Tuesday, August 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedरोटरी क्लब ऑफ पुणे डेक्कन जिमखाना तर्फे व्यावसायिक व सेवा उत्कृष्टता पुरस्कार...

रोटरी क्लब ऑफ पुणे डेक्कन जिमखाना तर्फे व्यावसायिक व सेवा उत्कृष्टता पुरस्कार प्रदान

 

 

पुणे : रोटरी क्लब ऑफ पुणे डेक्कन जिमखाना तर्फे आयोजित विशेष कार्यक्रमात अभिनेत्री रितिका श्रोत्री यांना व्यावसायिक उत्कृष्टता पुरस्कार तर समाजसेविका प्रीती वैद्य यांना सेवा उत्कृष्टता पुरस्कार माजी प्रांतपाल रोटेरीयन मंजू फडके यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

 

अभिनेत्री रितिका श्रोत्री यांनी आतापर्यंत १५ चित्रपट व १२ लघुनाट्यांमध्ये काम करून चित्रपट व रंगभूमी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांच्या कलाविषयक प्रवासाची दखल घेत हा पुरस्कार त्यांना देण्यात आला.

 

सेवा उत्कृष्टता पुरस्कार प्रीती वैद्य यांना गेल्या १७ वर्षांपासून ‘किनारा’ वृद्धाश्रम यशस्वीपणे चालवून ज्येष्ठ नागरिकांची सेवा, सन्मान व आधार देत असल्याबद्दल प्रदान करण्यात आला.

 

हा पुरस्कार सोहळा माजी प्रांतपाल रोटेरीयन मंजू फडके, क्लबच्या अध्यक्षा सरिता गोएंका व सचिव विकास टोपले व रोटरी क्लब ऑफ पुणे डेक्कन जिमखाना चे सर्व सभासद यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. उपस्थित मान्यवरांनी दोन्ही पुरस्कारार्थींच्या कार्याचे विशेष कौतुक केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments