Tuesday, August 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedसांस्कृतिक कार्य संचालनालया तर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त पुण्यात देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन*

सांस्कृतिक कार्य संचालनालया तर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त पुण्यात देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन*

 

 

पुणे, दि. २३ (जिमाका वृत्तसेवा) : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राज्यातील विविध ठिकाणी देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून, पुणे महसूल विभागासाठी ‘वंदे मातरम्’ हा देशभक्तीपर गीत व नृत्याविष्काराचा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम सोमवार, दि. २६ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता पंडित भीमसेन जोशी नाट्यमंदिर, औंध, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे.

 

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. देशभक्तीची भावना जागविणाऱ्या मराठी व हिंदी गीतांसह नृत्याविष्कारातून या कार्यक्रमात राष्ट्रप्रेमाचा जागर केला जाणार आहे.

 

या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक डॉ.अभिजित कोसंबी, दीक्षा जाधव, भूमी जाधव यांच्यासह मराठी संगीत मालिकेतील वादक सुनील जाधव, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शिटीवादक निखिल राणे सहभागी होणार असून, सुरेल मराठी व हिंदी गीतांचे सादरीकरण रसिकांना अनुभवता येणार आहे.

 

किंकणी कला ॲकॅडमी निर्मित या कार्यक्रमात गीत, संगीत आणि नृत्याचा सुरेख संगम सादर होणार आहे.

हा कार्यक्रम सर्वांसाठी प्रवेश विनामूल्य असून, जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून या देशभक्तीपर सांस्कृतिक मेजवानीचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments