Tuesday, August 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedमंडईच्या शारदा गणपती मंदिरात गणेश जन्मोत्सव उत्साहात साजरा अखिल मंडई मंडळ...

मंडईच्या शारदा गणपती मंदिरात गणेश जन्मोत्सव उत्साहात साजरा अखिल मंडई मंडळ : मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती

 

 

पुणे : शारदा गणपतीला फुलांची केलेली आकर्षक सजावट, मंदिरासमोर काढलेली रांगोळी आणि फुलांनी सजवलेला पाळणा अशा भक्तिमय वातावरणात अखिल मंडई मंडळाच्या शारदा गणपती मंदिरात पारंपारिक पद्धतीने गणेश जन्म साजरा करण्यात आला. …’कैलास पार्वती आनंद झाला..तेजस्वी बालक जन्मास आला’ ‘सुखहर्ता दुखहर्ता म्हणतात तुला, जो बाळा जो जो रे जो’ हा पाळणा म्हणत गणेश भक्तांनी गणेश जन्माचा आनंद सोहळा साजरा केला.

 

यावेळी मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, आळंदी देवस्थानच्या प्रथम महिला विश्वस्त अॅड. रोहिणी पवार, सचिव विश्वास भोर, सुचेता थोरात, अनुजा थोरात, साधना मते, मोनाली मोरे, विद्या घाणेकर काकू, अंकु थोरात, रुही शहा, सावी शहा, विजया शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

 

अण्णा थोरात म्हणाले, गणेश जयंतीनिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ६ वाजल्यापासून अभिषेक व गणेश याग करण्यात आला, तर सायंकाळी पालखी पूजन व नगर प्रदक्षिणा मिरवणूक भक्तिभावात पार पडली. यंदा शारदा गजाननासाठी करण्यात आलेली वैशिष्ट्यपूर्ण फुलांची सजावट भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरली.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments