Tuesday, August 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedराष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यालय "मोतीबाग" येथील ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात  ...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यालय “मोतीबाग” येथील ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात         – राष्ट्रीय कीर्तनकार हभप मोरेश्वर बुवा जोशी चऱ्होलीकर यांचे हस्ते ध्वजारोहण.

 

पुणे

(प्रतिनिधी)

भारतीय प्रजासत्ताकाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन दिनांक २६ जानेवारी रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या “मोतीबाग ” कार्यालयात सकाळी आठ वाजता अत्यंत उत्साहपूर्ण आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे आयोजन भारतीय संस्कृती संवर्धक संस्था यांच्या वतीने करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प.मोरेश्वरबुवा जोशी चऱ्होलीकर होते.त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली तसेच राष्ट्रगीत व वंदे मातरम् सादर करण्यात आले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त,या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे “भव्य घोषवादन” कार्यक्रम.घोषवादनात संपूर्ण पुणे महानगरातून ६८ वादकांनी सहभाग घेतला.शिस्त,तालबद्धता व राष्ट्रभक्ती याचे प्रभावी दर्शन या घोष वादन कार्यक्रमातून दिसत होते.

संगीत सादरीकरण

घोषवादन कार्यक्रमात पुढील रचनांचे सादरीकरण करण्यात आले.घोष प्रमुख वैभव गाडगीळ हे होते

• शंख रचना: प्रतिध्वनी, जगन्नाथ, साकेत

• आनक रचना-हंसध्वनी, देशकर

• शृंग रचना- राष्ट्रगीत, जयोस्तुते, शिवरंजनी, तिलंग, शिवराज्य, वंदे मातरम्

वादकांचा तपशील

• एकूण वादक: ६८

o शंख: १२

o आनक: १२

o ताल वाद्ये: २ (पणव – १, त्रिभुज – १)

o स्वरद: १४

o तुर्य: १५

o नागांग: ७

o गोमुख: ४

o घोष प्रमुख: १

आपल्या भाषणात ह.भ.प. मोरेश्वरबुवा जोशी यांनी “वंदे मातरम्” या गीताच्या १५० वर्षांच्या इतिहासाचा सविस्तर आढावा घेतला व भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील या गीताचे महत्त्वपूर्ण योगदान स्पष्ट केले.

या प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कसबा भागाचे संघचालक ॲडव्होकेट प्रशांत यादव यांनी भारतीय संविधानावर मार्गदर्शन केले व नागरिक कर्तव्ये व घटनात्मक मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले.

मोतीबाग येथील केशव सभागृहामध्ये संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारतीय संस्कृती संवर्धक संस्थेचे अध्यक्ष राजीव जोशी यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे विश्वस्त राजेंद्र वालेकर यांनी केले,जगदीश सोमण यांनी वैयक्तिक पद्य सादर केले.भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन देखील यावेळी करण्यात आले.

या कार्यक्रमास ज्येष्ठ विधिज्ञ शरद चंद्रचूड,महेश आठवले,कैलास सोनटक्के,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य सुहासराव हिरेमठ,रविंद्र किरकोळे,ज्येष्ठ प्रचारक श्रीधर पंत फडके,भाऊराव क्षीरसागर,शिरीष भेडसगांवकर,प्रांत प्रचारक यशोधन वाळिंबे,महानगर प्रचारक रोहित रिसबूड,प्रतिक परळीकर,डॉ मोरेश्वर गद्रे,अनिल देशपांडे,घोष प्रमुख वैभव गाडगीळ,तसेच भारतीय संस्कृती संवर्धक संस्थेचे विश्वस्त प्रसाद खेडकर,बाजीराव मणेरे,प्रकाश आठवले,किरण गांधी,उदय पंचपोर यांची मुख्य उपस्थिती होती.

कार्यक्रम राष्ट्रप्रेम,शिस्त आणि सांस्कृतिक गौरवाच्या वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाला.कार्यक्रमास समाजातील प्रतिष्ठित नागरिक,सोसायट्यांचे पदाधिकारी,अमृततुल्य दुकानदार,डॉक्टर्स,उद्योजक,ज्येष्ठ नागरिक,महिला,महानगरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments