जमशेदपूर, ३ मार्च २०२४: टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनीने आज टाटा स्टीलसाठी त्यांच्या नेक्स्ट-जनरेशन, ग्रीन-फ्यूएल शक्ती असलेल्या व्यावसायिक वाहनांना हिरवा झेंडा दाखवला. या ताफ्यामध्ये लिक्विफाईड नॅच्युरल गॅस (एलएनजी) आणि बॅटरी इलेक्ट्रिक तंत्रज्ञानांची शक्ती असलेले प्राइमा ट्रॅक्टर्स, टिपर्स व अल्ट्रा ईव्ही बसचा समावेश आहे. जमशेदपूरमध्ये टाटा ग्रुपच्या संस्थापक दिन साजरीकरणाचा भाग म्हणून टाटा सन्सचे अध्यक्ष श्री. एन. चंद्रशेखरन यांनी या वाहनांना हिरवा झेंडा दाखवला. याप्रसंगी टाटा स्टीलचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक श्री. टी. व्ही. नरेंद्रन आणि टाटा मोटर्सचे कार्यकारी संचालक श्री. गिरीश वाघ यांच्यासह त्यांच्या नेतृत्व टीम्सचे वरिष्ठ सदस्य उपस्थित होते.
टाटा मोटर्ससोबतच्या दीर्घकालीन सहयोगाबाबत मत व्यक्त करत टाटा स्टीलचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक टी. व्ही. नरेंद्रन म्हणाले, “हे वितरण टाटा मोटर्ससोबतच्या आमच्या दीर्घकालीन सहयोगामधील आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे. संबंधित उद्योगांमधील अग्रणी टाट स्टील आणि टाटा मोटर्सचा शाश्वतता व नाविन्यतेप्रती समान दृष्टिकोन आहे. आमची संयुक्त कौशल्ये व संसाधनांचा वापर करत आम्ही आमच्या उद्योगांमध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणत आहोत, तसेच पर्यावरणीय जबाबदारीसंदर्भात नेतृत्व देखील करत आहोत. सहयोगाने, आम्ही सकारात्मक परिवर्तनाला चालना देण्याप्रती आणि पर्यावरणास अनुकूल सोल्यूशन्स वितरित करण्याप्रती कटिबद्ध आहोत, ज्यामुळे आमच्या व्यवसायांना फायदा होण्यासोबत हरित भविष्याप्रती योगदान देखील देता येत आहे.”
हिरवा झेंडा दाखवण्यात आलेल्या फ्यूचर-रेडी वाहनांबाबत सांगताना टाटा मोटर्सचे कार्यकारी संचालक श्री. गिरीश वाघ म्हणाले, “टाटा मोटर्स भारतात शाश्वत, सुरक्षित व स्मार्ट गतीशीलतेच्या जागतिक मेगाट्रेण्डला गती देत आहे. आमच्या व्यावसायिक वाहनांचा हरित ताफा टाटा स्टीलच्या पुरवठा साखळीला कार्बन न्यूट्रल करण्याच्या दिशेने प्रयत्नांना गती देईल. आम्ही कार्यक्षमता, कामगिरी, कनेक्टीव्हीटी आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी सर्वांगीण सोल्यूशन्स डिझाइन करण्याकरिता त्यांच्यासोबत आणि त्यांच्या परिवहन सहयोगींसोबत सहयोग केला आहे. विविध ड्यूटी सायकल्स आणि स्पेशल अॅप्लीकेशन्सची पूर्तता करण्यासाठी या वाहनांच्या प्रत्येक पैलूला उद्देशरित्या सुधारण्यात आले आहे. आम्ही २०४५ पर्यंत कार्बन फूटप्रिंट कमी करण्यासह निव्वळ शून्य उत्सर्जन संपादित करण्याच्या आमच्या संबंधित प्रयत्नांमध्ये आमचा ऐतिहासिक सहयोग अधिक दृढ करण्यास उत्सुक आहोत.”
टाटा मोटर्सचा व्यावसायिक वाहनांचा आधुनिक ताफा विविध सुरक्षितता वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे, जसे अडवान्स्ड ड्रायव्हर असिस्टण्स सिस्टम (एडीएएस), इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, अॅक्टिव्ह ट्रॅक्शन कंट्रोल आणि ड्रायव्हर मॉनिटरिंग सिस्टम व इतर. ही वाहने स्टील उत्पादने व कच्चा मालांच्या परिवहनासाठी टाटा स्टीलच्या डिलिव्हरी भागीदारांना सुपूर्द करण्यात आली.
विविध उपयोजनांसाठी निर्माण करण्यात आलेल्या टाटा प्राइमा एलएनजी ट्रक्सच्या श्रेणीमध्ये टिपर्स (३५३०.के) आणि ट्रॅक्टर्स (५५३०.एस) यांचा समावेश आहे, जे खाणकाम आणि लांब पल्ल्याच्या व्यावसायिक परिवहनासाठी वापरण्यात येतील. बॅटरी-इलेक्ट्रिक श्रेणीचा त्वरित अवलंब करण्याचा भाग म्हणून २८टी ईव्ही टिपर (ई२८.के) आणि ४६टी ईव्ही ट्रॅक्टर (ई४६.एस) रिअल-वर्ल्ड कार्यक्षमता दाखवण्यासाठी तैनात करण्यात आले आहेत, जे टाटा स्टीलच्या लॉजिस्टिक मोहिमेचा भाग आहेत. शून्य उत्सर्जन ट्रक्स व्यतिरिक्त कंपनी प्लांट लोकेशन्समध्ये कर्मचाऱ्यांचे परिवहन करण्यासाठी टाटा अल्ट्रा ईव्ही बसेस वापरण्यास सुरूवात करेल.
टाटा मोटर्स पर्यायी इंधन तंत्रज्ञानासह बॅटरी इलेक्ट्रिक, सीएनजी, एलएनजी, हायड्रोजन व इंटर्नल कम्बशन इंजिन आणि हायड्रोजन फ्यूएल सेल तंत्रज्ञानाची शक्ती असलेले नाविन्यपूर्ण मोबिलिटी सोलयूशन्स विकसित व उत्पादित करत आहे. कंपनीने ऑटो एक्स्पो २०२३ आणि फेब्रुवारी २०२४ मध्ये भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो येथे विविध विभागांमध्ये अल्टरनेट-फ्यूएलची शक्ती असलेल्या व्यावसायिक वाहनांच्या व्यापक श्रेणीला दाखवले. आतापर्यंत, टाटा मोटर्सने भारतातील विविध शहरांमध्ये २,००० हून अधिक इलेक्ट्रिक बसेसचा पुरवठा केला आहे, ज्यांनी ९५ टक्क्यांहून अधिक अपटाइमसह १२ कोटी किलोमीटरहून अधिक अंतर पार केले आहे.


