश्रण आहे. बायोटिन केसांची वाढ होण्यास आणि केसांच्या मुळांच्या आरोग्यास मदत करते. झिंक हे नखे मजबूत करण्यास आणि ती निरोगी राखण्यास मदत करते, तसेच त्वचेच्या आरोग्यालाही आधार देते. व्हिटॅमिन सी कोलेजन निर्मितीला चालना देते आणि पेशींना ‘ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस’पासून वाचवण्यासाठी अँटीऑक्सिडंट संरक्षण प्रदान करते. या फॉर्म्युलेशनची उपयुक्तता वाढवणारे ‘बीटा कॅरोटीन’ हे निसर्गातील वनस्पतींच्या सर्वात समृद्ध स्रोतांपैकी एक असलेल्या ‘शेवाळापासून’ मिळवले जाते. हे सूर्याच्या किरणांमुळे होणाऱ्या हानीपासून निसर्गाचे ‘संरक्षण कवच’ म्हणून कार्य करते. हे अतिनील (UV) किरणांचा प्रभाव कमी करण्यास मदत करते आणि या किरणांमुळे त्वचेवर येणाऱ्या लालसरपणापासून तिचे संरक्षण करते.

 

 

 

18 वर्षे आणि त्यावरील प्रौढांसाठी तयार केलेले, न्युट्रीलाईट™ बायोटिन सी प्लस (झिंक आणि बीटा कॅरोटीनसह) हे संतुलित आहार आणि निरोगी जीवनशैलीचा भाग म्हणून दररोज एक टॅब्लेट याप्रमाणे घेण्याचे सुचवण्यात आले आहे. हे उत्पादन एक ‘न्यूट्रास्युटिकल’ असून ते औषधी उपयोगासाठी नाही, तसेच विविध प्रकारच्या (नैसर्गिक) आहाराला पर्याय म्हणून याचा वापर करू नये.

 

 

 

न्युट्रीलाईट™ बायोटिन सी प्लस (झिंक आणि बीटा कॅरोटीनसह) आता विशेषतः वितरक/ॲमवे बिझनेस ओनर्स, भारतभरातील ॲमवे स्टोअर्स आणि www.amway.in वर उपलब्ध आहे.

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments