Tuesday, August 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedएमआयटी डब्ल्यूपीयूत ‘मराठी भाषा आणि बोली’ विषयावर परिसंवाद २४ जानेवारी रोजी

एमआयटी डब्ल्यूपीयूत ‘मराठी भाषा आणि बोली’ विषयावर परिसंवाद २४ जानेवारी रोजी

 

 

पुणे, दि. २२ जानेवारी : मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी (डब्ल्यूपीयू) च्या स्कूल ऑफ एज्युकेशन यांच्या तर्फे ‘मराठी भाषा आणि बोली’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवार दि. २४ जानेवारी रोजी दुपारी ३ वा. कोथरुड येथील एमआयटी डब्ल्यूपीयूच्या ज्ञानेश्वर सभागृह संपन्न होणार आहे. अशी माहिती डब्ल्यूपीयूच्या स्कूल ऑफ एज्युकेशन विभागातर्फे देण्यात आली आहे.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड आणि कार्याध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड यांच्या मार्गदर्शनात परिसंवादाचे आयोजन होत आहे.

परिसंवादात ‘भाषा, बोली आणि आपण’ या विषयावर सुशील धसकटे, ‘भाषा, बोली आणि वृत्तपत्र’ या वर उद्धव धुमाळे आणि धनंजय भावलेकर हे ‘भाषा, बोली आणि चित्रपट’ या विषयावर आपले विचार व्यक्त करतील.

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे सचिव डॉ. शामकांत देवरे व डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. अध्यक्षस्थानी स्कूल ऑफ एज्युकेशनच्या प्राचार्य डॉ. शालिनी टोणपे असतील. तसेच स्कूल ऑफ लिबरल आर्टसचे अधिष्ठाता डॉ. विशाल घुले हे उपस्थित राहतील.

कार्यक्रमाचे समन्वयक महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे संपादकीय सहायक सागर शंकर आणि स्कूल ऑफ एज्युकेशनचे सहायक प्राध्यापक प्रा. प्रिया काळे आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments