Link – https://youtu.be/5cMRwSno07E?si=AhsBEMzvGTGxx4Lg
“मान मेरी जान” आणि “तु जाना ना पिया” सारख्या रोमँटिक हिट गाण्यांनी संपूर्ण पिढीला प्रेमात बुडवणारे पॉप स्टार किंग या लग्नसराईच्या हंगामात “जो इश्क हुआ” या आणखी एका गाण्यासह परत आला आहे. हे गाणे हृदयस्पर्शी असून नात्यांमध्ये उबदारपणा आणते आणि कायमच्या प्रेमाला समर्पित आहे. किंगने भावनिकदृष्ट्या प्रभावी गीतांना आठवणींमध्ये राहणाऱ्या सूरांसोबत मिसळून “जो इश्क हुआ” हे गाणे सादर केले आहे. हे सदाबहार आणि कायमचे प्रेम व्यक्त करणारे प्रेमगीत आहे. हे गाणे अशा नात्यांचा उत्सव साजरा करते जे आपल्याला आपल्या जोडीदाराशी असलेले नातं, त्यातील विश्वास आणि प्रेम व्यक्त करण्यास शिकवतो.
“जो इश्क हुआ” च्या म्युझिक व्हिडिओमध्ये लोकप्रिय अभिनेत्री श्रिया पिळगावकर आहे, जी किंगच्या आगामी अल्बम, राजा हिंदुस्तानीची झलक दाखवते.
जयपूरच्या राजेशाही परिसरात शूट केलेल्या जो इश्क हुआ’ या म्युझिक व्हिडिओमध्ये लग्नाच्या थीमवर आधारित कथा दाखवली आहे, जी बालपणातील प्रेमापासून सुरू होऊन आयुष्यभर टिकणाऱ्या नात्यापर्यंत पोहोचते. पारंपरिक हळदी आणि वरमाला समारंभांच्या पार्श्वभूमीवर सेट केलेला हा व्हिडिओ शाळेच्या दिवसातील आठवणी आणि वर्तमानातील लग्नसोहळा एकत्र दाखवतो. गाण्याची सुरुवात हळुवारपणे होऊन ते एका भव्य, सिनेमॅटिक संगीतमय वातावरणात उलगडते.
गाण्याबद्दल बोलताना किंग म्हणाला, “जो इश्क हुआ हे खूप प्रामाणिकपणे तयार केलेले गाणे आहे. हे अशा प्रेमाचे प्रतीक आहे ज्याला घोषणा करण्याची गरज नाही, ते फक्त टिकून राहते. हे गाणं सौम्य, हृदयाला स्पर्श करणाऱ्या क्षणांपासून सुरु होऊन एका भव्य, प्रभावी आवाजात बदलते, जे प्रेमाची उब दाखवते. आम्हाला हे गाणं सिनेमॅटिक पण खासगी वाटावं असे हवे होतं, जे प्रत्येक खास क्षणासाठी योग्य असेल.”
अभिनेत्री श्रिया पिळगावकर म्हणाली, “मला नेहमीच किंगचे संगीत आणि त्यांची ऊर्जा आवडते. जयपूरमध्ये, विशेषत: एका राजवाड्यात शूटिंग केल्यामुळे कथेला एक सुंदर कालातीत अनुभव मिळाला. हे गाणं स्वतःमध्ये सौम्य, रोमँटिक आहे आणि त्यात मजबूत भावनिक संबंध आहे. ही एक प्रेमकहाणी आहे जी हळूहळू उलगडते आणि दीर्घकाळ लक्षात राहते. मला वाटते प्रेक्षकांनाही हे खूप आवडेल.”
“जो इश्क हुआ” हे गाणे या हंगामात सर्वोत्तम लग्नाचे गाणे म्हणून रिलीज होत आहे, जे एक अविस्मरणीय प्रेमकहाणी साजरी करते. हे गाणं आता सर्व प्रमुख स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर
उपलब्ध आहे.


