Tuesday, August 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedहायड्रोजन आयसी इंजिन विकास सुविधा केंद्र वर्षभरात सुरु होणार एआरएआयचे संचालक...

हायड्रोजन आयसी इंजिन विकास सुविधा केंद्र वर्षभरात सुरु होणार एआरएआयचे संचालक डॉ. रेजी मथाई यांची माहिती

पुणे, दि. २२ जानेवारी, २०२६ : भारतामध्ये हायड्रोजन आयसी इंजिन विकास सुविधा केंद्र येत्या वर्षभरात सुरु होणार असल्याची माहिती ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात एआरएआयचे संचालक डॉ. रेजी मथाई यांनी दिली. एआरएआयच्या वतीने येत्या मंगळवार दि. २७ जानेवारी ते शुक्रवार दि. ३० जानेवारी, २०२६ दरम्यान ‘सिम्पोझियम ऑन इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी (एसआयएटी २०२६)चे आयोजन करण्यात आले आहे, त्या निमित्त आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये डॉ. मथाई बोलत होते.

 

वाहनउद्योग क्षेत्रात अनेक नवीन तंत्रज्ञान येत आहे, त्यामुळे भविष्यकाळामध्ये होणाऱ्या बदलाचा विचार करून एआरएआयमध्ये देखील विविध विषयावर संशोधन सुरु झाले असल्याचेही डॉ. मथाई म्हणाले.

 

डॉ. मथाई पुढे म्हणाले की, “देशामध्ये रस्ता अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे, त्यामुळे वाहनांची सुरक्षा हा विषय महत्वाचा बनला आहे. बाजारात नव्याने येणारी वाहने अधिक सुरक्षित कशी असतील, त्यासाठी त्यामध्ये कोणते तंत्रज्ञान असायला हवे, याचे संशोधन करून त्यासाठीचे उत्तम व सक्षम पर्याय उपलब्ध करून देण्यास संस्था अधिक महत्व देत आहे.”

 

नवीन व्यावसायिक मंडळींना चालना देण्यासाठी केंद्र सरकारने सुरु केलेल्या स्टार्टअप कंपन्यांना पाठींबा देऊन त्यांना आवश्यक असणारे तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याचे काम देखील संस्था करत आहे. गेल्या तीन-चार वर्षांच्या अवधीत संस्थेने १८ पेटंटची नोंद केली आहे. इंटेलिजंट व्हेईकल टेकनॉलॉजी या तंत्राच्या साह्याने देशातील वाहतुकीच्या संदर्भातील माहिती जमा करणे, वाहनांची चाचणी करणे, डिजिटल सेन्सर याचा अभ्यास एआरएआयच्या वतीने करण्यात येत आहे. इंधनामुळे होणाऱ्या वायू प्रदूषणामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत, त्याचा अभ्यास करून त्यावर कोणते उपाय प्रभावी ठरू शकतात याचा अभ्यास देखील संस्था करत आहे, अशी माहितीही डॉ. मथाई यांनी दिली.

 

पुण्यात वाहनांमुळे होणाऱ्या वायू प्रदूषणाच्या बाबत एआरएआयने एक अहवाल तयार करून त्यामध्ये काही सूचना केल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच हा अहवाल पुणे महापालिकेला देण्यात आला असल्याचे डॉ, मथाई यांनी यावेळी नमूद केले.

 

आगामी काळात भारतामध्ये तयार होणारे ऑटोमोबाइलचे सुटे भाग, घरामध्ये आणि बाहेर वापरण्यात येणारे दिवे यांची तपासणी करण्यासाठी फोटोमेट्रिक प्रयोगशाळा उभी करण्याचे नियोजन एआरएआय च्या वतीने करण्यात आले आहे. MARG 2.0 अंतर्गत प्रगत मापन संवेदकांच्या सहाय्याने व डेटा विश्लेषणाच्या माध्यमातून, रस्त्यांची असमतलता व रस्त्याच्या पृष्ठभागाची अवस्था इंटरनॅशनल रफनेस इंडेक्स (आय.आर.आय.) च्या आधारे अचूक मोजली जात आहे. आजपर्यंत एआरएआयने देशातील सुमारे २० राज्यांमधील अंदाजे ५०,००० किमी रस्त्यांचा डेटा संकलित केला आहे. हा डेटा वाहन रचना विकास, विश्वसनीयता व आयुष्य मूल्यांकन, प्रवास-सुखदता विश्लेषण चाचण्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे. एआरएआयने बॅटरी टेस्टिंग लॅब, हायड्रोजन वगळून सिलेंडर टेस्टिंग आणि एडीएएस स्मार्ट सिटी ट्रॅक या सुविधा सुरु केल्याचे डॉ. मथाई यावेळी म्ह

णाले.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments