पुणे, दि. 21 जानेवारी (जिमाका वृत्तसेवा): पक्की अनुज्ञप्ती चाचणी अपॉइंटमेंट वेळेत मिळण्यासाठी नागरिकांच्या सोयीसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे अंतर्गत आयडीटीआर व आळंदी रोड कार्यालय, फुलेनगर येथे पक्क्या अनुज्ञाप्तीच्या अपॉइंटमेंट कोट्यामध्ये खालीलप्रमाणे 22 जानेवारी 2026 पासून वाढ करण्यात येत आहे. या अपॉइंटमेंट सकाळी 6 वाजलेपासून दुपारी 4 वाजेपर्यंत घेता येईल.
आळंदी रोड कार्यालय, फुलेनगर येथे केवळ दुचाकी संवर्गातील चाचणी असल्यास आळंदी रोड कार्यालय येथे चाचणीकरिता उपस्थित रहावे. केवळ दुचाकी वगळता इतर सर्व संवर्गातील चाचणी या आयडीटीआर, कासारवाडी, पुणे येथे होणार आहेत.
अनुज्ञाप्तीचा अपॉइंटमेंट कोटा पुढीलप्रमाणे करण्यात येणार आहे. ज्या अर्जदारांची शिकाऊ अनुज्ञप्तीची मुदत 7 दिवसात संपत आहे अशा उमेदवारांकरीता अतिरिक्त 99 अपॉइंटमेंट पुढीलप्रमाणे सुरु करण्यात आल्या आहेत. दुचाकी 32, तीनचाकी 13 व चारचाकी 54.
उमेदवारांनी शिकाऊ अनुज्ञप्तीच्या कोट्यातील अपॉइंटमेंट ही आगाऊ शिकाऊ अनुज्ञप्तीची मुदत संपण्यापूर्वीच्या सात (7) दिवसात घेता येते. त्यामुळे सर्व अर्जदारांनी वाढीव कोट्याचा लाभ घेत आपली अपॉइंटमेंट शक्य तितक्या लवकर आरक्षित करावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे यांनी केले आहे.
0000


