Tuesday, August 25, 2026
Google search engine
HomeUncategorized‘बजाज पुणे ग्रँड टूर’अंतर्गत तिसऱ्या टप्प्याचे २२ जानेवारी रोजी आयोजन*   *सासवड,...

‘बजाज पुणे ग्रँड टूर’अंतर्गत तिसऱ्या टप्प्याचे २२ जानेवारी रोजी आयोजन*   *सासवड, बारामती तालुक्यातील नागरिकांनी नामांकित सायकलपटूचे कौशल्य बघण्याची संधी*

 

 

पुणे, दि. २१: ‘बजाज पुणे ग्रँड टूर–२०२६’अंतर्गत गुरुवार, दि. २२ जानेवारी २०२६ रोजी टप्पा क्रमांक तीनचे सासवड ते बारामती दरम्यान आयोजन करण्यात आले आहे, या स्पर्धेची सुरुवात दुपारी १२ वाजून ३० वाजता सासवड येथील नगरपरिषद, चंदन टेकडी येथून होणार असून बारामती येथील विद्या प्रतिष्ठान कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय येथे शेवट होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी देश-विदेशातील सायकलपटूचे कौशल्य बघण्याची संधी मिळणार आहे.

 

या टप्प्यात सासवड व बारामती तालुक्यातून रेस जाणार आहे. या स्पर्धेची एकूण १३७.७ किलोमीटर आहे. प्रशासनाने मार्गावर संपूर्ण स्वच्छता राहील, यादृष्टीने स्थानिकांना विश्वासात घेवून सूक्ष्म नियोजन करण्यात आले, स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिक, गृहनिर्माण सोसायटी व गणेश मंडळाचे पदाधिकारी, महाविद्यालये, राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, क्रीडा संघटनेचे पदाधिकारी आदी घटकांनी मिळून प्रशासनासोबत स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे.

 

*असा असेल स्पर्धेचा टप्पा-३*

येथून स्पर्धेचा प्रारंभ होऊन सासवड, सुपे, पानवडी घाट, काळदरी (बोरी फाटा), मांढर, माहूर, परींचे, हरणी, वाल्हे, पिसुर्टी, नीरा, ब्राह्मणधरा, मुर्टी, मोरगाव, तरडोली, जळगाव क.प., कऱ्हावागज, खंडोबानगर, पिंपळी, लिमटेक, कन्हेरी, रुई रोड सावळ, वंजारवाडी आणि विद्या प्रतिष्ठान कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, बारामती येथे स्पर्धेचा शेवट होणार आहे.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments