……विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा,महिला सशक्तीकरण तसेच गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी “सेवा सहयोग स्कूल किट” आदी सेवा कार्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी मदत.
अनेक महिला स्वावलंबी
– – शैलेश घाटपांडे
कार्यकारी संचालक
सेवा सहयोग फाऊंडेशन
पुणे
(बातमीदार)
“सेवा सहयोग फाऊंडेशन” द्वारा विविध सामाजिक उपक्रमांद्वारे आपल्या देशात तर “सेवा इंटरनॅशनल” द्वारा भारताबाहेरील देशांमध्ये शैक्षणिक,आरोग्य व महिला सशक्तीकरण,दिव्यांग क्षेत्रामध्ये विद्यार्थांसाठी,नागरिकांसाठी उल्लेखनीय कार्य करत असून याचा फायदा हजारो वंचित महिलांना तसेच विद्यार्थ्यांना होत असल्याचे सेवा सहयोग फाउंडेशन चे कार्यकारी संचालक शैलेश घाटपांडे यांनी सांगितले.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कर्वेनगर येथील सह्याद्री प्रभात शाखेमध्ये अकराव्या व्याख्यानमालेच्या निमित्ताने शैलेश घाटपांडे बोलत होते.
“सेवा सहयोग “द्वारे वस्तीमध्ये राहणाऱ्या गरीब व होतकरू मुलांसाठी स्कूल किट वाटप,विद्यार्थी विकास योजना,विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना,सेवा भोजन योजना,विविध वस्त्यांमधील तरुण मुलींसाठी किशोरी विकास योजना,द्वारा स्वच्छता व स्वास्थ्य जागृती,उर्मी प्रकल्प,व्यक्तिमत्व विकाससाठी विविध संस्कार,प्रशिक्षण शिबिरे,अभ्यासिका चालवत आहे.महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी महिला सशक्तीकरण कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण व व्यवसाय उभारणीसाठी स्वावलंबन मार्गदर्शन,व्यवसाय मार्गदर्शन,समुतकर्ष योजना सुद्धा करीत आहे.याचा फायदा त्यांना होऊन अनेक महिलांनी आपले महिला स्वयंसेवी बचत – गट स्थापन करून आपले छोटे उद्योग सुरू केले आहेत व स्वावलंबी झाले आहेत.दिव्यांग मुलांसाठी सेवा सहयोग ने तीन ठिकाणी केंद्र सुरू केले आहेत.
“निर्मल वारी” प्रकल्प तर अनेक वर्षापासून पंढरपूर वारी मधील वारीतील गावांमध्ये यशस्वी झाले असून अनेक उच्चशिक्षित कार्यकर्ते स्वतः कार्य करीत आहे.यात दरवर्षी दिंडी चालक व वारकरी मंडळी,त्या त्या गावातील गावकरी,सरपंच,ग्रामसेवक यांचे या निर्मल वारी कार्यास सहकार्य लाभत आहे व ग्रामीण भागातील आरोग्याचा प्रश्न सुटण्यास मदत होत असते.असेही शैलेश घाटपांडे यांनी सांगितले आहे.या निर्मल वारी कार्याची ची नोंद राज्य शासनाने पण घेतली आहे.
युवकांसाठी “युथ फॉर सेवा” जिज्ञासा योजना पण समाजात फार लोकप्रिय झाली आहे.याद्वारे तरुण मंडळी या सेवा कार्यात जोडली गेली आहे.
शाळेतील मुलांना बालवयापासून बचतीची सवय लागावी म्हणून”मॅजिक गुल्लक”अर्थात “जादुई गुल्लक” योजना नुकतीच सुरू केली आहे.याद्वारे नाममात्र शुल्क मध्ये “बचत बँक- मॅजिक गुल्लक” दिली जाते त्यावर आकर्षक अशी त्यावर चित्र रचना मुलांनीच तयार करून दररोज घरखर्चातून काही रक्कम शिक्षणासाठी बाजूला काढावयाची असते .यातून विद्यार्थ्यांना स्वतः “बचत बँक -जादुई गुल्लक “तयार करून त्यावर संकल्प चित्र रंगविण्यामध्ये मजा येते,आनंद मिळतो.अनेक शाळांमधून हजारो विद्यार्थी यात सहभागी होत आहेत.यवतमाळ जिल्ह्यातील काही शाळांमधील आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये स्थानिक स्वयंसेवी संघटनाद्वारे ही योजना लोकप्रिय व यशस्वी झाली आहे.
सेवा सहयोग द्वारे दर वर्षी “सी एस आर निधी” चे प्रशिक्षण वर्ग आयोजित केले जाते.यात बहुराष्ट्रीय कंपन्या तसेच अनेक खाजगी कंपन्यांचे सी एस आर निधीचे संबंधित अधिकारी व स्वयंसेवी संघटनांचे पदाधिकारी संयुक्तपणे सहभागी होत असतात यावेळी त्यांना प्रत्यक्ष कामाचे,सी एस आर प्रोजेक्ट बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाते.
कोविड काळामध्ये “सेवा सहयोग”चे कार्य उल्लेखनीय होते.अनेक कंपन्यांमध्ये काम करणारे उच्चपदस्थ तरुण आय.टी.इंजिनियर्स तसेच व्यावसायिक उच्चपदस्थ,तरुण महिला कार्यकर्त्या यांनी कोविड मुळे दुर्दैवाने मृत्यू झालेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना वैकुंठ स्मशानभूमी मधील मदत व इतर आवश्यक मदतीसाठी स्वतःच्या जीवावर उदार होऊन दिवस रात्र प्रसंगी वैकुंठ मध्ये मुक्काम करून,स्वतःचे पैसे खर्च करून मोलाचे कार्य समाजसेवा म्हणून केले आहे.
संघ शताब्दी वर्षामध्ये सेवा सहयोग च्या अनेक प्रकल्पांमध्ये सर्वांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदविण्याचे व सहकार्य करण्याचे
आवाहन यावेळी शेलेश घाटपांडे यांनी केले.सेवा सहयोग सेवा कार्यामध्ये सहभाग नोंदविण्यासाठी व इतर माहितीसाठी शैलेश घाटपांडे सेवा सहयोग भ्रमण ध्वनी क्रमांक ९३७१०६७६८० यावर किंवा shaileshdg@gmail या मेल वर संपर्क करावा.
सुरवातीस शैलेश घाटपांडे यांचा परिचय केशव माधव चे सचिव अरविंद देशपांडे यांनी करून दिला.कार्यक्रमास कर्वेनगर येथील शाखांचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सोबत फोटो
१)सेवा सहयोग फाउंडेशन चे कार्यकारी संचालक शैलेश घाटपांडे बोलतांना.
शेजारी केशव माधव विश्वस्त निधी चे संचालक संजय वळसंगकर,सचिव अरविंद देशपांडे.
२) जादुई गुल्लक व त्यावर चित्र रंगवितांना विद्यार्थी,पालक,शिक्षक तल्लिन.
३)महिला सशक्तीकरण कार्यक्रम द्वारा स्वतः जीवनापयोगी वस्तू तयार करून स्वतःचे विक्री केंद्र
मधून विक्री


