Tuesday, August 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedउपमुख्यमंत्री अजित पवार यांना भव्य रंगावलीतून अभिवादन* श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भव्य रंगावलीतून अभिवादन* श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे आयोजन

 

 

पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात नुकतेच आकस्मिक निधन झाले. त्यांना बुधवार पेठेतील शतकोत्तर परंपरा लाभलेल्या श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे भव्य रंगावलीतून अभिवादन करण्यात आले आहे.

 

या प्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार यांसह कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड. रजनी उकरंडे, कोषाध्यक्ष युवराज गाडवे, उत्सव प्रमुख महेंद्र पिसाळ, उप उत्सवप्रमुख अक्षय हलवाई, विश्वस्त अ‍ॅड.प्रताप परदेशी, डॉ. पराग काळकर, सुनिल रुकारी, राजेंद्र बलकवडे आणि सेवेकरी व भाविक देखील उपस्थित होते.

 

ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार म्हणाले, रांगोळी ही जमिनीवर साकारणारी कलाकृती आहे. अजितदादा हे महाराष्ट्राच्या मातीशी नाळ जोडलेले नेते होते. त्यामुळे रांगोळीद्वारे त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. तसेच अजितदादा पवार यांच्या सोबत असताना अपघातात निधन पावलेल्या मुंबई पीएसओ एचसी विदीप जाधव, पायलट कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन संभवी पाठक, फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांना देखील श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

 

मंदिरासमोर ही रंगावली साकारण्यात आली असून रविवार, दि. १ फेब्रुवारी पर्यंत ठेवण्यात येणार आहे. श्रीरंग कलादर्पण फाऊंडेशनच्या कलाकारांनी ही रंगावली साकारली आहे. तब्बल २० बाय २५ फूट आकारातील ही भव्य रंगावली पाहण्यासाठी आणि अजितदादा पवार यांना अभिवादन करण्यासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments