Tuesday, August 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedश्रीमत् ग्रंथराज दासबोध प्रकाशनाचा भव्य सोहळा रविवारी (दि.१)* 'राष्ट्रगुरू श्री समर्थ...

श्रीमत् ग्रंथराज दासबोध प्रकाशनाचा भव्य सोहळा रविवारी (दि.१)* ‘राष्ट्रगुरू श्री समर्थ रामदास स्वामी’ या विषयावर चारुदत्त आफळे यांचे व्याख्यान

 

 

पुणे : समर्थ रामदास स्वामी प्रतिष्ठान, संभाजीनगर संपादित श्रीमत् ग्रंथराज दासबोध पारायण ग्रंथाचा भव्य प्रकाशन सोहळा रविवार, दिनांक १ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता सदाशिव पेठेतील गीता धर्म मंडळ, पुणे येथे होणार आहे. राष्ट्रीय कीर्तनकार डॉ. चारुदत्त आफळे यांच्या हस्ते ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे. प्रकाशनानंतर ‘राष्ट्रगुरू श्री समर्थ रामदास स्वामी’ या विषयावर त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

 

या ग्रंथामध्ये श्री मनोबोध (मनाचे श्लोक), श्री आत्माराम, श्री करुणाष्टके, श्री समर्थ त्रिसूत्री, सर्व आरत्या, श्री रामरक्षा, श्री हनुमान चालीसा, विद्यार्थ्यांना उपदेश, छत्रपती शिवाजी महाराजांना लिहिलेले पत्र, श्री गोंदवलेकर महाराजांचे अभंग, संतकवी दासगणू महाराज लिखित समर्थ अष्टक, तसेच प्राचार्य अ.दा. आठवले (स्वामी वरदानंद भारती) रचित संस्कृत स्तोत्र व त्याचा मराठी अनुवाद यांचा समावेश आहे.

 

राष्ट्रीय कीर्तनकार डॉ. चारुदत्त आफळे यांचे सांगीतिक व्याख्यान होणार असून हार्मोनियमवर वरद दातार व तबल्यावर गिरीश सातोनकर साथ करणार आहेत. श्री समर्थ रामदास स्वामी प्रतिष्ठान, संभाजीनगरचे संस्थापक अध्यक्ष, तबला वादक तालदास गिरीश वसंतराव सातोनकर यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments